ही बाळाजीची कल्पना चांगली फलद्रूप झाली हें, तिचा मुख्य हेतु सिद्धीस गेला एवढेंच नव्हे तर अति कठीण स्थिति प्राप्त झाली असतांही शंभराहून अधिक वर्षे ती कल्पना सुरळीतपणें अमलांत आली यावरून सिद्ध होतें. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड, ओरिसा, गोंडवण, नेमाड व खालीं तुंगभद्रपर्यत कर्नाटक प्रांत हे जिंकण्यास मराठे समर्थ झाले, तें ह्या कल्पनेमुळेंच. राजपुतान्यांतील सर्व संस्थानांवर तसेंच दिल्लीदरबारावर देखील दाब ठेवण्यास त्यांना मदत होऊन, राष्ट्राच्या हितास साधेल तेव्हां बादशहास ते गादीवर बसवीत किंवा पदच्युत करीत. इकडे सिंधुनदाच्या तीरापर्यंत मराठ्यांनी आपला मार्ग काढिला, तर पूर्वेच्या बाजूस अयोध्या, बंगाल व ओरिसा येथील नवाबांस आपल्या कह्यांत ठेऊन, हैदराबाद येथील निजाम, सावनूरचा व कर्नाटकचा नवाब, पुढें हैदर व टिप्पु यांच्या देखील मुलखाची सरहद्द पुष्कळ मागें ढकलली. पोर्तुगीन लोकांस वसईतून हांकलून देऊन इंग्लिशांबरोबर दोन जोराच्या लढाया केल्या. पानिपत येथील सर्व महाराष्ट्रास जमीनदोस्त करणा-या पराभवास न जुमानतां दिल्ली व उत्तर हिंदुस्थान यावर पुनः त्यांनीं आपला झेंडा रोंवला व एक शतकभर टिकाव धरून नंतर मराठ्यांचें राज्य लयास गेलें. याचें मुख्य कारण असें कीं, मराठ्यांचें साम्राज्य अगदीं भरभराटींत असतांना सर्व मराठामंडळ ज्या तत्त्वां -- वागत असे ती सर्व तत्वें पार नाहींशीं होऊन प्रत्येकजणानें फक्त अ --- लेंच हित साधावें, दुस-याचें कसें का होईना इत्यादि क्षुद्र क --- लोकांच्या डोक्यांत शिरल्या. या शंभर वर्षात मराठ्यांनीं ज्या ल--- मारल्या व जे नवीन मुलूख काबीज केले, त्यावरूनच ही मरा --- जूट कायम होती असें दिसतें. पूर्वीप्रमाणें अष्टप्रधान असं --- मराठा साम्राज्याचा हा विलक्षण विस्तार कधींच होताना.
एवढें खरें कीं, असल्या प्रचंड शक्तीच्या ठिकाणीं देखील दौर्बल्य आणणारें एक उत्पत्तिस्थान होतें. व तें बाळाजी विश्वनाथ, त्याचे उपदेशक, व त्यांचे वंशज यांना पूर्णपणें माहीत होते. मराठ्यांची जुट होती खरी, पण जर या जुटीस स्वदेशाभिमान व स्वपूर्वजाभिमान यांचें बंधन नाही, तर ती जूट ह्मणने एक वालुकामय रज्जूच होय. अशी स्थिति असतांना बाळाजीनें जरी राज्यकारभार अंगावर घेतला होता, तरी अंतर्दोषाकडे त्याचें दुर्लक्ष नव्हतें. हा बाळाजीच्या अंगचा विशेष गुण होता. अष्टप्रधानमंडळ पुनः अस्तित्वांत आणणें शक्य नव्हतें, तेव्हां राज्यव्यवस्थेमध्यें अवश्य फेरफार करावा लागल्या कारणानें जे दोष होतील ते जितके कमी होतील तितकें करणारें एक नवीन ऐक्यबंधन. उत्पन्न करण्याचा त्यानें प्रयत्न केला. या त्याच्या नवीन व्यवस्थेचें ठोकळ स्वरूप येणेंप्रमाणें होतें :-( १ ) हे मराठा मंडळ जें एके ठिकाणीं बद्ध झालें होतें, तें शिवाजीचे पराक्रम व त्याचा नातू शाहू याच्याविषयीं.असलेला लोकांचा पूज्यभाव या योगानें शाहू राजा चाळीस वर्षेपर्यंत सत्ताधीश होता. या काळांत सर्व प्रजेची त्याच्यावर प्रीति असे व त्याची सर्वाला काळजी असे. या जुटींतील लोकांना खच्चून आवळून टाकणारें हेंच बंधन व तें जास्त घट्ट करण्याचा बाळाजीनें पुष्कळ प्रयत्न केला. प्रत्येक मुलकी व लष्करी अधिका-यास जी सनद देत, ती शाहू राजाचे नांवें देण्याचा त्यानें परिपाठ घातला. व जे मान मरातब, व पदव्या लोकांना मिळत तें सर्व शाहूच्या हुकूमानेंच. नाणें पाडलें ते शाहूच्या नांवाचेंच. व तह करा--याचा झाल्यास, त्याच्या सहीनेंच व्हावयाचा व कोठें स्वारी करणें झाल्यास -- शाहूस वर्दी द्यावी लागे. याप्रमाणें शाहूस श्रेष्ठस्थान दिलें होतें.