[ १२ ] श्री. २ एप्रिल १६६३.
मसुरल हजरती राजमान्य राजश्री मोरो त्रिमळ पेशवे व राजश्री निळो सोनदेऊ मजमूदार प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत- उपरि. साहेबीं कोंकणांत नामदार खानावरी जाण्याचा तह केला होता. ऐसीयासी, हालीं किल्ले सिंहगडाहून समाचार आला आहे कीं गडावरीं कांहीं फितवा जाला आहे. याबद्दल तूर्त कोंकणांत जाण्याचा तह राहिला. तरी तुह्मीं लष्करी लोकांनसी व खासखेली हशमानसीं कागद देखतांच स्वार होऊन किल्ले सिंहगडास जाणें आणि किल्लियावरच हुशार खबरदार असणें. फितवा कोण कोण लोकीं केला होता हे खबर घेऊनु हुजूर लेहून पाठवणें. मा । तान्हाजी नाईक व कोंडाची नाईक व ++++ हडे व कमळोजी नाईक व दरेकर व रुमाजी अहिरा व गोंदजी पांढरा हे बराबरी घेऊन सिंहगडास जाऊन सिंहगडी अलगो अलगानीं बहुत खबरदार असणें. जे लोक किल्लियावरी मेदांत असतील ते हे आपल्या बरावरील लोक अलगेस ठेवणें. छ ४, माहे रमजान, सन सल्लास सितैन. पा । हुजूर. *
( मर्यादेयं )
( विराजते )