Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २१७

श्री
१७०१ श्रावण वद्य ५

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर दंडवत विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान दोन तीन पत्रीं आपणांस लिहिलें आहे. त्यावरून ध्यानास आलें असेल. सरकारी वोढगस्त जाली. सरकार ऐवजाची निकड. याचा फडशा व्हावा. अर्थी सर्व प्रकारें वोढ सोसून ऐवजाचा पुरावा करीत गेलों. ऐसें असतां राजश्री अंताजी नागेश यांणीं सरकार व सावकार सचोटी राखिली नाही. हें मनास आणावें तरी आह्मी मसलतसीर आणि घरांतील नाना प्रकारचे पेंच. प्रसंग चहूंकडून विस्कलित, मारनिले गुदस्तां आह्मांकडे यावयासी आले. ते न भेटतां माघारें गेले. ते दुसाणीयास जाऊन राहिले. दरबारींही न गेले. प्रस्तुत आल्यावर मारनिले यांस सांगितलें कीं, दौलतीचा व दरबारचा बंदोबस्त करणे व मागें कारभार येख्तीयारीनें केला तो समजोन द्यावा. तें पुसल्यास ठिकाण नाहीं. ऐसें पक्केंपणें दृष्टीस आल्यावर मारनिले यांचा बंदोबस्त करणें प्राप्त आला. पुढें पाहतां, सरकार व सावकार व दौलतीचा पेंच भारी. येविसींची पैरवी होऊन मागील पुढील आमचे अर्थ आपणांस समजलेच पाहिजेत, ह्मणोन राजश्री बाळाजी नाईक भिडे यांजकडे राजश्री बाळाजी अनंत पा आहेत. हे सविस्तर मजकूर नाइकांस निवेदन करतील. तें ध्यानास आणून आपल्या जवळ नाईक बोलतील त्याप्रमाणें बंदोबस्त करून द्यावा. दौलत पेंचांत आली. मुलुखांत जीव राहिला नाहीं. हमेशा फौजेचा हंगाम. सर्व आपल्या ध्यानांत आहे. त्यास सरकार व सावकार यांचे पेंच उलगडून दौलतीची स्थिति राहे तें करावें. रा छ १९ माहे शाबान, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती. मोर्तबसुद.

पत्रांक २१५

श्री
१७०१ श्रावण शुद्ध ११

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांस:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहाद्दर दंडवतX विनंती येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. राजश्री अंताजी नागेश येथें आले. त्यांस आजपर्यंत सर्वप्रकारें येख्तयार मारनिल्हेवर ठेऊन चाललों. इकडे आह्मीं मसलतशीर असेंही असतां दरबारची पुरवणी करीत गेलों. आजपर्यंत दरबारचा गुंता उरकावा व राजश्री बाळाजी नाईक याचे देण्याची तोड निघावी. याप्रमाणें येथून पुरावा केला. ऐसें असतां, दरबारचा व नाइकाचे देण्याचा पेंच तसाच राहिला. यांचें येणें येथें न जालें. यामुळें दरबारचा जाबसाल समजल्यांत न आला. गुदस्ता तिकडोन आह्मांकडे आले त्यास, आह्मांस न भेटतां माघारे गेले, तो दुसाणीयास जाऊन बसून राहिले. दरबारीहि गेले नाहीं. दरबारचा शोध त्याशिवाय मनास न आणावा, तरी हे पहिलेपासून बखेडे. खोर, आह्मीं मसलतसीर. घरांतील खुळें नानाप्रकारचीं. फौजेचे पेंच, चहूंकडे बखेडे. त्याअर्थी कांहींच मनास न आणितां चालविलें. पुढें पाहतां, कोण्हे एक गोष्टीनें परिणाम दिसोन न आला. यामुळें मारनिलेचा बंदोबस्त करणें प्राप्त जाला. ये विसीचें सविस्तर राजश्री बाळाजी नाईक निवेदन करितील. तें ध्यानांत आणून, बंदोबस्त करून दिला पाहिजे. सर्व भरवसा आपला आहे. रा छ ९ माहे शाबान. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती. मोर्तबसुद,
शिक्का मागें दिल्या प्रमाणें,

पत्रांक २१४.

श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ६

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

पोष्य बाळाजी महादेव सा नमस्कार विनंति. येथील कुशल ता छ ४ साबान मुकाम बडोदें यथास्थित असे विशेष. येथून राजश्री बापूजीपंत यांनी आपल्यास पत्र लिा आहे. त्याजवरून सविस्तर समजेल व आह्मीं आपल्या लाखोटियांत श्रीमंत राजश्री तात्यांस पत्रें लिहिलीं आहेत तीं आपण पाहून एकांती तात्यांस द्यावीं. सर्व बंदोबस्त येथील आपल्याकडे आहे. आह्मीं ल्याहावें असें नाहीं. बहुत काय लिहिणें ! कृपालोभ असों दीजे हे विनंती.


पत्रांक २१३.

श्री.
(नक्कल) १७०१ श्रावण शुद्ध ४

राजश्री गोंदबा स्वामीचे सेवेसीं:-

विनंती उपरी, तुह्मी श्रीमंत राजश्री नानास व राजश्री बाळाजी नाईक नानांस पत्रें पार तें पाहून वर्तमान कळलें. लिहिल्याप्रमाणें सरकारचे ऐवजाचा निकाल पडल्यास सारी प्रमाणिकता आहे. नाईक पुष्कळ खातरजमा करितात. परंतु, श्रीमंताचे प्रत्ययास आले पाहिजे की नको ? येविंशीची काळजी धरून सरकारचा निकाल लवकर पडेसें करावें. सविस्तर नाईकाचे लिहिल्यावरून कळेल. बंधूविशीं काळजी न करावी. तजविजेनें आणऊ. शिलेदाराचा मजकूर कसकसा आहे तो लिहून पाठवावा. रा छ २ साबान. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.
रा गिती भाद्रपद शुद्ध * २ रविवार.

                                                                                लेखांक ३९२

                                                                                                                                                          १५४४ मार्गशीर्ष शुध्द १

                                                                                                               68 2

आज रखतखाने राजश्री संभाजी राजे साहेबू दामदौलतहू वजानेबू कारकुनानी हाल अस्तकबाल व देसमुखानी देहाये परगणे पाडियापेडगौव तरफ करडे बिदानद सु॥ सलास इसरीन अलफू बो। मुदगलभट व कृस्णभट बिन बाबदेऊभट सो। पुणे-चाकण यास बदल धर्मादाऊ इनाम अजरामर्‍हामती बदल दान सूर्यग्रहण जमीन काळा कीर्दी चावर एक १68 गज सराइनी दर सवाद मौजे बेलवडी ता। मजकूर देखील नखतयाती व चालूक ठाणे व तालूक देहाये व बाजे बाबा पायपोसी व खर्चपटी व वेठबिगारी व बाजेपटी कुल बाब कुल कानू दिधले असे बादा महसुलेसी दुमाले कीजे सदर्हू जमीन मेजून हद्दमहदूद घालुनु प्रज नेमून देउनु हुजूर खबर लिहिणे अवलाद अफलाद चालवीत जाइजे दर हर साल ताज्ये खुर्द खता उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे मोर्तब सूद

                                                                                                                                                                                                      393

तेरीख २९ माहे मोहरमू
मोहरमू

पत्रांक २१२.

श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ४.
पो मिती श्रावण वद्य २ रविवार.

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ कृतानेक सा नमस्कार विनंती येथील कुशल ता। छ २ माहे शाबान पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपणाकडे पेशजी भास्करपंतास पाठविले. त्या पत्रांची उत्तरे आपण आषाढ शुद्ध २ पाठविली व हालीं शुद्ध ३ आलीं. त्यास, पहिलीं पत्रें आशाढ वद्य १३ चीं साहा दिवसांचे वाईद्याचीं तीं पावलीं नाहींत. द्वितीयेचे पत्राचीं उत्तरें पाटविलीं तीं पावलींच असतील. त्यावरून कळलें असेल. राजश्री अंतोबा बाबांचा मजकूर तेथून भास्करपंताचे पत्रीं लिा कीं, तूर्त जलदी न करावी. दुसाण्याकडील बंदोबस्त जालियावरी उपरांत करणें ते करावें. आमचें लक्ष त्यांचे ठाईं दुसरें नव्हतें. परंतु यजमानाचें त्याचें दिवसें दिवस वांकडें पडत चाललें, आण आपण पत्रें साहा राजांचे मुदतीचीं पाठविलीं तीं पत्रें आह्मांस न पावली. व कासिदाचें ठिकाण नाहीं. तीं पत्रें त्यांस सांपडली. कशावरून ह्मणावें ? तरी बापूजी नरसी यांजपाशीं आपले पत्रांतील मजकूर बोलले. ते मशारनिलेनीं आजपर्यंत आम्हांशीं बोलले नव्हते. तें प्रस्तुत सविस्तर सांगितलें. व त्या गृहस्थाची चेर्या एक प्रकारची दिसून आली. येथील संशयाचा प्रकार कांहींच घडल्यांत नव्हता, आपलीं पत्रें आलीं त्याचें ठिकाण नाहीं. यांचा प्रकार निघोन जावयाचा यजमानास समजला. तेव्हां यजमानानें बंदोबस्त केला. दुसरें, राजश्री बापूजीपंताशी बोलून त्याचें उत्तर पाठवावें, ह्मणजे सरकारचीं पत्रें पाठवितों, दरबारचा बंदोबस्त केला आहे, म्हणोन लिहिलें. त्यास, याचीं उत्तरें पेशजीं आपणास लिहिलें होतें कीं, बापूजीपंत मारनिल्हेचे ममतेंत, यामुळें आम्हीं त्यांसीं बोललों नाहीं. उभयपक्षीं परस्परें संशय. परंतु पेसजीं आपली चिठी आली, व हालींचे पत्रीं लिा, यामुळें बापूजीपंताशीं ममतेचें बोलून चिठी दाखविली. याजवर त्यांनीं आह्मांस सांगितलं की, जें आमचें यजमानाचें लक्ष तेंच आमचें, दुसरा विचार नाहीं. ह्मणून यांचे व आमचें बोलणें जालें. ऐवजाचा मजकूर खासगत व सरकारचा जाबसाल. त्यास सरकारचें लक्ष राहून आपली सचोटी राहावी, याअर्थी सर्व प्रकारें येथील वोढ सोसून, ऐवजाचा भरणा करीत गेलों. याचे अर्थ सर्व ध्यानांत असतील व पुढें समजतील. दरबारची तोड निघावी व आपले देण्याचा मार्ग निघाला पाहिजे. त्यास, येथील प्रकार दौलत सर्व प्रकारें वोटीस आली. शिबंदीचे व शिलेदारांचे नित्य तंटे ! अशांतहि दरबारचा व आपले देण्याचा मार्ग काढिला पाहिजे. त्याचे तरतुदींत आहों. परंतु निभाऊन घेणें सर्व आपणाकडे आहे. येथील रड लिहितात, असें आपल्या समजल्यांत येईल. त्यास, परभारें समजलें तें खरें. आह्मीं कांहीं कारभारी नाहीं. दरबारी आपल्याशिवाय दुसरियास जाणत नाहीं. सर्व कारभार आपला व दौलतीचें संरक्षण करणें आपणाकडेसच आहे. आपले आज्ञेशिवाय दुसरा विचार नाहीं. आपली आज्ञा तें प्रमाण. आज्ञा प्रो वर्तणूक घडेल. वरकड सविस्तर राजश्री बापोजी नरसी लिहितील, त्याजवरून कळेल. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक २११

श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ४

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फतेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहाद्दर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. राजश्री अंताजी नागेश येथें आले. त्यास, आजपर्यंत सर्व प्रकारें येख्तीयार मारनिलेवर ठेऊन चाललों. इकडे आह्मी मसलतसीर, असेंहि असतां, दरबारची पुरवणी करीत गेलों. आजपर्यंत दरबारचा गुंता उरकावा, व राजश्री बाळाजी नाईकाचे देण्याची तोड निघावी, याप्रों येथून पुरावा केला. असें असतां, दरबारचा व नाईकाचे देण्याचा पेंच तसाच राहिला. यांचे येणें येथें न जालें. यामुळें दरबारचा जाब समजल्यांत न आला. गुदस्तां तिकडून आह्मांकडे आले. त्यास, आह्मांस न भेटतां माघारे गेले. ते दुसाणीयास जाऊन बसले. दरबारींहि न गेले. दरबारचा शोध त्याशिवाय मनास आणावा तरी, हे पाहेलपासून बखेडेखोर. आह्मी मसलतसीर, घरांतील खुळें नानाप्रकाची. फौजेचा पेंच. चहूंकडे बखेडे. त्याअर्थी कांहींच मनास न आणितां चालविलें. पुढें पाहतां कण्हे एक गोष्टीनें परिणाम दिसोन न आला. यामुळें माकनिलेचा बंदोबस्त करणें प्राप्त जालें. येविसीचें सविस्तर राजश्री बाळाजी नाईक निवेदन करतील, तें ध्यानांत आणून, बंदोबस्त करुन दिल्हा पाहिजे. तात्या ! आमचा तुमचा भाऊपणा. त्यापक्षीं तुह्मीं सांगितलें त्याप्रों तेंच लक्ष धरून इतके दिवस काहाडले. पुढें परिणाम सुध दिसों न आला. यास्तव हें करणें प्राप्त हे अनभव आपल्यास आले असतील. सर्व भर्वसा आपला आहे. रा छ २ माहे शाबान बहुत काय लिया ? लोभ कीजे हे विनंती. मोर्तबसुद. शिक्का
(मागे दिल्याप्रमाणें).

मग ते अळी । झडकारुनी हाकारिलीया । 
गौळणी माते येस्वदा धावोनि पाचारिलें तेथें । 
तुं जर म्हणसी लटिकें । आपुले पुत्राचे कौतुकें । 
अजी बहुतेका दिसा । हरि सापडले । 
सवें वडजा वाकुडा । पेंदा सुदामा रोकडा । 
वाळो दोंदिल बोबडा । आणि आठवा कृष्णु । 
ऐसे बोलिली गौळणी । ते अइकिलें चक्रपाणी । 
साता जणा तेथ घेऊनी । गेला कवणीकडे ॥४॥ 
मग तीं कुलुपें उघडुनि । भीतर आलिया गौळणी । 
भोवते पहाती भवनी । तेथ तव न दीसे कृष्णु । 
खांबीं पुसिले हात । तेथें लागलें नवनीत । 
येरी -हुदयीं विस्मित । चमत्कारु जाहाला । 
मग ती बोलिली येस्वदा । कोठें देखिलें गोविंदा । 
येरी भ्याली तिच्या शब्दा । कांहीं उत्तर नेदी ॥५।। 
बोलिली गौळणी बाळा । प्रौढ साजणी त्या वो म्हणती । 
राजनि! लोनी न समाये तुझे उतरडी । 
हांडोरी ती भली । तोंडवरी पानियाच्या धागरी । तेथें नवनीत । 
पानी तावनार डेरा । तो वा सांडतो सामोरा । 
तयावरील दुसरा । त्यासी जतन करी । 
तुझे अंगणीचा आडू । क्षीरसागराचा पाडू । 
तो अमृताहूनि गोडू । दुधें भरला असे । कृष्णु चोर ।।६॥ 
मग त्या बोलिल्या चतुरा । दैव आलें तुझ्या घरा । 
कैसा येक सरा । केला वा उगाचि । तुझी नांदणुक पैसी । 
चोरटे केले गे कृष्णासी । सांगे वेडिये नेणसी । 
तुज म्हणो वो काये? । जेव्हां हरिमुखीं अर्पिलें । 
म्हणुनि बहुत विस्तारलें । इतुकें कशानें साचलें । 
हें तु विचारी सये । 
कमळाकराचा दातारु । ने घे कवणाचा आभारु । 
कोटी शतगुणे विस्तारु । देतु असे ॥७॥
ह्या पदाचा कर्ता कोणी कमळाकर कवि आहे व ह्याची भाषा पंधराव्या शतकांतील किंवा सोळाव्याच्या पूर्वार्धांतील दिसते.

पत्रांक २१०

श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ४.

राजश्री पंतप्रधान गोसावी यांसी:-

श्रीसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबाहादर दंडवत विनंती येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष राजश्री अंताजी नागेश येथें आले. त्यास दरबारचे वगैरे जाबजाल पुसिले. येथून दरबारचे भरण्यास ऐवज दरसाल देत गेलों. तो सरकारांत न पावतां सरकारचा पेंच तसाच राहिला. असेंहि असतां, इतके दिवस चालविले. पुढें आमचे घरांतील पेंच, मारनिल्हेचा पहिलेपासून बखेडेखोर कारभार, या अर्थी याचा बंदोबस्त करणे अला. येविसीचे सविस्तर राजश्री बाळाजी नाईक निवेदन करतील. त्यावरून विदित होईल. या छ २ माहे शोबान, बहुत काय लि. हिणे १ लोभ करावा हे विनंती. मोर्तबसुद.


पत्रांक २०९.

श्री.
१७०१ अधिकं श्रावण वद्य १०

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबाहाद्दर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान राजश्री दादासाहेव व इंग्रज यांजकडील पेसजीं तिकडून बातमी येत गेली.. त्याप्रमाणें आपणाकडे लेहून पाठविलें. त्यावरून कळलें असेल. सुरत प्रांतीं माहालो. मोहालीं त्यांणीं ठाणीं बसविलीं होतीं. डभईस आपाजी आईतोळे याजला सरंजाम देऊन पाठविलें. थोडाबहुत सामान समागमें घेऊन नर्मदा नदी उतरून झाडेश्वरीं आले, ते माघारे उतरून सुरतेकडे गेले. गाजुदीखान यासीं अमदाबाद व बडोदें महीपार पाठवावें, ऐसें होतें. ते मसलत तूर्त राहिली. सांप्रत्य, बातमी आली कीं, इंग्रजांनी अठाविशींतील कमावीसदार बोलावून घेतले. मसलतीचा मजकूर कळलियांत आला नाहीं, ठरल्यांत आला असेल तो खरा. आह्मीं बाहिर निघावयाचे तरतुदींत आहों. फौजेचा देण्याचा पेंच तीं वर्षांचा पडला आहे. लोकांनीं गवगवा बहुत केला आहे. याची समजोति काढोन निघावयाचें होईल. वरकड बातमी तिकडील येईल तैसी लिहून पाठवू. रा छ २४ माहे रजब, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे, हे विनंती. मोर्तबसुद.