लेखांक ३२७
श्री
रामराम
मा। अनाम कान्होजी राजे जेधे देसमुख ता। रोहिडा तरफ भोर यासि राजश्री मुधोजी वणगोजी नाईक विनति एथील क्षेम जाणउनु तुह्मी आपले क्षेम लिहिणे उपेरी कागद पाठविला सकल अभिप्राय विदित जाहाला लिहिले की रजा जालिया इसाबतीच्या कामाबदल हुजूर एउनु ह्मणउनु तरी बहुत बरवे कागद देखता च स्वार होउनु एणे एक घडीचे देर न करणे आह्मास हजरत अलमपन्हा साहेब रोहिड तरफेस नामजाद करिताती याकरिता स्वार होता वेळी जवळी असिलेस ह्मणिजे तुह्मास हाती धरून हजरतीचे बादगीस अर्ज करून इसाबती व हकलाजिमा व इनामबाब असे तुमचे दुमाला करउनु व आपणा बराबरी नामजादी घेउनु सकल अर्थ बरवा च होईल सत्वरन एइजे कोणे बाबे काही फिकीर न कीजे तुमचे जैसे मनोगत आहे तैसी सरंजामी करून रा। छ ९ जिल्हेज