लेखांक ४३४
श्री १५४६ आश्विन शुध्द ७
नकल
श्री सके १५४६ रक्ताश्री नाम संवछरे आश्विन शुध्द सप्तमी बुधवार ते दिवसी राजश्री मुरारभट बिन गंगाधरभट ब्रह्मे कसबे चाकण गोसावियासि सेवक
शाहाजी व सूर्याजी देसमुख बापूजी अनंत व चादोजी
(निशाणी नांगर) विश्वनाथ देशकुलकर्णी
दुलसेटी सेटिया व मेंगसेटी दससेटी सेटिया व
चौधरी व बहिर सेटी माहाजन दादसेटी केकण माहाजन
बकाल तांबोली
(निशाणी तराजू) (निशाणी चाक)
चांग मेहतरी मेहतरा देऊ माली मेहतरा व
हर माली चौधरा व
बाबाजी तेली चौधरी बापू काडिंगा माली
(नि. पाहार) (निशाणी खुर्पे)
समस्त का। चाकण प्रा। मा। आत्मसंतोषे पत्र करून दिल्हे एसे जे सदर्हू संवत्सराकारणे पाऊस मुलखा गेला लोक परागंदा होऊ लागलेयावरी सदर्हू अवघे मिळून तुह्मापासी बोलिले जे रोजा १०।१२ मध्ये पाऊस पडेल की न पडेल हे सांगितले पाहिजे यावरी मुरारभट गोसावी उत्तर दिधले जे दिवसा दाहा मध्ये पर्जन्य पडेल मग रोजा दाहा मध्ये पर्जन्य उदंड पडिला मग आह्मी समस्त संतोषी होऊन तुह्मासी नमस्कार व आ। पाया पडून तुह्मावर सासन धर्मादाव लेकुराचे लेकुरी टके २५ पंचवीस करून दिधले असेती यास जो कोणी आनसारिखे करील त्यासी गाईची आण माहादेवाची आण असे सदर्हू धर्मादावकाच पटीस घालून देणे हे लिहिले सही