[ ७४ ]
श्री.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री निळोबा स्वामी गोसावी यासि:--
पोप्य गोविंद खंडेराव दंडवत प्रा। विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. मागील सात सालें तुह्मांकड़ील हिशेब घेऊन यावयाविसीं श्रीमंतांनीं तुह्मांस लिहिलें आहे. त्यास, सात सालांचे विशेब वगैरे मागील दाखले जे असतील, ते घेऊन, तुह्मी व राजश्री जयरामपंत मिळोन यावयाचें, अनमान न करितां, करणें. येतांना सासवडास जाऊन तेथें राजश्री नानाचे दर्शन घेऊन यावयाचें करावें. अनमान न करितां लौकर लौकर येणें. + बहुत काय लिहणें ? लोभ असो दीजे, हे विनंति.