Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २०८.

श्री.
१७०१ अधिक श्रावण वद्य ९

राजश्री पंतप्रधान गोसावी यांसीः-

श्रीसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहाद्दर दंडवत विनंती येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान राजश्री दादासाहेब व इंग्रेज यांजकडील पेशजीं तिकडून बातमी येत गेली त्याप्रमाणें आपणाकडे लेहून पाठविलें, त्यावरून ध्यानास आलें असेल. सुरत प्रांतीं माहालोमाहालीं ठाणी बसऊन कमावीसदार पाठविले होते. डभईस आपाजी आईतोळे यांजबरोबर सरंजाम देऊन रवाना केलें. थोडा बहुत सामान समागमें घेऊन, नर्मदा उतरून, झाडेश्वरीं आले, ते माघारे सुरतेकडे गेले. गाजुदीखान यांजला अमदाबाद बडोदें महीपार पाठवावें, ऐसे होते. ते मसलत तूर्त राहिली. हालीं बातमी आली कीं, इंग्रज यांणीं अठ्ठाविसींतील कमाविसदार बलाऊन घेतले. मसलतीचा मजकूर कळणियांत आला नाहीं. काय ठरलियांत आला असेल तो खरा. आह्मीं बाहिर निघावयाचे तरतुदींत आहों. फौजेच्या देण्याचा पेंच ती वर्षांचा पडला आहे. लोकांनी गवगवा फार केला आहे. याची समजोती काढोन निघावयाचें होईल. सुरतेकडील बातमी जैसी येईल तैसी लिहून पाठऊं. रवाना छ २३ माहे रजब. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती. मोर्तबसुद.

 

पत्रांक २०७.

श्री.
१७०१ अधिक श्रावण वद्य ३

राजश्री वेंकटपती तिमया नायडू संस्थानक गोंदी गोसावी यांसीः-

अखंडीतलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव नारायण प्रघान आशीर्वाद. सुा समानीन मया व अलफ. राजश्री बाजी गोविंद यांचें कर्ज सुभाणा गिरमाजी व पांडुरंग गिरमाजी हरकारे यांजकडे त्रिंबकराव विश्वनाथ यांचे विद्यमानचे स्वारीचें येणें आहे. त्यास, सने अर्बासबैनांत सुभाणा गिरमाजी यास आणिलें. तें समईं त्यांणीं करार केला कीं महिन्याभरानें अर्कोटहून हंर्ड करून ऐवज पाठवितों. असें असतां अद्याप हुंडी आली नाहीं व जाबसाल देखील पाठविला नाहीं, ह्मणोन हुजूर विदित जालें. ऐशियास, येविशीचें काम रा बनाजी गोविंद कारकून यांस सांगोन पाठविलें आहे. तरी, तुह्मीं सुभाणा गिरमाजी व पांडुरंग गिरमाजी यांस बरे वजेनें ताकीद करून, मार, निल्हेचा वाजबी खताप्रमाणें व्याजसुद्धां हिशेब होईल तो ऐवज अर्काटचे सराफांत भरून, हुंडी करून, पुणियास जलद पाठऊन देणें. या कामास दिवसगत न लावणें. जाणिजे, छ १७ रजब. अज्ञाप्रमाण लेखनसीमा.

पत्रांक २०६.

श्री.
१७०१ अधिक श्रावण शुद्ध ११

राजश्री महादजी बाबा शिंदे गोसावी यांसीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरवहादर रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष, सांप्रत्य इकडील वर्तमान राजश्री दादासाहेब सुरतेस शहरांत आहेत. इंग्रजांकडील सरंजाम तापी दक्षण तीरीं आहे. रयतेचीं घरें मोडून, इमारत नवीन उभी करून, लोकांच्या घरांत छावणी केली आहे. याजमुळें लोक परागंदा होऊन गेलें. लावणी आबादीस ठिकाण नाहीं. माहाल खराब, बेचीराख जाले. रयतेस उपद्रव. पुढील भरंवसा न पुरे. तमाम माहाल उज्याड जाले. हालीं राजश्री दादासाहेब यांणीं अमदाबाद, बडोदें वे डभईकडे राजाराम गोविंद यांची रवानगीचा विचार ठरविला. शहरावाहीर येऊन राहिले होते, तें तहकूब ठेऊन, गाजुदीखान याची उभारणी करावयाचा निश्चय करून, नर्मदा अलीकडील बंदोबस्ताकरितां पाठवावें, समागमें सरंजाम पलटणें व स्वार व तोफा देऊन पाठिवणार, ह्मणोन बातमी आली आहे. अद्याप तेथेंच आहेत. इकडे येऊन बखेडा करणार येविसींचा बंदोबस्त ठेविला पाहिजे. स्वस्थतेचा अर्थ कांही दिसोन येत नाही. याजकरितां महीपलीकडे खंबायतकराचे तोंडावर तीन हजार फौज पेशजीं रवाना केलीच आहे. सुरतप्रांतींहि थोडीबहुत फौज आहे. आह्मीं मासपक्षांत निघावयाचे तरतुर्दीत आहों. फौजेचा देण्याचा पेंच तीन वर्षांचा जाला. त्याचा गवगवा पडला आहे. त्याची सोय करून निघावयाचें होईल. सरकारच्या फौजेची रवानगी होऊन लौकर आल्यास, उत्तम आहे. वरकड तिकडील बातमी जैसी येत जाईल, तैसी मागाहून लेहून पाठवू. कळावें. रवाना छ १० माहे रजब. बहुत काय लिहिणें? लोभ कीजे हे विनंती. मोर्तबसुद.

पत्रांक २०५.

श्री.
१७०१ अधिक श्रावण शुद्ध ११.

राजश्री पंत प्रधान गोसावी यांसीः-

श्रीसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबाहादर दंडवत विनंती येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. सांप्रत्य इकडील वर्तमान राजश्री दादासाहेब सुरतेस शहरांत आहेत. इंग्रजांकडील सरंजाम तापीदक्षणतीरीं रयतेचीं घरें मोडून, नवीन इमारत उभी करून लोकांच्या घरांत छावणी केली आहे. याजमुळें लोक परागंदा होऊन गेले. लावणीआबादीस ठिकाण नाहीं. माहाल खराब, बेचिराख जाले. रयतेस उपद्रव, पुढील भरवंसा न पुरे. याजकरितां तमाम माहाल उज्याड जाहाले. हालीं राजश्री दादासाहेब यांणीं अमदाबाद, बडोदें व डभईकडे राजाराम गोविंद याची रवानगीचा विचार ठरवला. शहराबाहेर येऊन राहिले होते. ते महकूब होऊन, गोजुदीखान याची उभारणीचा निश्चय करून, नर्मदा अलीकडील बंदोबस्ताकरितां पाठवावें. समागमें, सरंजाम, पलटणें व स्वार व तोफा देऊन पाठविणार, ह्मणोन बातमी आली आहे. अद्याप तेथेंच आहेत, इकडे येऊन बखेडा करणार, ये विर्सीचा बंदोबस्त ठेविला पाहिजे. स्वस्थतेचा अर्थ दिखोन येत नाही. याजकरितां महीपलीकडे खंबायतकसच्या तोंडावर तीन हजार फौज पेशज रवाना केलीच आहे. सुरत प्रांतीं थोडी बहुत फौज आहे. आह्मीहि मासपक्षांत निघावयाचे तरतुदींत आहों. परंतु फौजेचा देण्याचा पेंच तीन वर्षांचा जाला. त्याचा गवगवा पडला आहे. याची सोय करून निघावयाचें होईल. सरकारच्या फौजेची रवानगी होऊन लौकर आल्यास उत्तम आहे. वरकड तिकडील बातमी जैसी येत जाईल तैसी मागाहून लिहून पाठऊ. रवाना छ १० माहे रजब. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती. मोर्तबसुद.

                                                                                लेखांक ३९१

                                                                                                                                                          १५४४ कार्तिक शुध्द ९

                                                                                                               68 2

अज रखतखाने खुदायवंद खाने अजम आबा सिदी अबदूल नबी व सिदी महमद साहेबुलवली दामदौलतहू ता। हुदेदारानी व मोकदमानी हाल वा इस्तकबिला मौजे वडगऊ ना। पेडगाऊ कर्याती पाटस पा। पुणा बिदानंद सु॥ सलास इशरीन अलफ रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल हुजुरा मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर वाहातिकास देखील मळय रुके -।- बारा दर सवदा मौजे मजकूर प्रजा माहाद पटेला ठोबरा सालाबाद तसरुफाती चालिले आहे हाली साहेबूस सालमा। कारणे मुकासाई अर्जानी जाला आहे हुदेदार ताजे खताचा उजूर करताती खतर होये मालूम जाहले रामेस्वरभट बिन नारायण सो। आरवी मुदगल यासी सदरहू इनामता तसरुफाती आहे तेणे प्रमाणे दुमाला कीजे दर हर साला ताजे खताचे उजूर ना कीजे तुह्मी तालीक घेउनु असली खुर्द खत भटपासी फिराउनु दीजे मूर्तब

                                                                                                                                                                                                      326

तेरीख ७ मोहरम

पत्रांक २०२

श्री
१७०१ चैत्र शुद्ध १

हिशेब गु।। साहूकार बा राजश्री माहादजी शिंदे यांजकडे ऐवज येणें सुा तिसा सबैन मया व अलफ. शके १७०१ चैत्र शुा प्रतिपदा. रुा
५६४२९॥l- बा खत ऐन मुद्दल व व्याज रुा
३१०८७ ऐन मुद्दल मिति कार्तिक शुा ३ शके १६९३
बा खत.
२५३४२।। व्याज ईा ता शके १७०१ चैत्र शुा १
मुा माहे एकूण कच्चे २७६४६७० दर
सदे रुा एक प्रो रुा २७६४६॥ पौ
वजा बारोत्रा रुा २३०३।। बाकी व्याज रुा
-------
५६४२९।।
१४४०५. पेशजी हिशेब जाला ते समईचीं कलमें त्याज बा ऐवज का रुा
१००० वेंकाजी नाईक मनसबदार यांस शिंदे यांणीं द्यावयास केले आहेत. रुा
१८०० लाख रुपयांची वरात शिंदे यांणी रायपूर येथें कार्तिक शुा १ चे मुदतीची दिल्ही.
मुदतीस ऐवज न पावला तर ऐवज पावेल ते मुदती पावतों व्याज द्यावयाचा करार आहे.
त्यास वरातेचा ऐवज मागशीर्ष शा ११ स
आला. त्याचे व्याज मा माहे १८२४ कच्चे
१८००० एा दर सदे रुा १ प्रो रुा ७२०० पहिले खतांत ऐवजास साहा महिन्यांची
मुदत असतां एक वरीस वजा केलें तेव्हां सहा महिन्यांचें मुद्दल रुा ११९५२२॥
अजमासें व्याज येणें रुा
११९६ अधिक मास वजा करावयाचा शिरस्ता नसतां अधिकमास वजा केला. त्या एक महिन्याचें
व्याज अजमासें येणे.
३२०९ बारोत्रा सुटीचा शिरस्ता नाहीं बिनसूट आहे. त्यास सूट घातली ते रुा
---------
१४४०५१
----------
७०८३५

पत्रांक २०१.

श्री.
( नकल) १७०० माघ वद्य ३.

करार जाबता शपतपूर्वक राजश्री दादासाहेब यांचाः-

राजश्री माधवराव नारायण पंत प्रधान यांणीं विद्यमान राजश्री तुकोजी होळकर व माहादजी शिंदे सुा तिसा सबैन मया व अलफ. तुह्मांआह्मांशी नानाप्रकारें विग्रह राज्यलोभास्तव वाढोन आह्मीं दौलत साधावी यास्तव प्रयत्न बहुत केला. इंग्रजांकडे जाऊन त्यास साह्य करून बरोबर घेऊन इंदुरीतळेगांवपर्यंत आलों, परस्परें लढाईचा प्रसंग घडला. अंदेशा पाहतां आपण राज्यलोभाविष्ट झाल्यानें इंग्रजांकडे दौलत जाती असें जाणून उभयतां सरदारांकडे आलों. सरदारांनी खर्चाची बेगमी करून देतों आणि स्नानसंध्या करून स्वस्थ राहावें असें सांगितलें. त्याप्रमाणें मान्य करून खर्चाची बेगमी अलाहिदा नेमणुकंप्रमाणे नक्की बारा लक्षांची जागा लाऊन दिली. ती आपण घेऊन, स्नानसंध्या करून, झांशीस राहून, राज्याचा लोभ धरून दौलतीचा वारसा करणार नाहीं, व दौलतीस वांकडे पडे असें आचरण आह्मां पासून होणार नाही. नेमणूक करून दिल्ही त्यांत सत्कालक्षेप करून स्वस्थ राहूं. तुह्मीं पंतप्रधान राज्याचे धणी व चिरंजीव बाजीराव रघुनाथ तुमचे कारभारी करून द्यावे, असें उभयतां सरदारांचे व आमचे विचारें ठरून, आह्मीं मान्य झालों. तुह्मीं व चिरंजीव बाजीराव यांणी तीर्थरूप कैलासवासी नानासाहेब व भाऊसाहेब धणी व कारभारी या अन्वयें वर्तत होते त्याप्रमाणें प्रबुद्धपण आलियावर परस्परें वर्तावें. स्वामीसेवकधर्म उभयतांनीं अन्योन्य नि:कपटपणें चालवावा. धणीपणाची व कारभाराची पुस्तपन्हा तुह्मीं उभयतांची उभयतां सरदार करितील. आह्मीं या दौलतसंबंधीं कारभाराच्या प्रकरणांत एकंदर मन घालणार नाही. वर्तणुकेच्या कलमबंदीची याद अलाहिदा लिहून दिली आहे त्याप्रमाणें आचरण करू. उभयतां सरदारांचे विद्यमानें परस्परें करार ठरले आहेत, त्याप्रमाणें तुह्मांकडून अमलांत यावें. आह्मांकडूनहि अमलांत येईल. यांत अंतर करूं तर श्रीसांबाची व गंगाभागीरथीची शपत असे. जाणिजे छ १५ माहे मोहरम, सुा तिसा सबैन मया व अलफ, मुकाम इंदुरी तळेगांव.

पत्रांक २००

श्रीशंकर
१७०० माघ शुद्ध १०

राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसीं:-

पो जिवाजी माहादेव काणे साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल माघ शुद्ध १० पावेतों मुक्काम नागपूर येथें सुखरूप असों विशेष. आपण गेलिया तागाईत पत्र पाठऊन समाचार न घेतला ! तर माझें विस्मरण व्हावें हें नव्हतें. परंतु कां जालें हें नकळे ! तर ऐसें नसावें. सदैव पत्र पाठऊन सांभाळ करीत गेलें पाहिजे. यानंतर आपण गेलियावर एकदां दोनदां निरोप जाऊन मागितली. परंतु प्रेमाचींच भाषणें केलीं. नंतर श्रीमंतांकडे जाऊन, एक प्रहर बहुतां प्रकारें भाषण करून काम द्यावेंसें ठराऊन आले. मग मजला बोलऊन नेऊन सांगितलें कीं, श्रमिंतांची मर्जी तुह्मांवर प्रसन्न करून आलों. आणि बहुत प्रकारें बोलिले, त्याजवर श्री पंचमीस आपण येऊन वस्त्रें फडणशीचीं दिल्ही. दुसरे सांगून दामाजीपंतासमागमें पाठविलें कीं, जे पूर्वी सुदामत यांजकडे काम असेल त्याप्रो द्यावें. त्यांत उकरावयाचें नाहीं. मग आह्मांशी बोलिले कीं, बळवंतराव यास पाठवितों, तुह्मींहि जावें, ह्मणजे माझी खातरजमा आहे. कबूल केलें. तो सर्व प्रकार मागील पत्र लिहिला आहे, त्याजवरून कळेल. प्रस्तुत तिकडील वर्तमान फार चांगलें आलें. त्याजपासून येथें लक्षुमणपंतदादा यांचा प्रेमा पूर्ववत्प्रमाणें करून द्यावयाचे संघानांत आहे. ईश्वर घडवील तें खरें, फार खट्टे तुह्मांवर आहेत. जो संदेह आपणापाशीं आह्मी जाते समईं घेतला तो खरा शोध लागला. कळावें. आपण तेथें यांच्या गोष्टी समेटीच्याच बोलाव्या. त्या येथें तानकोबाचे हातें येथें कळाव्या. तो असेल त्या समईं श्रीमंतांशी चांगलें बोलावें कीं, येथें ऐकून दुःसंदेह येत नाहीं. येथें आह्मी प्रतिज्ञा करून दादापाशीं बोलिलों कीं, रावजी आपला प्रकार ईषत् मात्र व्यंग बोलणार नाहींत. आमचे त्यांचें मात्र न बनें. यास कारण, दैव अथवा शनीश्वर आला हें नकळे, असें आपल्या प्रत्ययास रावजीचें बोलणें येईल तैसें घडावें. आह्मांस पाठवावयाचा सिद्धांत आहे. वद्य पंचमीस मुहूर्त आहे. मध्यें बळवंतराव यास मुहुर्तच नव्हता. यास्तव निघण्याची विलंब मात्र जाला. कळावें. श्रीमंत राजश्री नाना यांस पत्र लिहिलें आहे तें पावेल. आपण तेथें आहेत तेव्हां मीं काय लिहूं ? सर्व आपण मागें केलें तैसें करतील. रावजी शेवटचे ऐसें जे जाले त्यांचा बयान काय लिहूं ? इंग्रजांस ऐसी शिकस्ती कोणी दिल्ही नव्हती. शिकस्ती देऊन आपला तोरा जायां न होतां आला, हें केवढें जालें ? यास जोडा नाहीं. श्रीमंत राजश्री रावसाहेबाचे प्रतापास उपमाच नाहीं. गर्भापासून कृष्णचरित्रासारिखेंच जालें ! ध्यानास आणावें. धर्म रक्षावयास ईश्वर साह्य खरा ! हे आतां पटलें. कळावें बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ करीत गेलें पाहिजे. ही विनंति. इ० इ०

                                                                                लेखांक ३९०

                                                                                                                                                          १५४४ वैशाख

                                                                                                               

राजश्री कुमाजी पाटील अजहती विठोजी राजे भोसले मोकदम कसबे वावि पा।संगमनेर यासि भुज मेहतरी व सोन मेहतरीया व समस्त तेली कसबे मजकूर सु॥ इसने असरिन अलफ लेहौनु दिधले ऐसे जे बाउजी मोकदम कसबे मजकूर माजी होता तो धानबुडी आपणापासूनु घर घानियासी टके ३68६ परमाने खात होता तरी त्याप्रमाने तुह्मी आपले घेणे खेरीज जिराती प्रजास नाही पेसजीचे आपणासी माफ करून सन सलासा कारणे घेणे हे लिहिले सही

                                                                                                                                                           नि॥ पाबार

                                गोही

बाब जिसधान                             गोपाळ वणजारा
मुजेरी

बालू जगधणी                             एमाजी घरबुडा मुजेरी               
मुजेरी

मेउजी करानदेऊ                         अत पाटील साकरपेटी 

आपाजी सेटिया  

पत्रांक १९९

श्री.
१७०० माघ शुद्ध १

आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता माघ शुद्ध ११ गुरुवासर मुा नागपूर वर्तमान यथास्थित असे. विशेष. जालनापूरचे मुकामचीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें, संताजीनाईक यांची भेट जाहाली, वर्तमान लिहिलें तें कळलें. त्यास, येथें आल्यावर सविस्तर लिहून पाठऊं. येथील प्रकार तरी छ २९ जिल्हेमचें पत्र श्रीमंतांचें आलें, त्या दिवसापासून पहिलें भाषण तें किमपि नाहीं. सफाईचेंच आहे. आम्हांस काल बोलावूं पाठविलें. देवडीवर गेलों. उभयतां होते. राजश्री मन्याबापूंस हळद लाविली. समारंभ जाहला. आह्मांस ह्मणों लागले की, गडगनेर कधीं करितां? आह्मी उत्तर केलें कीं, आमचीं मुलें माणसें येथें नाहींत. तेव्हा ह्मणों लागले कीं, चिंता काय, आह्मीं कोणाचे घरीं जेवण्यास जात नाहीं, उगेच येऊं, विडे घेऊ. तेव्हां उत्तर केलें कीं, उचित आहे, मर्जीस येईल तेव्हां घडेल. त्यास, गडगनेर करावें लागतें. पांच सातशें रुपयांचा खर्च आहे. न करावें तरी वाईट मानितील आणि ते होऊन सफाईवर येत असतां न करावें हें विहित नाहीं. नवाबाकडील पत्रें आली होतीं. त्यांत त्यांनी कायम मिजाजीचेंच लिहिलें होतें. राजश्री जिवाजीपंत यांचेंहि पत्र आपणास आहे. बगाजीपंत यांणी लिहिलें होतें कीं, नवाब श्रीमंतांकडे अनुकूल, फौजांची तयारी करविली आहे, परंतु संदेहांत आहेत, इंग्रजांशी बिघाड श्रीमंतांचा आहे, आपण निराळे आहों, त्यास कसें होईल, याजकरितां अंतस्त दोन्हीं सूत्रें ठीक, उघड श्रीमंतांचा पक्ष ऐसें बोलतात, ऐसें लिहिलें होतें. त्यावरून आह्मांस ह्मणों लागले कीं, नवाब आपला ह्मणतां, त्यास आइकिलें कीं ! आह्मीं उत्तर केलें कीं, या दिवसांत नवाबांनी फार केली. तेव्हां ह्मणों लागले कीं, आह्मीं कांहीं केली नाहीं. आह्मी उत्तर केलें कीं, तुह्मी केल्याची स्तुत काय करणें, नवाब परकी, हिंदुमुसलमान हे दोन पक्ष. वैरभाव भगवंत निर्मित आहे, या अर्थी त्यांनी फार केली, तुह्मीं केल्याचें आश्चर्य काय, हे दौलत आणि ते दौलत दोन हेंच लक्ष आमचे घरीं नाहीं, त्यांनी करावें तेच तुह्मीं करावें ऐसें आहे. ऐसें कित्तेक भाषण जाहलें. तेव्हां तेथे कार्य उत्तर करितात ? इंग्रज गाडराकडून एक आला आहे. कलकत्त्यास जाणार. त्यास यांचें त्याचें बोलणें होऊन जाईल. यांनीं गाडरास व कलकत्त्यास व जंगाकडे पत्रें या वर्तमानाचीं लिहिलीं आहेत. मल्हारीकडील हुंडी पटली कीं नाहीं, ह्मणोन लिहिलें. हुंडी पटेल. गुंता नाही. परंतु तुह्मीं तेथें गेल्यावर ऐवज कोणीकडे उतरावा, तें लिहिलें पाहिजे. हुंडी पांच सात दिवसांत पटेल. गुंता नाही. तुह्मी सत्वर जावें. सविस्तर वृत्त ल्याहावें. बहुत काय लिहिणे ! लोभ कीजे हे आशिर्वाद. राजश्री जिवाजीपंत यांस फडणिशीचीं वस्त्रे शुद्ध पंचमीस दिल्हीं. अद्यापि बंदोबस्त कांहीं नाहीं. तिकडे रवाना करणार ते संधींत काय होईल तें लिहून पाठऊं. हे आशीर्वाद.