॥ श्री ॥
शके १६६७
सुहरसन सात अर्बैन मया व अलफ.
आह्मी चाळीस वर्षे गांव टाकून गेलों. ते समयीं कारकीर्द तुकोजी भोसले, हवलदार किले पांडवगड, यांनी बोपर्डीवर तोहमत ठेऊन, पाटील कुळकर्णी गडास नेऊन, खंड घेतला. त्यापै॥ कुळकर्णाचे वाटणीचे रु॥ २२३ ऐवज तुह्मी दिल्हे. दसरोजी पाटील यांनीं कजिये खोकले करून, चांदकच्या थलास गावकर तुह्मी जाऊन, त्यांचा पैका गावसमंधें करार केला. त्याची तिजाई तुह्मावरी पडली. ते रु॥ तुह्मी व नरसीपंत यांनीं दिल्हे. आनंदराव पुडदुलखानी यानें गावची पाहणी करून, पडची वहितें करून, हिशेब करून, गावची उगवणी करून घेतली. त्यापै॥ रुपये १२४ एकशे चौवीस तुह्मांपासून घेतले. व किरकोळथोडे बहुत पडले आहे ह्मणता. त्यास, आपण गावांत सोध करून, खरें जें असेल, त्याचा विभाग निम्मे बापभाऊ वजा करून, व निमे तुह्मी, आह्मी, व रा॥ मल्हारपंत ऐसे तिघेजण भाऊ, आपले वाटणीस येईल तें, त्याची निशा करूं. सदरहु तीन कलमाचे रु॥ व दसरोजी यानें तुमचीं घोडी व रा॥ नरसोपंत यांचे पेंव काढून नेलें. त्याचा सोध करून सर्व तकशीमेचा तुह्मा देऊन. त्याचे कतबे सिधभट ढवळेकर यांचे नावाचे रा॥ नरसीपंत व रामाजीपंत याचे कतबे व हिसेबाची तबलख होती ती राजकादेवकांत गमाविली.