[ ६१३ ]
श्रीराम कार्तिक शु॥ ४ शके १६५३.
नकलखत बमोहर राजश्री बाजीराय पंत प्रधान. बाबत छ माहे २ जमादिलावल. मतलब. मा। अनाम. मंडलाई तेजकर्ण प्रा। इंदोर यासी बाजीराय बल्लाळ प्रधान. सु॥ इसन्प्ने सल्लालीन मया अलफ. तुह्मा विनंतिपत्र पाठविलें तें पावोन सविस्तर कळलें. नंदलाल मंडलाई यास देवाज्ञा जाली. आपले प्रकारें चालवावें ह्मणून कितेक निष्ठापुरस्कर लिहिलें ते कळले. ऐसियासि माळवा प्रांतीचे यखतियार राजश्री मल्हारजी होळकर, राजश्री राणोजी सिंदे यांसि देऊन पाठविले आहेत. यास तुमचा गोर करावयासि कितेक आज्ञा केली आहे. उभयता मा।रनिल्हे आज्ञेप्रमाणें तुमची गोर करितील. तुह्मी त्यांस भेटोन कामकाज करीत जाणें. तुमचा सर्वप्रकारें आह्मास अभिमान आहे. तदनरूप निर्वाह होईल. चिंता न करणें. आपले वर्तमान वरचेवर लिहित जाणें. जाणिजे.