[ ६१५ ]
श्रीशंकर.
फाल्गुन शु॥ ११ शके १६५३
राजश्री राव तेजकर्णजी मंडलाई व कुंवर न्याहालकरणजी गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। नारो शंकर व मल्हार गोपाळ नमस्कार. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. उपर. आपण राजश्री सुभेदारांपासून खंडणीच्या तहाबद्दल आलों असों. एविषयी राजश्री सुभेदारांचही लिहिलें आहे. तर तुह्मी आपले समाधानं भेटीस येणं. खंडणीचा तह केला जाईल. रवाना छ ९ रमजान. मोर्तबसुद. हरएकविषयीं वसवास न करणें. खातरजमेनं आलं पाहिजे. विशेष काय लिहिणें हे विनंति.
मोर्तब
सुद
० श्री ॅ
मंगलमूर्ति
चरणीं तत्पर
नारो शंकर
नीरंतर