लेखांक ३२८
श्री
रामराम
मा। आ। राजश्री कान्होजी जेधे राजश्री मुधोजी वणगोजी नाईक राम राम विनति उपरि हजरत साहेबी आह्मास मदती खा। दिलावरखान व भोसले व बाजे वजीर असे वजारतपन्हाह मदती एताती गनीम हि स्वार होउनु पैलीकडे चालिले तरी तुह्मी मदतीसी कृष्णाजी राजे तुह्मी आह्मास मेणउनु घेणे दिरंग न करणे हे विनंति