॥ श्री. ॥
शके १६६८
श्रीमंत महाराज मातुश्री आई साहेबाचे सेवेशी.
विनंती सेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना सेवकाचे वर्तमान ता + + + + पर्यंत साहेबाचे कृपावलोकनें करून यथास्थीत असे. विनंती वगैरे. साहेब आपले सनदेनें राजश्री गोविंद खंडेराव चिटनवीस यास दिल्हें. असें असतां कोल्यावर राजश्री जगजीवन पंडित जाऊन मोर्चे लाविले आहेत. मशार निलेची मुलें माणसें ते जागा. केवळ त्यांचे आबरुवरच उठावें, हें त्यांस उचित नव्हे. ते साहेब धनी आहेत. साहेबाचे हुकमाखेरीज कोण आहे ? उत्तम पक्ष, मशारनिलेकडे ठाणे आहे, तैसे असों द्यावें. सेवक हुजूर येऊन ते समयीं साहेब आज्ञा करतील, त्याप्रमाणें वर्तणूक करून. गोविंदराव राज्यांतील सेवक काहीं मवास नव्हे. साहेबीं ठाणें द्यावयाची आज्ञा केली तरी आह्मी ठाणे देऊं. अन्यत्राप्रमाणें त्याची इजत घ्यावी असें नाहीं. ठाणें मशारनिलेकडे येऊन पंडीत मशारनिलेकडे मातबर.