[ १६ ] अलीफ . ५ मार्च १६६८.
आपले बराबरीचे राजात श्रेष्ठ, सर्व उमरावात श्रेष्ठ, महत्कृपेस पात्र, मुसुलमानी धर्मरक्षक, शिवाजी याणे बादशाही कृपेचें उमेदवार होऊन जाणावे कींः- तुमचे पत्र मिर्जा राजे जैसिंग याणीं ठरविल्याप्रमाणे इकडील प्राती रवाना जालें ते पावून बहुत सतोष जाला.ऐशीयास, इकडील लोभ तुह्मावर पूर्ण आहे ह्मणोन अवकार न करितां खातरजमेनें मजलदरमजल निघोन यावें. ह्मणजे भेटींअतीं बहुत सत्कार पावून माघारे जाण्याविशींचा निरोप दिल्हा जाईल सांप्रत तुह्मांकरितां पोषाख पाठविला आहे तो घ्यावा रा । छ १० माहे सवाल, सन ९ जुलूस, सन १०७८ हिजरी.