[ ५५८ ]
श्री.
राजश्री दामोदर माहादेऊ गोसावी यासी :--
राजश्री दामोदर माहादेऊ गोसावी यासी:----
स्नो मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि. येथून जातेसमयीं नवाब समसामदौला आह्मांसी बोलून गेले की, शहरांत जाऊन राजश्री सेटीबाकडील घोडी पाठवून देतों. त्यावरून चारही हत्ती त्यांचे स्वाधीन केले. त्यासी, तुह्मी वजिरास व समसामदौला यासी बहुत प्रकारें सांगणें. घोडीं राजश्री बापूजी त्र्यंबक यांचे स्वाधीन करून पाठवून देतील. पातशाहाकडील घोडे दोन आले होते. ते डसरे, एक दोन माणसें जाया केली. आमचे कार्याचे नाहीत. याजकरितां फिरोन पाठविले असत. त्यांचे स्वाधीन करणें. रा॥ छ ७ रबिलावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तबसुद )