Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

(लेखांक ४२) पत्र अस्सल आहे. १६९१ त संताजी घोरपडे सेनापति होता, मानसिंग मोरे हप्त हजारी होता. धनाजी जाधव व हंबीरराव मोहिते हेहि सैन्यांत बड्या हुद्यावर होते. मल्हार दादाजी सरसुभेदार हें नांव मराठ्यांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. अमृतराव बिन तुकोराम निंबाळकर शिवाजीचा नातू होय. विठ्ठल गोपाळ सुभेदार प्रांत जाऊली, हा पुरुष त्यावेळच्या कुशल मुत्सद्यांत गणला जात असे. ह्याच्या शिक्क्यांत विठ्ठलस्य महाबुद्धे अशी अक्षरें आहेत.

(लेखांक ४९) याद नक्कल आहे. ह्या यादींतील हिंदु व मुसुलमान राजांचीं नावें हव्या त्या अनुक्रमानें, हव्या त्या प्रांतांतील, हवीं तितक्या वर्षांची दिलेलीं आहेत. युधिष्ठिरापासून १७०७ पर्यंत कशी तरी याद आणून भिडविली आहे. मोगल बादशाहांची-बाबरापासून अवरंगझेबापर्यंतची-याद बिनचूक आहे, परंतु भोगवट्याची वर्षे चुकलीं आहेत. ह्या यादीच्या शेवटीं अवरंगझेबाचें राज्य जाणार असें भाकीत त्यावेळीं हिंदुस्थानांत प्रचलित झाले होतें तें नमूद केलें आहे. ह्या लेखांकांतील हा भाग इतिहासकाराला अत्यंत महत्त्वाचा आहे.

(लेखांक ५३) १७०५ त धनाजी जाधव सेनापति, हंबीरराव मोहिते सरलष्कर, खंडोजी निकम समशेरबहाद्दर, संताजी पांढरे, शरफन्मुलूख व नेमाजी शिंदे, असे सैन्यांतील बडे हुद्देदार होते. लेख अस्सल आहे.

(लेखांक ६०-६६) हे सात लेखांक अस्सल असून ह्यांत दुस-या शिवाजीने शाहूराजाच्या फितव्याचा प्रतिरोध करण्याची खटपट कशी केली ते लिहिलें आहे.

(लेखांक ७१) ह्या लेखांकांत जातिवंत मराठ्यांचीं कुळें प्रारंभीं दिलीं आहेत. ह्या कुळांतील लोक आपल्या नांवापुढें राजे ही पदवी लावतात.

(लेखांक १६९, १७०, १७१) ह्या अस्सल लेखांत रामराजाची हकीकत आहे.
इतर लेखांविषयीं सध्या विशेष कांहीं लिहिण्यासारखे नाहीं. त्यांचा उपयोग संकलित वृत्तांत लिहितांना व इतर स्थलीं होणार आहे.

(१२) लेखांची विशेष माहिती दिल्यावर, आतां बावडेकरांची कुळकथा द्यावयाची परंतु हें काम बावडे येथील मराठी शाळेचे हेडमास्तर रा. गोरे हे विस्तारानें स्वतंत्र पुस्तकाच्या रूपानें करणार असल्यामुळे, ते येथें न करणें हेच इष्ट आहे.

पत्रांक २३३

श्री.
१७०१ आश्विन वद्य २

पुा राजश्री बाळाज्ञीनाईकनाना गोसावी यांसी.-

विनंति उपरी. सचिण सत्रागांव व फुटगांव राजश्री सखारामपंत बापू यांचे सरंजामांत पेशजी आपलेकडून दिले होते. व गल्हेमरोळी राजश्री नानाकडे कर्जात दिल्ही होती. त्यास, सरकारठाणीं तेथें होतीं. उपरांत राजश्री दादासाहेब सुरतप्रांतीं आलियावरी सरकारचे महाल इंग्रजानें जप्त केले होते. ते समयीं हेही महाल जप्तींत आले होते. तेव्हां आपलेकडील कमावीसदारांनी इंग्रजास समजाविलें की, हे महाल आह्मांकडील आहेत. सत्रागांव बापूकडे अंतस्तांत दिले होते. अखेरसालपर्यंत द्यावयाचा करार होता. त्यास, अखेरसाल मागेंच होऊन गेलें. आतां त्याजकडे महाल द्यावयाचें कारण नाहीं. तरी आमचे महाल सोडून देवावे. त्याजवरून महाल इंग्रजानें पक्केपणे बोलून सोडून दिलें, उपरांत सरकारचा अंमल पुन्हां सुरतप्रांतीं बसला. त्यावरी महाल सरकारांत द्यावें. त्यास, गल्हे व मरोळी हे दोन्ही महाल नानांकडे. तेथील कमावीसदारांचीं पत्रें व कारकून येथें आले. सविस्तर वर्तमान सांगितले कीं, महाल नानांकडे द्यावे. त्यावरून राजश्री अण्णाजी अनंत यांस पत्रें देऊन नानाकडील ठाणीं बसविलीं. हें वर्तमान इंग्रजांस कळलियावरी आह्मांकडील कमावीसदारांस ह्मणों लागले कीं, तुम्ही आमाण बोलून महाल सोडवून घेतले याचें कारण काय ? आम्ही तुमचे सारेच महाल जप्त करू असें बहुत दोष ठेविले. तेथें समज किती हें ध्यानांतच आहे! तेव्हां संकट जाणून पुन्हा आपलेकडोन महाल जप्त केले आहेत. याप्रमाणें मजकूर आहे. या वरी सरकारचीं व नानाचीं पत्रें शब्द लाऊन आलीं. त्यांचीं उत्तरें काय द्यावीं, येविसींचे राजश्री हरीपंततात्यास राजश्री बाळाजी महादेव यांनीं लिहिलें आहे. त्यावरून ध्यानांत येईल. येविसींचे सविस्तर आपणांस लिा आहे, म्हणोन सरकारांत लिा आहे. तरी सविस्तर समजावून ध्यानांत आणावें. आपलेकडून कांहीं एक गुंता नाहीं. गोष्ट कुपेचीं पडली आहे. रा छ १६ माहे सवाल. बहुत काय लिहिणें ? लोभ कोजे. हे विनंति. मोर्तबसुद,

पत्रांक २३२

श्री
१७०१ आश्विन वद्य २

पुा राजश्री बाळाजीनाईकनाना गोसावी यांसीः-

विनंति उपरी. राजश्री रामचंद्र पवार डभई परगण्यांत येऊन मुकाम करून राहिले होते. परगणा जप्त करावा, पैका मिळऊन पुढें अमदाबादेची जप्ती करावी, ऐसे मोठ्या उमेदीनें आले होते. त्यास, येथून फौजा पाठविल्याच होत्या. आह्मींही फौजसुधां पाठीवर मुकाम केला. आपलेकडील लोक वरचेवर रवाना जाहले. पारपत्य यथास्थित करावयाचें केलें. त्यास, त्याज, कडील बोलणें लागलें कीं, आपल्यास बाहादारी दिल्हियास निघोन जाऊं, ऐसे बोलूं लागले. उपरांत बहादारी दिल्ही की, तूर्त बिघाड न करणें. एक वेळ बिघाड जालीया मग आपले हातीं राहणार नाही, आणि सरकारचा शब्द लागेल जे तहरहाचा जाबसाल ठरत असतां यांणीं बिघाड केला. यास्तव मारनिलेस जाऊं दिल्हें. परंतु मोठ्या उमेदीनें माघारे गेले आहेत. आम्हांस बहुत जरबेनें पत्रें लिहिलीं आहेत. परंतु पुढें होणार तें होईल. आमची निष्ठा श्रीमंतांसी दुसरी नाहीं. इंग्रजांशी तहाची अगर बिघाडाची बातमी राखून वरचेवर आम्हांकडे लिहून पाठवीत जावें. यासीं आम्हांसीं नित्य संबंध पडला आहे. द्रोहींकडून संकट, उपाय नाहीं. ऐवजाविसीं आपण वरशेवर लिहितात. येथें एखादी तरतृद करावी. त्यास दिवसास एक नवें खूळ उभें राहतें. कोणी सावकार उभा राहत नाहीं. कोणास भरंवसाच पडत नाहीं. यांत कांहीं सोय पाहून तरतूद घडेल ती मागाहून करून पा. आपण वरवर लिहितात आण आमचे ध्यानांत नाहीं, ऐसें नाही. परंतु उपाय काय करावा ? वरकड सविस्तर मागाहून लिहून पा. रा छ १६ माहे सवाल बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति. मोर्तबसुद.

पत्रांक २३१

श्री.
१७०१ आश्विन वद्य २
पौ मिती कार्तिक शुद्ध ८ मंगळवार.

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामींचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ कृतानेक सां नमस्कार विनंती. येथील कुशल ता छ १६ माहे सवाल जाणून स्वकीयें कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र बारागिराबराबर पाठविलीं तीं पावलीं. सविस्तर अर्थ अवगत जाहाले. इकडील मजकूर तरी सुरतेहून पेशजीं राजाराम गोविंद नर्मदा उतरून इकडील आले होते. त्यास येथून सरंजाम रवाना केला. तेव्हां त्यास इकडील ताण वसला आण त्याचे सिवदीनेंही गवगवा केलाच होता. यामुळे मड़े सारे सोडून रात्री पळून माळवियांत गेले. हे पेशजी आपणांस लिाचे आहे. त्यावर छ ११ सवाली राजश्री चंदरराव पवार इंग्रजांचे परवानगीनें नर्मदा उतरून अलीकडे आले. त्याजवरी येथून सरंजाम पाठविला आहे. याची व आपले सरंजामाची गांठही पडली आहे. त्याचें पारिपत्य करावें. याचे अगाध नाहीं. परंतु मागील पिछा भारी, व सरकारांत तह काय ठरता तेंही कळलें पाहिजे. एकवेळ बिघाड जाहलियावरी पुर्तीच कंबरबंदी केली पाहिजे. यास्तव युक्तीचेच वाटेनें भय दाखऊन बंदोबस्त करवितों, तत्रापही बिघडलेंच तरी उपाय काय ? येविसींचे तपसीलें श्रीमंत राजश्री यजमानांनीं आपणांस व सरकारांत लिा आहे त्यावरून ध्यानांत येईल. ऐवजाकरितां वरचेवर लिहिलें. त्यास, प्रांतांतून अगर कोठून सोये होऊन येणें कळतच आहे. कर्जवाम घेऊन कांहीं सोये काढावी. तरी प्रथम राजाराम गोविंद याची गडबड जाली व अलीकडे चंद्रराव पवार याची गडबड यामुळें कांहीं एक घडों न आलें. प्रस्तुत तरतूद करीत असों. तरतूद करून रवानगी करितों. आम्हांस रात्रंदिवस आपलेकडील लक्ष राहून, खरेपणांत पडावें हाच निजध्यास. परंतु एक एक नवेंच विघ्न उभे राहते ! त्यास उपाय काय करावा ? त्यांतही तजवीज करून मागाहून पा आहे. प्रजन्य गेला. यामुळे प्रांतांत हाहाकार होऊन लोक तमाम उठोन मुलूख उजाड जाला व जलचरांचे खूळ. यामुळे कोणी सावकार कामास धजत नाहीं. येणेकरून जे करावयास जावें तें सिद्धीस जात नाहीं. आमचे प्रेत्ने एक दिवस अगोदर घडोन येईल ते करून पाठवीत आहे. यांत अंतर होणार नाहीं. खातरनिशा असे द्यावी व येविशींची निशा राजश्री बाळाजीपंत यांणी केलीच असेल, वरकड सविस्तर मानिल्हे याचे पत्रावरून कळेल. बहुत काय लि. हिणे ? कृपालेभ कीजे हे विज्ञप्ति.

पत्रांक २३०

श्री.
१७०१ आश्विन शुद्ध.

पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

सां नमस्कार विनंती. राजश्री राजाराम गोविंद योगीराजापाशीं होता. त्याजसमागमें सरंजाम देऊन अंकळेश्वरास मुकाम आला. हे वर्तमान आह्मांस कळतांच फौजेची तयारी करून सिद्ध जाहलों, राजाराम गोविंद इंग्रजांचे परवानगीनें नर्मदा उतरून उत्तरतीरास येऊं लागले. त्यास अधिकच लोकांचा गवगवा. आण इकडे आपली फौज. पुर्तेपणें आपला परिणाम लागत नाहीं हें समजोन, रात्रीं वीस पंचवीस स्वारांनिशीं डबईपलीकडोन हालोलकाकेलेस गेला. तेथेंहि न राहतां पुढें माळव्याकडे गेले. सरंजाम बराबर होता तो अंकळेश्वरीचं राहिला. कांहीं उठोन माघारा सुरतेस गेला. तूर्त इंग्रजांचा सरंजाम पोख्त तयार जाहाला आहे. पुढें काय मसलत हें कळत नाहीं. येथून राजश्री लक्ष्मणराव चिटणीस यांजकडे पत्रें लिहून बामी वरचेवर आणवीत असों. तेथें जो निश्चय ठरेल तो वरचेवर लिहित असावें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ कीजे. हे विनंती.

                                                                                लेखांक ३९३

                                                                                                                                                    १५४४ मार्गशीर्ष वद्य १२

                                                                                                                                                                                                रुजू निगाबान

                                                                                                               68 2

अज दिवाण ठाणे देहाये पा। पाडियापेडिगौ व तरफ कर्डिई समत जुनेर ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे बेलवडी ता। कर्डिया समत मजकूर सु॥ सलास इसरैन अलफ बा। खु॥ रा। छ २९ माहे मोहरम सादर जाले तेथे रजा जे बेस्मी मुदगलभट व कृष्णभट बिन बाबदेभट सेकीन पुणे-चाकण यास बदल धर्मादाऊ इनाम अजरामर्‍हामती बदल दान सूर्यग्रहण जमीन काळी कीर्द चावर १68 गज सरायनी दर सवाद मौजे बेलवडी ता। कर्डिई देखील नखतयाती ता। ठाणे व ता। देहाये व बाजे बाबा व पायपोसी व खर्चपटी व वेठीबेगारी व बाजेपटी कुल बाब कुल कानू दिधले असे बाब महसुलेसी दुमाले कीजे सदरहू जमीन नेमून हद्दमहदूद घालून प्रज नेमून देऊन हुजुरु खबर लिहिणे अवलाद अफलाद चालवीत जाइजे दर हर साल ताज्ये खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेऊन असेली फिराऊन दीजे ह्मणौन रजा रजे बा। सदरहू प्रमाणे अमल कीजे तुह्मी तालीक घेऊन असेली इनामदार मजकुरापासी दीजे मोर्तबु

                                                                                                                   392

तेरीख २६ माहे सफर
सफर

पत्रांक २२९

श्री.
१७०१ आश्विन शुद्ध ११
पौ छ १० सवाल सन समानीन.

पंडत सो मेहेरबान करम फर्माय मखलिसां हरी पंडत फडके सलमला हुताला.

बादज षौक मुलाकात मसरत आयात मषहूद जमीर इत्तीहाद पिजिरबाद येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेशा कलमी करीत आलां पाहिजे, दरिंविला, आपणाकडील कामांत सई व कोषिस करणेचा मार नरसिंगराव वकील यांनी लिहिल्यावरून मालूम जाला, आपणास आह्मीं दोस्त जाणत असों. हमेषा आपली षादमानी कलमी करीत आलां पाहिजे. हालीं चेचेरथान पारचे पाठविले आहेत. आजराः एखलास घेतला पाहिजे. जिआदा लिहिणें काय असे ?

पत्रांक २२८

श्री.
१७०१ आश्विन शुद्ध १.

पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसी:-

सां नमस्कार विनंती. आपण श्रावण वद्य त्रितियेचीं पत्रें पाठविलीं तीं पत्रें आह्मांकडे यावीं तीं न येतां राजश्री बापूजीपंतांकडे गेली. त्यांनीं पत्रें फोडून पाहून आह्मांकडे पाठविलीं तीं छ २३ रमजानीं आम्हांस पावली. फार दिवस पत्रांस लागले, याचें कारण कांहींच समजत नाहीं. पत्रांतील मजकूर कीं, यत्न शेवटास गेला, त्यास हें कर्म करावयाची उतावळी किमर्थ केली, सरकारचें काम थोडें बहुत निदर्शनास आणावें, ग्रामाकडील बंदोबस्त व्हावा, आपली आज्ञा यावी, तेव्हां घडावें, हें तुह्मी करणार नाहीं, परभारें जाले किंवा काय तें समजलियांत आलें नाहीं, ह्मणून या पर्यायें लिहिलें. त्यास, येविशींचे तपशील पाहिलेच लिा आहेत, त्यावरून समजलियांत आलेंच असेल. राजश्री राघोपंत पाठविले ह्मणोन लिहिलें. त्यांचें येणें न जालें. दुसरें, गोपाळराव यांस परभारें पत्रें दिल्हीं ह्मणोन लिा. त्यास, त्याचा पर्याय पुरवणी पत्रीं लिा आहे. व बाळ ठाकूर सांगतां ध्यानात येईल. इकडून अंतर किमपि पडावयाचें नाहीं. श्रीमंत राजश्री नानांस व श्रीमंत राजश्री तात्यांस पत्रें पाठवावीं कीं, गोपाळ यास काम न द्यावें. त्यास आह्मीं कांहींच चिठी पत्रीं दिल्ही नाहीं व यजमानानींही दिल्ही नाही. तेव्हां, उगेच त्यांस काय ह्मणोन ल्याहावें ? तत्रापि, पाहिजे तर पाठऊन द्यावयास येईल. बहुत काय लिहिणें? कृपालोभ कीजे हे विनंती.

पत्रांक २२७.

श्री.
१७०१ आश्विन शुद्ध १.
पो मिती कार्तिक शुद्ध २ बुधवार.

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:–

सेवक गोविंद गोपाळ सां नमस्कार विनंती. येथील कुशल ताइत छ २९ माहे रमजान पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण भाद्रपद शुद्ध ९ पत्र पाठविलें तें पावलें. लिा सविस्तर अवगत जाहालें. पत्रीं ऐवजाकरितां निकडीनें लिहिलें, व घनःशाम नारायण शिंदे यांचे लष्करांत गेले आहेत. त्याजवरून उभयतां सरदार यांचीं पत्रें कारभारी यांस आलीं कीं, गायकवाडाकडील गृहस्थ आला आहे. दौलत गोविंदरायास द्यावी, सरकारचे व आपले पैक्याची निशा करून देवितों. तीं पत्रें व जिन्नस आपल्यास दाखविलीं. त्यावर आपण खातरजमेचे बोलले आणि मुदत करून पत्रें आह्मांस लिा. त्यास येथील प्रकार दररोज काय ल्याहावा ? राजश्री बाळाजी अनंत रानडे जाऊन बहुत दिवस जाले. आपणापासीं पोंहचून अद्याप उत्तर येत नाहीं. त्यास, मारनिले पावलियावर सविस्तर समजलियांत आलें असेल, त्याजवर विशेष प्रजन्य गेला यामुळें चहूंकडून ( संकट) प्राप्त जालें आहे. पीक गेले. मुलूखगिरी.........ध याजमुळें राहिली. यांत ईश्वर काय परिणाम लावील तो खरा. या दौलतींत कांहीं बाकी राहिली नाहीं. वोढघस्तेखालीं बहुतच आली आहे. यंदांचे साल सरकारांतून निभाऊन घेतल्यास कांहीं उभी राहील, नाहींतरीं परिणाम लागणें कठीण आहे. परस्परें समजल्यांत येईल तें खरें, बहुत काय लिहिणें? कृपालोभ करावा हे विज्ञप्ति.

पत्रांक २२६.

श्री.
१७०१ आश्विन.

पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

सां नमस्कार विनंती. शिंदे यांजकडील पहिले करार मदार ठरला आहे त्यापों द्यावें लागेल, ह्मणोन लिा. त्यास, येविसींचें तपशीलवार पेसजीं लिहिलें आहे. त्यावरून ध्यानांत आलें असेल, त्यास आपले युक्तीस येईल त्याप्रों ठराव करून लिहून पाठवावें. घडोन येईल. मारिनिलेकडून कारकून येथें आला आहे. त्यासहि आह्मीं समाधान पत्रें लिहून दिल्हीं आहेत. आणकरारमदाराचें आपणावर घालून लिा आहे. त्यास, आपले ध्यानांत येईल ते करावें. आपण करतील तें आह्मांस मान्य. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ कीजे हे विज्ञप्ति.