॥ श्री ॥
नकल
शके १६६८ श्रावण शुद्ध १३
राजश्री गोविंदराव चिटणवीस गोसावी यांसि
सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य रा॥ दमाजीराऊ गायकवाड राम राम विनंती येथील कुशळ जाणून स्वकीये कुशललेखन करीत असावें विशेष. सातार मुकामी. सर्व बोलणें जाहलें आहेच. असें असतां चिरंजीव मुलास आधार मिळून आपला आहे. गुजराथप्रांतीं पोहोंचलों ह्मणजे बोलण्याप्रमाणें तजवीज करितों. चिरंजीव आपले जवळ ठेवून बरदास्त ठेवावी. आपले असामीवर कारकून पाठवावा. करारा प्रमाणें नेमणुक चालवीन व पागा आली तरी बंदोबस्त राहील. नेम ठरला. खासा आला असतां पंचवीस हजार व पागेस येकवीस हजार व कारकुनांस पांच हजार ऐकूण एकावन हजार देत जाऊ. यास अंतर करणार नाही. दरबारचे काम काजाचें बोलणें सर्व आपणाकडे मन मोकळेपणानी ही सरदारी आपली समजून जे करणें ते करावें. मी आपल्याशी शफतपूर्वक आंतर करणार नाहीं. वारंवार काय ल्याहावें ? चिरंजीव आपणासी मजकूर समजावितील त्यावरून ध्यानास येईल. रा। छ ११ रजब बहुत काय लि॥ हे विनंती.
पो। छ १७ रमजान सन सबा आर्बैन मयावआलफ
संवत १८०३