[ ७२ ]
श्री. पौ। छ० १९ सफर.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री माहादोबासः-
प्रति अंबाजी त्रिंबक आशिर्वाद उपरि. आह्मी ता। छ. ८ सफर परियंत कुशळ असो. विशेष. तुह्मी राघोजी बाजीसमगमें ऐवज परिंचियास पाठविला. त्यास चिरंजीव बाबा सरनाईक याचे पदरीं घातला, रु॥ ५,९९५ पांच हजार नबशें पंच्याण्णव घातले. ते रु॥ धोंडजी पवार यासमागमें आह्मांकडे पाठविले. ते सातारियास आले. रामाजी नाईक अनंगळ यास आणून खरे करून घेतले. बिता।. रुपये
ऐन माल खरे रूपये पाडेसार रूपये.
५,१७० ३८५ सावनूर यास बट्टा रु॥ ११॥
२०० कमवजनी यास बट्टा रु॥ १०
१८५ पेगिणीच्या शिक्क्याचे
यास बट्टा रु॥ २३
२६ गैरसाल यास बट्टा रु॥ १॥
६ पनाळी यास बट्टा -॥।-
१८ हिणाचे यासि बट्टा रु॥ ३॥=
५ तांबियाचे, यासि बट्टा -॥
------ --------
८२५ ५५।=
एकूण पांचहजारनवशेपंच्याणव रुपये आह्माजवळ पावले. त्यास रुपये वोंगळ निघावयास कारण काय ? हा ऐवज कोणे सालीचा ? कोणाकडून आला ? खरा पैका कोणें करून घेतला ? हें बर्तमान चिरंजीव धोंडोबा व नारो माहादेव व राघोजी बाजी यांस पुसोन कोणाकडील ऐवज कोण्या सालांत आला ? कोणें खरा करून दिल्हा ? हें हकिकांत मनास आणून लेहून पाठवणें. ज्यांणी ऐवज खरा करून दिल्हा असेल, त्यांस आह्मांकडे पाठवून देणें. येविशीं अनमान न करणें. हा आशिर्वाद.