लेखांक ३२५
श्री
रामराम
राजश्री कान्होजी राजे जेधे
देशमुख ता। रोहिड व भोर
.॥ श्री मसुल हजरती अखंडित लक्षुमी प्रसन परउपकारमूर्ति माहामेरु राजमान्य राजश्री गोसावी यासि स्नहअकित राजश्री साबाजी मुधोजी नाईक प्रतिपूर्वक विनंती येथील क्षेम जाणौनु अपले क्षेम लिहिती अनुज्ञा देणे विसई राउले कृपा करुनु पत्रिका पाठविली स्वरूपवाद मनास अली लिहिले की बहुत दिवस जाहाले साभालपत्र आले नाही तेणेकरुनु तुह्मास वाटते ह्मणौनु बहुत काही तपसिल लिहिले तरी ते तरफेहून माहानगरास आलो याकरिता पत्रास अतर पडले फरमन तुह्मापासी होते तुह्मा अह्मात इतका उपचार काय लिहिणे आह्मी काही तुह्मावेगळे नाही व लिहिले की पताजीपत हेजिब पाठविले हरियेकविसी दिवाणात वाकिब होउनु काम सरजाम केले पाहिजे ह्मणौनु लिहिले तरी हे लेहाव लागत नाही हे फिकीर अह्मास पुर्वीपासून आहे आता समयानसार हरवक्त जेव्हा दिवाणात जातो तेव्हा तुमचे च कामाचे आह्मास स्मरण आहे देव बरे च करील तुमचे अकीन हरी आहे बाजे बाब अवघे हवाल पंडित मशारनुलस सांगितला आहे ते लिहितील त्यावरुनु कलो येईल कृपा अखंडित असो दीजे हे विनती अपण हि काही दौलतखोईस अतर पडो ने दीजे अह्मी खत खानसाहेबास मालूम करुनु सरजाम करुनु देवउ