॥ श्री ॥
शके १६६८ पौष शुद्ध ८
चिरंजीव राजश्री सदोबा यांसी बाळाजी बाजीराव आशीरर्वाद उपरी येथील कुशल ता। छ ७ जिल्हेज जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणें. विशेषः- राजश्री स्वामींनी सौ॥ मातुश्रीबाई साहेब यांज कडील रवानगीचे लाखोटे ४ च्यार दिल्हे ते पाठविले असेत, ते त्यांस पावते करावे. सौ॥ मातुश्री बाईसाहेब सातारां कधीं येणार? काय विचार केला आहे ? मुकाम कोठें कोठें नेमले आहेत ? तें लिहिणें. श्रीपत रायाची बहुत करून समजाविसी जाहलीच आहे. माघारें मात्र यावयाचे आहे. येतील. आजचे नवल विषेश वर्तमान ल्याहावया योग्य नाही. हे आशीर्वाद.