पत्रांक १७८.
श्रीसीताकांत.
१६९९ श्रावण शुद्ध ६.
राजश्री बाबूराव विश्वनाथ गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो मुधोजी भोंसले सेनाधुरंधर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिला मजकूर अवगत जाहला. पूर्वी जाहलेला प्रकार यजमानांनी खासदस्तुरपत्रीं लिहिला आहे, त्याजवरून कळलें असेल. फौजेची समजोती होत आहे. चाळीस पन्नास लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. बाजत बरसात हैदरावरी जाणार. शिंदे व होळकर आपलाले स्थळास निरोप घेऊन छावणीस गेले. पुण्यास येणार. उभयतांचें ऐक्य फार चांगलें जाहलें ह्मणोन लिहिलें. त्यास पूर्वी राजश्री बाळाजीपंत नाना यांचें पत्र स्वदस्तुरें विस्तारयुक्त आलें तें अवलोकमीं सर्व अर्थ इच्छित घडलें हें समजोन जो संतोष जाहला त्याचा अर्थ लिहिणेयांत आलाच आहे. सांप्रतच्या लिहिण्यावरून तरी कोणताही गुंता राहिला नाहीं. मुख्य राजश्री पंतप्रधान दैवशाली आणि राजश्री नाना यांची एकनिष्ठता, त्यांचींच फळें श्रीनीं दिल्हीं- याजउपरी सर्व बंदोबस्त यथास्थित होऊन येतील. वरकड इकडील कित्तेक मजकूर पूर्वीं लिहिले आहेत. सांप्रत राजश्री दिवाकर पुरुषोत्तम यांचे पत्रावरून कळों येतील. रा छ ५ माहे रजब. सविस्तर मारनिलेच्या पत्रावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे विनंती, मोर्तबसुद* * t
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)