चौथाई व सरदेशमुखी.
प्रकरण ११ वें.
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनीं आपल्या कल्पक बुद्धीनें, धैर्यानें व चातुर्यानें राज्यांतील घोंटाळा मोडून चोंहोकडे कशी व्यवस्था केली, हें दाखविण्याच आह्मीं मागील भागांत प्रयत्न केला. आतां पुढें आह्मी जी हकीकत सांगणार आहोंत, तीपैकीं बराच भाग मागेंच सांगून टाकिला आहे. कारण कीं, तो सांगितला नसता तर, शिवाजीच्या छोटेखानी राज्याचें रूपांतर होऊन त्या ठिकाणीं आतां, जतिं सर्वांचे हेतू एक व सर्वांचे व्यवसाय एक आहेत, अशा त-हेची सर्व लहानमोठ्या संस्थानांची जमात कशी झाली ह्याची कल्पना वाचकांस चांगल्या प्रकारे-- झाली नसती. शाहू राजे सिंहासनारूढ झाल्यानंतर परिस्थितींत जो -- फेरबदल झाला, त्यामुळें मराठावीरांनी जे हक्क मागितले होते त्या सर्वांस-- कायदेशीर मंजुरी मिळाली. हें महद्यश संपादून बाळाजी इ. स.—१७२० त मरण पावला. याप्रमाणें मुसलमान बादशहाच्या हातांतून --पर्व सत्ता नाहींशी होऊन, अखेरीस ती मराठामंडळाच्या हातांत आली. त्यावरील हकीकतीचें साम्य हिंदुस्थानच्या मागील इतिहासांत क्कचित्च आढळून येतें. परंतु १९ व्या शतकाच्या आरंभी आरंभीं मार्क्किस आफ् वेलेस्ली यानें जें मोठें कार्य सिद्धीस नेलें, त्याशीं मात्र ह्या गोष्टीचें चांगलें सादृश्य दिसून येतें. मार्क्किस ऑफ् वेलस्लीनें एतद्देशीय राजाबरोबर पैका घेऊन सैन्य पुरविण्याचे तहनामे करून, त्यांत इंग्लिशांची फौज आपल्या मदतीसाठीं प्रत्येक संस्थानिकानें, आपल्या पदरच्या खर्चानें ठेवावी, असें ठरविलें होतें. या प्रकारच्या तहांच्या योगानें ब्रिटिश कंपनीला सर्व हिंदुस्थानद्वीपकल्पावर स्वामित्व मिळालें. मार्क्किस ऑफ् वेलस्लीच्या अगोदर शंभर वर्षे मराठावीरांनी चौथाई व सरदेशमुखीची कल्पना काढून दिल्लीच्या तक्ताधीशाकडून ते हक्क मिळविले होते; त्या कल्पनेचीच पुनरावृत्ति मार्क्किस ऑफ् वेलस्लीची ही तहाची कल्पना होय. फरक इतकाच कीं, ही पुनरावृत्ति जरा जास्त सुधारलेल्या तत्वांवर सुरू केली होती. आतां मोंगल बादशहाकडून इ. स. १७१९ त मिळविलेले चौथाई व सरदेशमुखी हे हक्क, यांचे वास्तविक स्वरूप काय आहे हें, पन्नास वर्षांपूर्वी मराठा साम्राज्याचा संस्थापक शिवाजी यानें आपल्या कारकीर्दीच्या आरंभींच ज्या मागण्या मागितल्या होत्या, त्यांचें इतिहासदृष्ट्या थोडेंसें विवेचन केल्याशिवाय, नीटसें लक्ष्यांत येणार नाहीं. फार पूर्वी म्हणजे इ. स. १६५० तच या मागणीचा प्रथम उल्लेख आढळून येतो. त्या वेळेस शिवाजीच्या मुलखाची हद्द पुणें व सुपें व आसपासचे कांहीं किल्ले, इतक्यांतील त्याच्या बापाच्या जहागिरीच्या बाहेर कांही गेली नव्हती. महाराष्ट्रामध्यें आपणांस सरदेशमुखीचें वतन मिळावें अशी शिवाजीची इच्छा होती असें दिसतें. शिवाजीचें घराणें दोन पिढ्यांपर्येंत चांगलें प्रतिष्ठित व प्रतापी होतें ; आणि त्या घराण्याचा मालवडीचे घाटगे, फलटणचे निंबाळकर, जतचे डफळे, सावंतवाडीचे भोंसले, इत्यादि फार पुरातन देशमुख घराण्याबरोबर जरी बेटी व्यवहार झाला होता, तरी या देशमुख घराण्यांच्या बरोबरीचा हक्क शिवाजीच्या आजास व बापाससुद्धां कधींच मिळाला नाहीं. अदिलशाही व निजामशाही राज्याची स्थापना झाल्यापासून आपलें वतन चालत आलें आहे असें हे देशमुख म्हणत यांना देशमुख हा हुद्दा होता म्हणून राज्यांत स्वस्थता व शांतता राखण्याचे काम त्यांच्याकडे होतें व त्यांना तोडून दिलेल्या प्रांतांचा वसूल करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असे. या वसुलांतून त्यांना शेंकडा १०पर्येत रकम मिळे. पैकी शेंकडा पांच रोकड किंवा धान्याच्या रूपानें, व बाकी ९ बद्दल शेतकीची जमीन मिळे. तेव्हां हें सरदेशमुखीचें वतन आपणास असावें अशी इच्छा शिवाजीस होणें साहजिकच आहे.