[ ७५ ]
श्रीरामप्रसन्न.
शके १६५४.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री अंबाजीपंत स्वामी गोसावी यांसिः--
पो। नारो शंकर नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान कळों आलें. ऐसियास, तुमच्या भिडेच्याप्रसंगेकरून रा। गोविंद आपाजी याजपाशीं मान्य केलें कीं, जे गांवकरी सातारियास गेले होते ते अवघे येथें आणावे. त्यांणी तेथें सांगितलें त्याप्रमाणें येथें सांगावे. येथें दुसरी गोष्टी जो विचार आहे तो तुह्मी जाणतच आहां. वेदमूर्ति रघुनाथभट्ट काशीकर यांणीं तुह्मांस शिवपुरी सांगितलेंच असेल; व राजश्री कृष्णराउ यांणीही तुह्मांस लेहून पाठविलेंच होतें. हालीं गोविंद आपाजी याजपाशीं त्याजप्रों। बोली केली आहे. त्याप्रों।, बोलीचा निर्वाह व गांवकरी अवघे येथें आलियानें कार्य होईल. वरकड तुह्मीं आलेत न आलेत याचा कांहीं आग्रह नाहीं. तुमचा हरकोणी आला तरी कार्यास येईल. परंतु गांवकरी व निर्वाह बोली करून पाठवून दीजे. बहुत काय लिहिणें ? लोभ * * असो देणें. हे विनंति.