लेखांक २४१
श्री
श्रीशिवभक्तीपरायण तपोनिधी भवानगिरी गोसावी यास प्रती राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मी पत्र पाठविले तें पावले मौजे इडमिडे प्रांत वाई हा गाव अन्नछत्रास स्वामी चालवितात ऐसे असता गावाकडे सात पाचा वर्षाची बाकी १८ खडी पावेतो आहे त्याचा निर्वाह गावकरी करून देत नाहीत चौ खडीचे पेव चोरानी नेले त्याची निसबत चौगल्याकडे लागली आहे परतु तो कथळा करितो बोलाउ पाठविल्याने आपणाकडे देत नाही साप्रत हुजूर गेले आहेत ऐशीयास आह्मी स्वामीसनिध दतगिरी गोसावी व त्र्यबक जिवाजी पाठविले आहेत हे वर्तमान विदित करितील ते मनास आणून पारपत्य केले पाहिजे ह्मणून लिहिले ते कळो आले व दतगिरी गोसावी व त्र्यबक जिवाजी हुजूर आले याणीही निवेदन केले ऐशीयास मौजे मजकुरचे पाटील कुलकर्णी हुजुर आलेयाचे वर्तमान मनास आणिता गावीचा हिशेब कितेब मनास आणून निर्वाह करावा लागतो याकरिता पाटील कुलकर्णी व चौगला यास राजश्री जगजीवन नारायण देशाधिकारी प्रात वाई याकडे पाठविले आहे तरी तुह्मीही त्याजकडे जाणे ह्मणीजे ते मौजे मा।रचा हिशेब कितेब मनास आणितील व बाकी कोण्हेबाबेची कैसी वोढते हे रुजु मोझ्याने खरेखुरे करितील आणि तुह्मास मागतील तेणेप्रमाणे तुह्मी उसूल घेणे जाजती तगादा येकजरा न लावणे पेव चोरानी नेले याचा करीना मनास आणिता चौगला ह्मणतो की आपण चोर दाऊन देतो त्यास चौगला ज्याणे पेव काहाडून नेले आहे त्यास दाऊन देईल त्याजपासून तुह्मी आपल्या गल्याचा निर्वाह करून घेणे चौगल्यास उपसर्ग न लावणे पेवाच्या कथळ्यामुळे त्याजपासून जे घेतले असेल ते मजुरा देणे वरकडी मठाकडे बाकी वोढते त्याचा निर्वाह जगजीवन नारायण रुजू मोझ्या हिशेबकितेब पाहोन विलायतशर्तप्रो। विल्हे करून देतील ते खाणे जाजती तगादा गावास एकंदर (पुढे लिहिले नाही)