पत्रांक १८५
श्री.
१६९९ पौष शुद्ध १२
जंजीरेकरांचे पत्राची नक्कल.
......मान जयराम त्रिंबक सोमण.
मुफावीजा मरकुम केला तो पोहचून खुषजुदी हांसल जाली. लिहिला मजमून मालूम जाहला. ऐशास, गणेशराम दातार हक झाले. पुढें दुतर्फा जाबसाल सुरळीत अमलांत यावें, सां आंअमारतपन्हांकडून भलें माणून रा करावयाविशीं इबलाग केलें. त्यावरून भलें माणूस रा करितों ह्मणोन कलमीं केलें असतां, प्रांतांतील दंगा होणें तो, होतच आहे. हें एखलासींचे जागा दुरुस्त नाहीं. सरकार तर्फेनें निखालसीचा मार दर्याफ्त करून भले माणूस बलाविले आहेत. तरी जलदीनें रा करावें. अकरा माहालची दुतर्फा पाहणी होणें, त्याचा हंगाम हाच आहे. याजकरितां भलेमाणसाची रवानगीस दिरंग न लावितां लौकर रा करावें. रयतीस तसदी लागते ये बाबेचा बंदोबस्त करवावा. दोस्तीचे जागां असें अंमलांत नसावें, रा छ २२ जिल्हेज, जादा काय लिहिणें हे किताबत.
सन समान पौषमास मा परंधर येथून रा जालें, खान अजम याकूतखान दाम मोहबत हु.