पत्रांक १८७
श्री
१६९९ माघ शुद्ध १३
राजश्री महिपतराव तो रत्नागिरी गोसावी यांसी:-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माहादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावे. विशेष. राजश्री आपाजीराम दाभुळकर यांची कुणबिण कस एक पळून गेली, ती ता लांजें उमगिलो आहे, म्हणून कळलें. त्यावरून, हें पत्र तुह्मांस लिहिलें आहे. तरी यांची कुणबिण ज्याचे घरीं असेल त्यास ताकीद करून, यांचे माणसांचे स्वाधीन करवावी. रा छ १० मोहरम, बहुत काय लिहिणे ? हे विनंति. मोर्तबसुद.