भाषांच्या प्रगतीच्या चार पाय-या भाषाशास्त्रज्ञांनीं स्थूलमानानें ठरविलेल्या आहेत; (१) विश्लेष्टाक्षरात्मक, (२) श्लिष्टाक्षरात्मक, (३) विकृतिक्षम व (४) त्यक्तविकृति. ह्यांना (१) Monosyllabic (२) agglutinative,
(3) inflected, आणि (४) analytical, अशीं अनुक्रमिक नांवे युरोपियन लोकांनीं दिलेली आहेत. विश्लिष्टाक्षरात्मक भाषांत सर्व शब्द एकाक्षरी (monosyllabic) असतात. उदाहरणार्थ, चिनी भाषा. श्लिष्टाक्षरात्मक भाषांत अनेक एकाक्षरी शब्द दोन एकाक्षरी शब्दांच्या मध्यें घालून एक शब्द बनविला जातो. जशी, तुर्की भाषा. ह्या भाषांत शब्दांना विकृति किंवा प्रत्यय लागत नाहींत. सबंद शब्दांचा प्रत्ययाप्रमाणें उपयोग होतो. विकृतिक्षम भाषांत मूळ शब्दांस अनेक विकृति करण्याचा व शब्दांच्या अन्त्याक्षरांचा लोप होऊन बनलेल्या प्रत्ययांचा उपयोग करण्याचा प्रघात असतो; अशा संस्कृत, आरबी, लॅटिन, ग्रीक वगैरे. ह्या विकृतीचा आस्ते आस्ते त्याग करण्याकडे कित्येक भाषांची प्रवत्ती असते. उदाहरणार्थ, फारशी, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, बंगाली वगैरे. ह्या चवथ्या वर्गांतील ज्या भाषा सांगितल्या त्यांनीं शब्दांना विकृति करण्याचें अजीबात सोडून दिलें आहे असें नाहीं. त्यक्तविकृति अशी संज्ञा ह्या भाषांना देण्यांत मतलब इतकाच आहे कीं, विकृतिकार्य सोडण्याकडे ह्या भाषांची आस्ते आस्ते प्रवृत्ति होत आहे. ह्या त्यक्तविकृति भाषांपैकीं कित्येक भाषा विकृतित्यागाच्या कामी ब-याच पुढें गेल्या आहेत व कित्येक तितक्या पुढें गेल्या नाहींत. उदाहरणार्थ, मराठींत अद्यापि सात विकृत विभक्त्या आहेत, फारशींत चारच आहेत, आणि इंग्रजींत विकृति होऊन होणारी विभक्ति म्हटली म्हणजे s प्रत्यय लावून होणारी षष्ठीच कायती एक उरली आहे व तिचेंहि बहुतेक कार्य अलीकडे of, to वगैरे शब्दयोगी अव्ययेंच करतात. उदाहरणार्थ, राम ह्या शब्दाच्या विभक्त्या तिन्ही भाषांत चालवून दाखवितोंः:-(खालील तक्ता पाहण्यासाठी येथे क्लीक करा)
येथे मराठींत प्रथमेला बिलकुल विकृति झाली नाहीं; व अविकृत असें द्वितीयेचें व संबोधनाचें राम रूप होतें. बाकीच्या सर्व विभक्त्यांत राम हा शब्द विकृत होतो. फारशींत, रामरा, बराम्, इराम् व रामा अशीं द्वितीय, चतुर्थी, षष्ठी व संबोधन, ह्या चार विभक्त्यांत विकृत रूपें होतात. आणि इंग्रजींत राम् sअसें षष्ठीचें एकच विकृत रूप आहे व त्याचाहि किचितच उपयोग करतात. ह्यावरून विकृतींचा त्याग करण्यांत इंग्रजीचा पहिला, फारशीचा दुसरा व मराठीचा तिसरा, असे नंबर लागतात. जुन्या मराठींत रामू किंवा रामो अशी विकृत रूपें होत असत. तीं अर्वाचीन मराठीनें सध्यां सोडून दिलीं आहेत. (खालील तक्ता पाहण्यासाठी येथे क्लीक करा)
येथें मराठींत पुस धातूला तिन्हीं पुरुषांत, दोन्ही वचनांत व तिन्ही लिंगांत विकृति होते. फारशींत तिन्ही पुरुषांत व दोन्ही वचनांत विकृति होते; लिंगांत होत नाहीं. इंग्रजींत द्वितीय पुरुषी एकवचनी व तृतीय पुरुषी एकवचनीं मात्र विकृति होते; बाकी पुरुषांत, वचनांत व लिंगांत होत नाहीं. येथेंहि विकृतीचा त्याग करण्यांत इंग्रजीचा पहिला, फारशीचा दुसरा व मराठीचा तिसरा नंबर लागतो.
ह्माच क्रियापदांचीं भूतकालीं रूपें अर्शीं होतात. (खालील तक्ता पाहण्यासाठी येथे क्लीक करा)