[४५७ ]
श्री.
यादी हिंगणे याचे दौलतीस मूळ पुरुष वैकुंठवासी महादेव गोविंद हिंगणे. त्यासी पुत्र चौघे. वडील पुत्र बापूजी माहादेव, दुसरे पुत्र दामोदर माहादेव, तिसरे पुत्र पुरुषोत्तम माहादेव, चवथे पुत्र देवराव माहादेव, धाकट्याचा पुढें विस्तार. पुरुषोत्तम माहादेव यांचे नातू देवराव गोविंद, हाली बांद्यास आहेत. बापूजी माहादेव याचे पुत्र माधवराव झांशीस आहेत. त्यांचे पुत्र बापूजी माहादेव आपले वडिलापासून झांशीस होते ते येथें आले. देवराव महादेव यास पुत्र चोघे. वडील दामोदर देवराऊ, धाकटे पुरुषोत्तम देवराऊ. त्यास पुत्र दोघे. ज्येष्ठ अमृतराव पुरुषोत्तम, दुसरे गणपतराव. ते दामोदर देवराव यांनी घेतले. दामोदर देवराव याचा वृद्धापकाळ जाला तेव्हां वडीलपणा अमृतराव पुरुषोत्तम चांदेरीचे जागिरीवर वहिवाटीस आहेत, त्यास पुरुषोत्तम माहादेव व बापूजी माहादेव यांचे मागें दौलतीचें काम देवराव माहादेव यांणी केलें. त्यांचे मागें पुत्र दोन. वडील दामोदर देवराव हिंदुस्थानांत होते. येथें हुकुम पुरुषोत्तम देवराव यांनी दौलतीचे काम केलें. त्यांचे मागें अमृतराव पुरुषोत्तम यांनी केलें. हालीं करितात चांदोरी मुक्कामीं आहेत. बापूजी माहादेव यांचा वंश. नातू बापूजी माहादेव वडिलापासून चांदोरी मु॥ आले. ते विभाग मागावयास लागले. येविसीं खटला केला की, आजपरियंत तुह्मी व आह्मी एकत्र असतां तुह्मी उभयतां चुलते पुतणे विभक्त होऊन वाटणी करून घेतली, याचें कारण काय ? त्यास, आमचा विभाग आह्मांस द्यावा. तुह्मी आपले तिसरे विभागांत वाटणी तुह्मी करून घ्यावी. आमचे विभागाचे धनी तुह्मी कीं काय ? त्यास दौलतीचे विभागी तिघे; तिघांचा वंश कायम आहों. तीन वाटण्या कराव्या. याप्रों। खटपट केली; आणि त्याजवरून रुसून येऊन नाशिक मुक्कामीं कुंपिणी सरकारांत अर्जी लिहून पाठविली. त्याजवरून बापूजी माहादेव यास पुणें मुक्कामीचा बोलावण्याचा सरकारचा हुकुम आला. तेव्हां पुणे मुक्कामी जाण्यास तयार जाले. त्याजवरून मी पुणें