Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

खुडाणी - क्षुद्रा- खा व

खुपगव्हाण - क्षुपगवादनी. खा व

खेकडें - कर्कट (खेंकडा ) - कर्कटकं. खा इ

खेटी - क्षेत्रिक (शेतकरी) - क्षेत्रिका. खा म

खेड - सं. प्रा. खेटाहार, रत्नागिरी, पुणें, नाशिक, सातारा, ठाणें, सोलापूर. (शि. ता.)

खेड - क्षेत्र = खेट्ट =खेट = खेड.
मल्लक्षेत्र = मालखेट्ट = मालखेड.
मान्यक्षेत्र = मानखेट्ट = मानखेड.
माने नांवाच्या क्षत्रियांचें गांव तें मानखेड.
( सरस्वतीमंदिर)

खेड - खेट ( घोडा) - खेटं. खा इ

खेडगांव - खेट (घोडा) - खेटग्रामं. ४ खा इ

खेडली - खेट (घोडा) - खेटपल्ली. खा इ

खेडलें - खेट (घोडा) - खेटपल्लं. ३ खा इ

खेडी - खेट (घोडा) - खेटिका. १५ खा इ

खेडी टोंक - खेट (घोडा) - खेटिका तोक्मन्. खा इ

खेडें - खेट (घोडा) - खेटं. खा इ

खैरडें - खदिरवाटकं. खा व

खैरदें - खदिरपद्रं. खा व

खैरमुळी- खदिरमूलिका. खा व

खैरवें - खदिरवहं. ३ खा व

खैराळें - खदिरपल्लं. खा व

खोकरपाट - खिंखिर (खोकड) - खिंखिरपाटक. खा इ

खोकरवाडें - खिंखिर ( खोकड) - खिंखिरवाटं. खा इ

खोकराळें - खिंखिर (खोकड) - खिंखिरपल्लं. खा इ

खोकसें - क्षव (शेवगा) - क्षवकर्ष. खा व

खोडअमली - क्षुद्रा (माशी) - क्षौद्र अमलिका. खा इ

भोंक [ भूकं = भोंक ]

भोकणें [ बुक्क् कुत्र्याप्रमाणें शब्द करणें = भोकणें, बोकणें, ओकसा बोकशी, बोकळणें ] (ग्रंथमाला)

भोकसा [ अभ्यवकाशः ] (धातुकोश-भोकस २ पहा)

भोकाड [ बुक्क = बोक्क = भोक. विस्तारदर्शक भोकाड ] त्यानें भोकाड पसरलें म्हणजे त्यानें तोंड वासलें. भोकाड म्ह० तोंड. (भा. इ. १८३४)

भोगदा [ अभ्यवकाशः ] (धातुकोश-भोकस २ पहा)

भोंगळ [ भूमंगल = भुवंगळ = भुओंगळ = भोंगळ ] (भा. इ. १८३७)

भोगवटा [ भोगपट्टः = भोगवटा ]

भोजनभाऊ १ [ भोजनभ्रातरः = भोजनभाऊ ( table-parasites) ( पात्रेसंमितादयः when contempt is expressed)

-२ [ भोजने-बहुलाः = भोजन-भाऊल = भोजनभाऊ ( Parasite)] भ्रातृ = भाऊ या शब्दाशीं कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३३)

भोजें [ भोज्यं = भोजें ]

भोंडलें [ भुमंडलं = भोंडलें ]

भोंडा [ मुंडः ] (भुंडा पहा)

भोत [ पोत = वोत = बोत = भोत ] ( भा. इ. १८३४)

भोतण [ बहुतृण ( क्षुद्रवस्तु, तुटका पेंढा) = भोतण ]

भोद [ बुद्, बुंद् ] (भोंद पहा)

भोंद [

bhond

to teach in a vicious way, to mislead. बुध-बोधयति, बुध्यति, बोधते to teach rightly. बुद्-to teach in a wrong way.

भोपळा [ बृहत्फल: = भोपळा ] बृहत्फला राजपुत्री तिक्तबीजा च तुंबिका । ॥ राजनिघंटु । बृहत् चा अपभ्रंश भो झाला आहे.
कडू भोपळ्याला संस्कृतांत बृहत्फला, कटुतुंबी हीं नांवें आहेत. (भा. इ १८३७)

भोंभावणें [ Red बोबुक्क् ( द्विरुक्ति) = भोंभावणें ] to bark incessently. बुक्क् = भो भो.

भूतल ( ला-ली-लें ) [ अभिभू= भुवणें, भोंवणें to be aflicted with. अभिभूत = (निष्ठा) भूतल ( ला-ली-लें )]

भूतलें [ भू-भूत + ल (स्वार्थक) भूतल (ला-ली-लें) ] मागील, गत.

भूयस् [ बहु + इयस् = भूयस् (बहुतर). वहु = भु. बह्वीयस् = भूयस् ]

भुवई [ भ्रूवृती= भूवई ( dual ) ] considered in मराठी as singular.

भेकड [ भेष्, भ्रेष् १ भीतौ. भ्रेषट = भेकड ] ( धा. सा. श. )

भेजणें [ अज् १ गतिक्षेपणयोः. अभ्यज् to unite = भेजणें ] ( धा. सा. श. )

भेजना [ विसेधनं = भेजना. षिध गत्यां । ] गंगां विसेधति (सिद्धांतकौमुदी) = गंगा भेजते.

भेट [ n. अभीष्टं = भेट f ]

भेटणें [ अत् १ सातत्यगमने. अभ्यत् (अभि + अत्)= ( अलोप ) भेटणें. अभ्यतनं = भेटणें ] to visit. (भा. इ. १८३७ व धा. सा. श.)

भेंड [ भिंद् १ अवयवे. भिदं = भेंड ] वीरूचें भेंड = अवयव. ( धा. सा. श. )

भेंडा ( भिंडीतक ] (भेंडी पहा)

भेंडी [ भिंडीतक = भेंडा, भेंडी ( वनस्पति ) ]

भेदरणें १ [ भीदरणं = भेदरणें (भी + दर)] अति भिणें. ( भा. इ. १८३६ )

-२ [ भीदरणं = भेदरणं ( भीतीनें डरणें ) = भेदरणें ] (भा. इ. १८३४)

-३ [ विद्रवणं = विदरणँ = वेदरणें = भेदरणें ] फार डरणें. (भा. इ. १८३४)

भेद्या १ [ अभिज्ञः = ( अलोप ) भेद्या ] ज्ञाता. त्या शास्त्रांतला भेद्या पाहिजे म्हणजे गूढज्ञाता पाहिजे.

-२ [ भेदक (चुगलखोर) =भेद्या ] गृहभेदक: = घरभेद्या.

भेनचोद [ मेहनचोदक: = भेनचोद one who copulates with the penis.

भेलगा [ भेदक: = भेलगा. द = ड = ल ]

भो [भोः = भो ( हें अव्यय खानदेशांत फार प्रचलित आहे) ]

भोक [ वक्त्रं ] (बोक पहा )

खानापुर - खनक (उंदीर) खनकपुरं. २ खा इ

खापडदें - खर्परिका (कलखापरी) - खर्परिकापद्रं. खा नि

खापडविहीर - खर्परिका (कलखापरी) - खर्परिका विवरिका. खा नि

खापदें - कापथ (वाईट रस्ता ) - कापथकं. खा नि

खापर - खर्परिका (कलखापरी ) - खर्परिकं. ३ खा नि

खापरखेडें - खर्परिका (कलखापरी ) - खर्परिकाखेटं. ८ खा नि

खापरपाडा - खर्परिका (कलखापरी) - खर्परिकापाटकः = खा नि

खापरें - खर्परिका (कलखापरी ) - खर्परिकं. २ खा नि

खामगांव - स्कंभ (वैदिक देवता) - स्कंभग्रामं. खा म

खामखेडें - स्कंभ (वैदिक देवता ) - स्कंभखेटं. ६ खा म

खामचौधर - स्कंभ (वैदिक देवता)- स्कंभकंचतुर्धरं. खा म

खामलें - स्कंभ ( वैदिक देवता ) - स्कंभपल्लं. खा म

खामलोण - स्कंभ (वैदिक देवता) स्कंभलयनं. खा म

खामशेत - स्कंभक्षेत्रं = खांबसेत = खामसेत = खामशेत. मा

खायद - खात (अरण्यनाम) - खातपदं. खा नि

खालकोट - क्षार ( मीठ ) - क्षारकोट्टं. खा नि

खालप - खालपू ( भंगी, झाडू) - खालपं. खा म

खालवण - क्षार ( मीठ ) - क्षारवनं. खा नि

खालसर - खल्व (वाल ) - खल्वसरस्. खा व

खाशिया - (कर्णाटक पहा).

खिंडाकें - (खंडाळें पहा).

खिरडी - क्षीरीवाटिका. ६ खा व

खिरमाणी - क्षीरी - क्षीरमाणी. खा व

खिरवड - क्षीरीवाटं. खा व

खिरोदें - क्षीरी - क्षीरिकापद्रं. २ खा व

खुटगव्हाण - क्षुद्रागवादनी. खा व

खुटावाडी - क्षुद्रा. खा व

खुंटामोडी - क्षोड (हत्ती बांधण्याचा खांब) - क्षोड-मोटकिका (बांधण्याचे खुंटे मोडणारे राजाचे
मत्त हत्ती 
ज्या गांवांत राहांत तें गांव). खा नि

भुंडा [ मुंडः a bald head or any limb = भुंडा, भोंडा ] भोंडा हात, भोंडी करंगळी, भोंडा पाय means an arm or finger or foot unornamented i.e. bald.

भुताटणें [ वेष्ट् १ वेष्टने. भूताविष्टि = भूताटी. भूतावेष्टनं = भूताटणें, भुताटणें ] ( धा. सा. श.)

भुत्या [ भृत्यः = भुत्या ] देव्याः भृत्यः = देवीचा भुत्या. खंडोबाचे किंवा अंबेचे सेवक.

भुद [ वंद् ] (भोंदणें पहा)

भुंद [ बुंध् ]

भुयार १ [ भूम्यागारं = भूइआआर = भुय्यार = भुयार]

-२ [ भ्वागार = भुयार ] ( भुयेर पहा )

भुयेर [ भूगृहं = भुयेर. भ्वागार = भुयार ]

भुर (रा-री-रें) [ बभ्रु = भुर ( रा-री-रें ) अ चा व उ चा विपर्यय ] ( भा. इ. १८३४ )

भुरक (का-की-कें) [ भृतक = भुरअक = भुरक (का-की-कें ) ] भुरका म्हणजे द्रव्य घेऊन तेवढ्यापुरतें काम करणारा. ( भा. इ. १८३४)

भुरकन् १ [ वि + स्फुर् ६ किंचिच्चालने ] ( धातुकोश-भुरभुर २ पहा)

-२ [ भुर् to quiver = भुरकन् उडणें ]

भुरका [ मुखरक्षः = मुरखा = भुरखा, बुरखा, भुरकी. म चा भ होतो ]

भुरकी [ मुखरक्षः ] ( भुरका पहा )

भुरटा [ मृतकः चोरः = भुरटा चोर. मृतक servant ] भुरटा चोर a thief from amongst servants.

भुरभुर जळणें [ भृ ९ भर्त्सने. भृ भाजणें = भुरभुर ] ( धा. सा. श. )

भुवइ [ भ्रुवृत्ति ] ( भिवया पहा )


भुवडी [ भ्रुकुटि ] ( भिवया पहा)

भुवया [ भ्रुवर्तिका ] ( भिवया पहा )

भुंवया [ भ्रुवर्तिका = भुवइआ = भुवया = भुँवया ] ( ग्रंथमाला)

भुसकुट्ट्या [ बुसकुट्टकः = भुसकुट्टा इ. इ. ] (भा. इ. १८३३)

भुस्सा [ व्रूस् हिंसायां १०, व्रूसः = भुस्सा ] भुस्सा पाडणें म्हणजे समूळ नाश करणें. ( धा. सा. श. )

भूक [ बुभुक्षा = भुक्षा = भुक्खा = भूक ] (ग्रंथनाला)

खांडवारा - खांडव (अरण्यनाम) - खांडवद्वार:-खा नि

खांडवारें - खांडव ( अरण्यनाम ). खांडवद्वारं. ३ खा नि

खाडरें - खंडीरं (पिवळा मूग) - खंडीरं. खा व

खांडववन - सध्यां हिंदुस्तानच्या पूर्वेकडील देशांत खांड' म्हणून लोक आहेत. त्यांचेंच पूर्वीचें म्हणजे भारतकालीं तरी ' खांडव ' असें नांव असे. ह्या खांडववनांत च सध्यांचें खांडवा हें शहर आहे. भिमाशंकराच्या पायथ्याशीं तळकोंकणांत कर्जतापासून सहा कोसांवर खांड म्हणून गांव आहे. तेथें सध्यां कोळी ऊर्फ कोळ लोक राहतात. ह्या कोळ लोकांच्या प्रदेशाला ' कोळवन ' म्हणतात. कोळांवरून जसें कोळवन तसें गोंडांवरून ' गोंडवन ' कोळवन, गोंडवन व खांडवन अशीं वन शब्दान्त नामें ह्या कोळ, गोंड व खांड लोकांच्या प्रदेशाला फार पुरातन कालापासून असलेलीं दिसतात. वह उत्तरपद लागून खांडववह. त्याचें प्राकृत खांडवा ( ग्रामनाम ). प्रस्थपुरवहन्ताच्च (४-२-१२२). मुंडवा, सैंधवा हीं रूपेंहि अशाच मासल्याचीं होत. (भा. इ. १८३२)

खांडवा - (खांडववन पहा).

खांडवें - खांडव (अरण्यनाम) - खांडवहं. खा नि

खांडसी - खंडशयी (खांडगांवाखालील गांव). मा

खाडापिंपळ - खट्टा (देवताड तृण). खा व

खाडीजामुन - खट्टा (देवताड तृण) - खट्टायामुन. खा व

खातगांव - खात (पुष्करिणी ) - खातग्रामं. २ खा नि

खातुर्खें - खात ( पुष्करिणी ) - खातवृक्षं. खा नि

खांदेरी - स्कंदगिरि = खांदइरि = खांदेरी. (भा. इ. १८३३)

खानदेश - खानदेश व सेउणदेश.
खानदेश हें गांव बर्‍हाणपुराच्या किंवा अलजपुराच्या नबाबांनीं दिलें असा कित्येक युरोपियनांचा व एतद्देशीयांचा तर्क आहे, आणि खान या शब्दाकडे पहातां सकृद्दर्शनीं हा तर्क खरा असावा असें समजण्याकडे प्रवृत्ती होते. परंतु किंचिंत् सूक्ष्म दृष्टीनें पाहिलें असतां असें दिसून येतें कीं, हा शब्द अगदीं शुद्ध प्राकृत आहे. ह्या प्रांताचें मूळचें नांव कन्हदेश. कन्हदेश म्हणजे कृष्णदेश. देवगिरीच्या यादव कुळांत कृष्ण ऊर्फ कन्ह नांवाचा राजा झाला. त्यानें आपलें नांव ह्या प्रांताला दिलें. कन्हदेश, कान्हदेश, काहनदेश व खानदेश अशा परंपरेनें अपभ्रंश होत होत खानदेश असें नांव प्रचलित झालें. वहरट्ट ऊर्फ वर्‍हाड व नाशिक ह्यांच्या दरम्यानचा जो पश्चिमेकडील प्रांत त्याला कन्हदेश ऊर्फ खानदेश म्हणत. वर्‍हाड व नाशिक ह्यांच्या दरम्यानचा जो पूर्वेकडील व गोदेच्या उत्तरेकडील प्रांत तो देवगिरी ऊर्फ देवरी प्रांत होय. आणि देवगिरीच्या दक्षिणेस, नाशकाच्या पूर्वेस व जुन्नराच्या उत्तरेस जो प्रांत आहे त्याला सेउणदेश म्हणत. ह्या सेउणदेशाची राजधानी सेउणनगर ऊर्फ सध्यांचें सिन्नर होय. सेउण हा यादवकुलांतील एक राजा होता. ह्या सेउण देशाचा उल्लेख डॉक्टर भांडारकरांच्या दख्खनच्या इतिहासांत आहे. परंतु सेउणदेश म्हणजे सध्यांचा अमका प्रांत असें त्यांत सांगितलें नाहीं.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)

भिस्त [ विश्राब्धिः = बिसध्धि = भिस्ति = भिस्त श्रम् १ प्रमादे ] भिस्त म्हणजे विश्वास.

भीक १ [ भीषा = भीक ] मी त्याला भीक घालीत नाहीं म्हणजे मी त्याला भीत नाहीं.

-२ [ अभि + ईक्षा = अभीक्षा = (अलोप) भीक ] care, account.
मी त्याची भीक धरीत नाहीं, मी त्याला भीक घालीत नाहीं, I don't care for him.

भीड १ [ अभिष्ट help, assistance = is Protection मी त्याची भीड धरीत नाहीं I do not rely upon his help.

-२ [ ब्रीड् ४ लज्जायां-ब्रीडा ] (धातुकोश-भिडाव ३ पहा)

-३ [ ब्रीडा = भीड ] modesty.

-४ [ अभि + ईड् स्तुतौ. अभीडा = ( अलोप ) भीड ] regard, consideration.

-५ [ विधिः = बिढि = भांड (rule) ] संध्येची भीड पाळणें to observe the rules of prayer.

-६ [ अभीष्टता = भिट्टइ = भिडा ( स्त्री ) ] सार्थवाहस्य अभीष्टः = सार्थवाहाच्या भिडेचा.
( खेळांत ) माझा भिडू = मे अभीष्टः (भा. इ.१८३४)

भीतर [ अभ्यंतर = अब्भितर = भीतर. प्रारंभींचा अ लोपतो ] ( भा. इ. १८३२ )

भीरदिशि टरकावणें [ भ्री to tear भ्रीणाति ]

भुइनळा [ बृहन्नालः (दारूनें भरलेली नळी) = भुइनळा ] एक प्रकारचें दारूनें भरलेलें मातीचें पात्र.

भुईआंवळी [ भूम्यामलकी = भुईआवळी ] (भा. इ. १८३४)

भुईजांवळी [ भूमिजंबुका = भुईजांबळी ]

भुईपोई [ भूम्युपोदका = भुईपोई ] (भा. इ. १८३४)

भुकिस्त [ भुक्ष् - वुभुक्षित = भुकिस्त ] (धा. सा. श.)

भुगा १ [ भुज् ( ६th तुदादि to bend विभुजति) = भुगा = भुग्नः ]

-२ [ भुग्न = भुग्ग = भुग्गा = भुगा ] (भा. इ. १८३६)


भुंगा १ [ भुजंगः = भुंगा ] हा भुंगा पाठीमागें लागला आहे.

-२ [ भुंगः = भुंगा. भृंगकीटिका = भिंगुर्टी but भुजंगः = भुअंगो = भुंगा ] त्याचा माझ्या पाठीमागें भुंगा लागला आहे म्हणजे सर्प लागला आहे.

भुज [ भुज = भुज-जा ] (स. मं.)

खंमीर - शौरसेनींत कश्मीर या शब्दाचें कम्हीर असें रूप होतें. हकार ककराला जुडून खमीर, खम्मीर वगेरे रूपें तदनंतरचीं; ख चा केवळ ह होऊन हमीर झालें. हमीरचें हंमीर. प्राकृतिक हिंदी भाषा सुरू झाल्यावर हम्मीर झाला. तेव्हां त्याचें नांव प्राकृतिक आहे ह्यांत नवल नाहीं. (भा. इ. १८३२)

खर - खरा. खा न

खरग - खर्ग (गेंडा) - खर्ग. खा इ

खरगांव - खर (गाढव) - खरग्रामं. खा इ

खरगोण - खर्ग (गेंडा) - खर्गवनं. खा इ

खरजाई - खरुजाया (पार्वती) - खरुजाया. खा म

खरड - खरटकं (कथील) - खरटकं. खा नि

खरडा - खर (गाढव) - खरवाटः खा इ

खरडी - खरटकं ( कथील) - खरटिका. ४ खा नि

खरडें - खरटकं ( कथील ) खरटकं. ३ खा नि

खरदें - खर (गाढव ) - खरपद्रं. ४ खा ई

खरवाड - खर ( गाढव ) - खरवाटं. २ खा इ

खरसाणें - कृषाण (शेतकरी ) - कृषाणकं. खा म

खरसी - खराश्वी (मोरशेंडा). २ खा व

खराणी - खर ( गाढव) - खरवनी. खा इ

खरूडें - खरु (घोडा ) खरुवाटं. खा इ

खर्डी बारी - खरुवाटिकाद्वार. खा प

खर्वड - खर्वट (पर्वतपादग्रामं ) - खर्वटं. २ खा नि

खर्वडी - खर्वट ( पर्वतपादग्रामं) - खर्वटिका. खा नि

खलाणा - खलधान ( खळें) - खलधानं. खा नि

खलाणें - खलधान (खळें). खा नि

खवसी - खर्वर ( कडवा वाल) - खर्वरकर्षा. २. खा व

खळद - खल ( धोत्रा ) - खलपद्रं. खा व

खाकुर्डी - कर्कराटु (करढोंक) - कर्कराटिका. खा इ

खांचणे - खंजनं ( मोहरी ) - खंजनं. खा व

खाजोळी - खर्जु ( धोत्रा). खा व

खाजोळें - खर्जु (धोत्रा) - खर्जुपल्लं. खा व

खांड - खंड ( ग्रामं ). मा

भिडणें १ [ ( अभि द्रु) अनिद्रवण = भिडणें ] जवळ देणें. ( भा. इ. १८३६ )

-२ [ अभ्यटण = अब्भिटण = भिडण = (भिटण ) ] (प्रयोजक) भेटणें (जवळ येणें). ( भा. इ. १८३२)

-३ [ अभिडीनं = (अलोप) भिडिणें, भिडणें ] अभिडी म्हणजे जवळ उडणें, जाणें. (भा. इ. १८३७)

भिडस्त १ [ ब्रीडाग्रस्त = भिडस्त ] Modest.

-२ [ ब्रीडास्थ = वीडल्थ = भिडस्त ] Bashfull.

-३ [ विध्वस्त (Ruined, Eclipses) = भिडस्त ]

भिडा १ [ अभिध्या = भिडा ( इच्छा) = भीड ] अभिध्या म्हणजे इच्छा. भिडा धरूं नको म्हणजे कशाची इच्छा धरूं नको. ( भा. इ. १८३७ )

-२ [ ब्रीड् ४ लज्जायां. ब्रीडा (लाज ) = भिडा, भीड ] ( धातुकोश-भिडाव ३ पहा)

भिडावणें [ अभिधावनं = भिडावणें ] जवळ धावणें. (भा. इ. १८३६)

भडू [ अभीष्टः ] ( भीड ६ पहा)

भिनणें [ भिन्न = भिन (णें ) ] (भा. इ. १८३६)

भिरकणें १ [ भ्रेष् १ गतौ. भ्रेषणं = भेरकणें =फेरकणें = फिरकणें.
भ्रेषणं = भेरकणें = भिरकणें ] (धा. सा. श.)

-२ [ पर्यवकिरणं = भिरकणें, भिरकवणें. पर्यवकृ = इकडे तिकडे पिस्करणें, फेकणें ] (भा. इ. १८३६)

भिरकवणें [ पर्यवकिरणं ] ( भिरकणें २ पहा)

भिरका [ परिक्रामकः = भिरका. परिक्रामिका = भिरकी ] a whirling cart.

भिरकावणें [ भ्रम् ४ भ्रमणे. भ्रमीकाम्यति = भिरकावतो ] तो दगड भिरकावतो = सः दृषदं भ्रमाकाम्यति (भ्रममाण करण्याची इच्छा करतो). ( धा. सा. श. )

भिरकी [ परिक्रामिका ] (भिरका पहा )

भिवई [ भूपंक्ति = भूंवई, भिंवई, भुंवई, भुवई] (स. मं.)

भिंवई [ भ्रूपंक्ति ] ( भिवई पहा)

भिवया [ भ्रुकुटि = भुवडी. भ्रुवृत्ति = भुवइ, भ्रुवर्तिका = भुवइआ = भुवया = भवया ( उ = अ ), भंवया ]

भिशी [ ( वि + शी) विशय ] (बिशी ३ पहा)

भिषज् [ अभि + संज् = ( अलोप ) भिषज् ] one serving at the side of a sick man, nurse, doctor.

भिसें [ बिसं अस्याः अस्तीति बिसिनी. बिसं = भिसें ] कमळाच्या देठाचा गाभा, बोरूचा पांढरा गाभा.

भारंगी [ भागीं = भारगी = भारंगी ] (भा. इ. १८३४)

भारी १ [ भारिन् ( जड ) = भारी ]

-२ [ भूरि = भारी ( adverb ) ] ऊ चा आ होणें जरा अपरिचितांतलें आहे; पण येथें झाला आहे हें निश्चित.

भारीस [ मृश = भारीस (सा-शी-सें ) ] ( भा. इ. १८३४)

भारूड [ व्याहृतिः (utterance) = भारूड ] empty talk.

भारूढ [ भारोढं ( भार + ऊढं ) = भारूड, भारूढ ] भारेण ऊढं म्हणजे वजनानें भरलेलें.

भाव ! [ भगवन् = भअवँ = भावँ = भाव ! ] नाटकांत येणारा भाव हा शब्द प्राकृत आहे व भगवत् शब्दाचा अपभ्रंश आहे. परंतु चिरोपयोगानें संस्कृत म्हणून वापरला जातो.

भावजय [ भ्रातृजाया = भाउजाय = भावजय ] (स. मं.)

भावंड [ भ्रातृगंड = भाऊअंड = भाओंड, भावोंड = भावंड ] ( भा. इ. १८३३)

भावली [ पुत्तलिका ] ( बाहुली पहा )

भावीण [भामिनी = भाविणी = भावीण ] स्त्रीविशेष, जातिनाम. ( भा. इ. १८३७)

भास [ अभ्यास = भास ( अलोप ) ] त्याला शास्त्राचा किंचित् भास आहे. ह्या वाक्यांत भास ह्या शब्दाचा अर्थ अभ्यास असा आहे. ( भा. इ. १८३६)

भाळ [ भाल = भाळ ] ( स. मं. )

भिकाटणें [ भिक्षाटनं = भिकाटणें ] (भा. इ. १८३६)

भिकार [ भैक्ष्याहाराः - भिकार ]
भिकार म्हणजे भिक्षेकर्‍यांचा समूह
भिक्षाहारी = भिक्कारी = भिकारी.

भिंगारी [मृंगारि = भिंगारी ] चंबू, झारी.

भिजणें [ अभ्यंजन = अब्भिज्जण = भिजणें. अचा लोप ] ( भा. इ. १८३२ )

भिजत [ विधीयमान = भिजत ( वि + धा ) ]
तदविधीयमानं पद्यते = तें भिजत पडलें आहे.

भिजवणें [ अभिध्या =भिज्झा =भिज ] देवांना भिजवा= देवान् अभिध्यायथ. ( भा. इ. १८३४)