[ ७३ ]
श्री.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बापूजीपंत स्वामी गोसावि यांसि :--
पो। बाजीराउ बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. बापूजी बिन्न जावजी सातव निमे पाटील, मौजे वाघोली, ता। हवेली प्रांत पुणें याणें हुजूर येऊन विदित केलें की, आपण निमे मोकोदमीचा वडील असतां, आपला भाऊ बहिरजी सातव वडिलपणाचा कारभार व मानपान बळेंच खातो. तरी साहेबीं आपले वडिलपण असतां बहिरजी सातव रेटाई करून, बळेंच कारभार करितो. त्यास हुजूर आणून बार हक मनास आणून आपलें वडिलपण आपले दुमाला केलें पाहिजे. ह्मणून विनंति केली. त्यावरून हें पत्र तुह्मांस लिहिलें असे. तरी हरदोजणांस आणून रास्ती बार हक्क मनास आणून ज्याचें वडिलपण असेल, त्याचें दुमाला करविलें पाहिजे. लोभ असो दीजे. हे विनंति.