[४५३]
श्री.
१ मानाजी आंगरे
१ राघोजी आंगरं
१ मानाजी आंगरे
१ बाबूराव आंगरे
१ मानाजी आंगरे
यादी वंशावळ आंगरे कान्होजी आंगरे यांचे बायकोस पुत्र दोन त्यांची नांवें :-
वडिलेस धाकटे संभाजी आंगरे.
उभयताचे नक्कल. सा। राखीस संतान जाले ते बा। कान्होजी आंगरे यांस राखी ३
त्यांस संतती
१ तुलाजी आंगरे येकी राखीस जाले. संभाजी आंगरे याचा काल जाला ते समई संभाजी आंगरे काईम दौलतीवरि असतां, त्याचे हाताखाली तुलाजी आंगरे कारभार करित होते. त्यांणीं श्रीमत् शाहू महाराजास विनंती करून आपले नांवें वस्त्रें घेतलीं. संस्थान चालूं लागलें ब्राह्मणांस उपद्रव फार केला. सबब, नानासाहेब पेशवे यांणीं महाराज कैलासवासी जाल्यावरि तुलाजी आंगरे यांस बहुत सांगोन पाहिलें; वकील पाठविले; तत्रापि न ऐकत. तेव्हां इंग्रज अनकूल करून घेऊन तुलाजी आंगरे धरिलें. किले वंदन येथें बेडी घालून ठेविलें ते बंदांत मेले. त्याचे पोटीं संतान कैदेत राखी ठेविल्या त्यास जालें त्यांची नांवें.
तुलाजी आंगरे वारल्यानंतर ती मुलें कोठें गेलीं, त्याचें ठिकाण समजलें नाहीं.
१ मानाजी आंगरे हें श्रीमंताचे आश्रयें कुलाबा वगैरे तीन किल्ले घेऊन राहिले. त्यांणीं शूरत्वाचेयागें कान्होजी आंगरे याचे खासे पुत्रास अगर तुलाजी आंगरे यास लक्षांत आणिले नाही. त्याचे पुत्रः--
१ राघोजी आंगरे. त्यांची संतती हल्लीं कुलाब्यास आहे.
१ तिसरे राखीस पुत्र जाहला. बाबूराव आंगरे व त्या पुत्राची कन्या महादजी शिंदे यांचे पुतणे यास दिल्ही. तिचे पोटी दौलतराव शिंदे जाले. ते महादजी शिंदे यांणी दत्तक घेतले. बाबूराव आंगरे दौलतराव शिंदे यांचे मामा. त्यांणी शिंदे याचे जबरदस्तीनें राघोजी आंगरे यांची मुलें कैद करून आपण संस्थानची वहिवाट करूं लागले पुढें बाबूराव आंगरे याचा काल जाल्यावरि कारभारी यांणी राघोजी आंगरे यांची मुलें हाती धरून कारभार चालविला.
---------------
चेउल उंदेरीपैकीं उत्पन्न केलें
चेउलपो।
१ आंगरे यांजकडुन इनाम आहे. त्याजवरि हक्कदारी घ्यावी असा करार केला.
१ नाना फडणीस यांजकडे
१ हरिपंत तात्या
१ विसाजीपंत लेले
१ सखारामपंत बापु
--------------