[ ७८ ]
श्री. शके १६५४ चैत्र वा। १०
मा। अनाम देशमुख मोकदम देशपांडे की सासवड यांसिः-- बाजीराऊ बल्लाळ प्रधान. सुहुरसन इसने सलासीन मया अलफ. दत्ताजी मोहिता–विठोजी मोहिते याचा लेक वस्ति का। मजकूर, हा, आपले बापापाशीं कजिया करितो ह्यणून कळलें. त्याजवरून हें पत्र सादर केलें असें. तरी तुह्मी हरदुजणास ताकीद करून, काजिया न करीत तें करणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ० २४ सवाल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहुनरपति
हर्षनिधान बाजी-
राव बल्लाळ मुख्य
प्रधान.