पत्रांक १८९
श्री
१७०० आषाढ वद्य १०
रावसाहेब आदा मुलाजमें एकबालहू.
जयेर दौलत व एकबाल रफात वे अवालि मर्तबा तफीस खातम बख्तदारीं आबेजव्हार आलम परवरी फरोजी पेचराग हिशमत फराजी देली वायम करमत अजयुफी कड बाबत व कामरानी दाई. मजश्यारे कवताल्याबाद अजि खैर आपेश उइलम लुइस एस्कोयर बाद अर्जुए हुजुर मोफसरूर इनशाफ खातीर मेहेर मजातीर मेरार्दा नव.........फनामा तिराज सादर केला तो पोंचून हिसियार खुरमी हांसल जाली. एकबालपन्हांचे लिहिल्यावरून श्याहामत व एकबालपन्हां गवरनर जनराल कलान कलकत्ते जंगबहादुर यांचीं खतें पाठविलीं आहेत. येऊन पावतील. कलकत्तेयाहून खुदाएवंद न्यामत हनरावेल कोंपनीची फौज येत आहे. रहदारीस दस्तक द्यावें विसीं गवरनर जनराल यांहीं कलमीं केलेंच आहे. त्यास तर्फ इंज्यानेब अर्ज ऐसाजे, मेहेरबानी करून बंतरपासून व सरकारचे सरदार जागजागांचे यासीं दस्तक द्यावें. येथून फौजेच्या सरदारांस पाठवून देऊं. दस्तक असल्याने दुतर्फेच्या फौजेशी मुलाखत जाहील्यास कोण्हेविशीं रहदारींत हरकत वगैरे नाहीं. बेहत्तर असे. कलकत्तेचे खलिते पावल्याचा दरजबाब पाठवावें. येथूनं रवाना केले जातील. रा छ २४ जमादिलाकर, ज्यादा एयामशादमानी जुमाबंद.