[ ६१४ ]
श्रीर्जयति मार्गशीर्ष शु॥ १३ शके १६५३
राजश्री मल्हार होळकर गोसावी यासी.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. नंदलाल मंडलाई प्रगणे इंदूर हे पहिलेपासून निष्ठेनें वर्तत आहेत. हाली ते मृत्य पावले गेले. त्यांचे पुत्र मंडलाई रा। तेजकर्ण कुवर न्याहालकर्ण हेही त्याजप्रमाणें निष्ठेनें वर्ततात. ऐसियास, त्या प्रांतें प्रा इंदूर हे जागा आपली आहे. त्याचे मागें त्याचें पुत्राचें चालव वें हें उचित आहे. आणि आपले कामाचे गोष्ट आहे. यास्तव तुह्मास हें पत्र लिहिलें असे. तरी मारनिलेवर हरएकविसी साल मजकुरीं साल गुदस्तास त्यात करून अगत्यवादेकडून सर्वस्वें चालविणें. येविसी आह्मासही अगत्व आहे. तुह्मी लक्ष प्रकारें याजवरील साल-गुदस्तांत खंडनीस रुपये ५००० पांच हजार सोडून बाकी सालमजकुरी घेऊन रयात करणें. हरएकविसी आजार न देणें. माळवे प्रांते हे आपले कायावे आहेत. त्याचे लिहिणेप्रमाणें चालवावयास अंतर न करणे. जाणिजे. छ ११ माहे जमादिलाखर.