Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २५९.

छ १ शवाल.
१७०२ भाद्रपद वद्य २.

श्रमिंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-

सेवक रामचंद्र कृष्ण रिसबुड सा नमस्कार विज्ञापना. तागायत छ १५ माहे रमजान मुकाम आदवानी नजीक, नबाव बसालतजंग, जाणोन वर्तमान यथास्थित असे. विशेष. येथील वर्तमान छ २३ साबानीं जासूदजोडीसमागमें विनतिपत्रें व नबाबचे इनायतनामे सहीत रवाना केले ते पावोन सेवेसीं अर्ज जाली असेल, अलीकडे छ १० माहे रमजानीं सेवक दरबारीं गेलों असतां, नबाव अमीरूलउमराव यांणीं खलबतींत च्यार घटिका बोलिले कीं, गटुंरचा तालुका नवाब निजामद्दौलाबहादरे यांणीं आपणाकडे करून घ्यावयाविस इंग्रज फिरंगी बंगालेकर यांसीं जाबसाल लाविला आहे कीं, सरकारांत घ्यावा. आह्मांस ह्मणतात कीं आह्मीं सरकारांतून ऐवज नक्त देऊ. येविशीं आह्मी मुकरर अर्जी हुजूरांत केली आहे कीं, आपण पहिलेपासोन सर्फराजी केली आहे, त्याप्रो अमलांत आणावें. कदाचित् गंटुर तालुका सरकारांत ठेवणें मंजूर असलियास त्याचा ऐवज आह्मांस द्यावा. महाल लाऊन द्यावे. कारण कीं, आह्मांस पहिलेपासूनच जुम तालुका बहजार दिलात. कारवाई होते. तालुकियावर दामसुके करून देऊन व तनखा करोन देऊन कारवाई होते. नक्त ऐवज सरकारांतून देऊं ह्मटलियास येथील निकडीनें वारंवार अर्ज मारून करावे लागेल. याअर्थी ते गोष्ट ठीक नाहीं. कृपा करोन पहिलेपासोन सर्फराजी आहे. त्याप्रों ऐवज तालुका अथवा तोच महाल ठीक करोन, आमचा आह्मांस द्यावा. येविषयीं आपण हुजूरांत सई व कोशिस करून नबाबा स लिहिलियाशिवाय मामुलप्रों अमलांत येत नाहीं. येविषयीं राजश्री जिवाजीपंत वकील सरकार यांस लिहून हुजुरांत काम होऊन ते गोष्ट करावी. येविशीं, राजश्री कृष्णरावजीकडून लिहावें, म्हणजे कामाची बरामद होईल. आह्मी सर्व प्रकारें श्रीमंताचें मर्जीशिवाय व हजरत बंदगानअल्लीचे मर्जीशिवाय नाहींत. ज्यापक्षीं उभयपक्षीं सल्ला, तेच आमची सल्ला, सल्लाप्रों वर्तणूक करोन हुजूरचे आश्रयाची बड आहे. यास, येविषयीं पूर्वी लिहिलें आहे. व हालींही पत्रें व इनायतनामे पाठविले आहेत. पत्र पावतांच डाकेसमागमें मुसनापत्रें पाटवावीं म्हणोन बोलले, व म्हणाले कीं, येविषयीं आपण सई करोन बोलिल्याशिवाय बंदोबस्त होऊन, काम चालणार नाहीं. म्हणोन बहुतां प्रकारें सांगितलेवरून सेवेसीं विनंती केली आहे. त्यास, स्वामीनीं साहित्य केली. याशिवाय परिणाम दिसत नाहीं. छ ११ माहे मिनहून सुतरस्वार हैदरअल्लीखानबहादर यांजकडून वर्तमान आलें कीं, आरणीचा किल्ला घेऊन अर्काटेसमीप उतरलों. मोर्चे लाविले आहेत. आजपर्यंत अठरा किल्ले घेतले व वेळूरचा जाबसाल भेद केला आहे म्हणोन बोलत आहेत. छ १२ माहे मीनहूस सेवक दरबारीं रात्रीं दीड प्रहरीं नबाबाकडे गेलों असतां, नबाब बोलले कीं, काल रात्री बहादर यांचे लष्करांतून कोणीं लिहिलें आहे कीं, पहिले कडाचुरी नंदराज श्रीरंगपट्टणकर याजपासोन कर्ज घेतलेबा रुा एक क्रोड व्याज सहीत व त्रिचनापल्लीचा किल्ला द्यावा. दिलीयास सलुख करावा. ऐसें मानस दिसतें. म्हणून तेथून वर्तमान आलें आहे. म्हणून बोलत होते. पुढें दाहा हजार फौज चिनापट्टणावरून रवाना केली आहे व राजश्री उत्तमराव व इत्ययारखान यांस हैदरअलीखान यांनी रुकसत केलें. दोन चार दिवसांत येणार म्हणून उत्तम सुतरस्वार तेथून पुढें आला. त्यानें वर्तमान सांगितलें व पत्रें ही अलीखानबहादुर यांणी कर्नाटक प्रांतीं लूट केली व महमूद बंदर येथील हत्ती वगैरे आणले. म्हणून पेशजी विनंती केली आहे. गोठुर प्रांतींहून वर्तमान सावकारी लिहिलीं व लोक बोलतात की, मीर हैदर अलीखानाकडील यांणी गोठुरचे तालुकियांत स्वारी करून जमीदारांचे भेदानें तमाम मुलखांत अंमल आपला केला. व फिरंगी कांहीं पंचवीस पन्नास व बार दोन च्यारसे गार्दी होते. ते मंगळगिरीकडे निघोन गेले. म्हणोन वर्तमान आहे. येविषयीं नबाबासही विचारलें असतां, बोलले की, आमचें वर्तमान कांहीं आलें नाहीं, लोक बोलतात. भागानगराहून वर्तमान आहे कीं, सुरतेकडील फिरंगीयास चिनापटणकरांनीं बोलाविलें असतां, उत्तर पाठविलें कीं, इकडे काम कांहीं जालें नाहीं, मग आमचें येणें कोणे प्रकारचें होईल ? ह्मणून वर्तमान आहे. व कोकणपट्टींत फिरंगी इंग्रज बंदरकिनात्यानें पुण्यापासोन सोळा कोशीं आहेत, म्हणोनही भागानगरचे आंखबारेंत होतें. येथील वर्तमान पेशजीं कपटराळचा किल्ला नबाबाचे फौजेंत घेऊन किल्ला पाहून बरोबर करून पुढें कोडदुरास फौज जाऊन महासरा केला आहे. व मीरमुबारकखान सक्दरजंग हे नबाब निजामद्दौल्लाबहादर यांजकडून पेशजीं आले. ते अद्यापि येथेच आहेत. छ १३ माहे मीनहस दरबारी गेलो असतां, नबाब बोलले की, तुम्ही श्रीमंतास व आपणास आम्हांविषय बहुत प्रकारे लिहावें की, गोटूरचे जिलियांत अथवा ऐवज महाल होत ऐसें करावें. आम्ही सर्व प्रकारें आम्हीं आपले फौजेनिशीं आपले आहोंत. पुस्तेज्यापासोन घरोबा आहे साहिता केलियाप्रमाणें ह्या जाबसालास मामुलप्रमाणें अमलांत येते. योजना करून लिहोन अमलांत ये तें करावें. त्याजवरोन विनंती केली आहे. नवावानीं आपली जोडीही दिल्ही आहे. मी बोललों कीं, आमची जाडी पाठवीतच आहे, हें कशास पाहिजे? त्याजवरोन बोलले कीं, काम जरूरी, आपली जोडी व सरकारी जाऊन सत्वर उत्तरें घेऊन येतील. म्हणून पाठविली आहे. नबाबांनीं इनायतनामा आपणास एक व तीर्थस्वरूप राजश्री कृष्णरावजीस इनायतनामा व राजश्री हरीपंत तात्यास खलिता ऐसे घेऊन सेवेसीं पाठविले आहेत. येऊन पोचतील. जासुदास रोजमुरा द्यावयास आज्ञा करावी. उत्तराचीही आज्ञा होऊन रवाना करावें. पेशजीं तीन जोड्या जोडीमागून जोडीरवाना करीत गेलों. परंतु फिरोन एकही जोडी सेवकाजवळ आली नाहीं. राजमुरेविशीं फार विलंब लागतो. वरचेवर पावत नाहींत. येथें महर्गता फार आहे. मागील रोजमुरे बाकी राहिले ते हाल्ली ऐसें देऊन पाठवावें. सेवकास एथें येऊन एक वर्ष झालें. अद्यापि नेमणूकचिट्ठी व जहागिरी गांवचा बंदोबस्त व खर्चासही कांहीं सरंजामी होऊन येत नाही. यामागेन आजपर्यंत कर्ज सावकारी खादलें. त्यास देण्यास कोठें ठिकाण नाही, आणि नित्य खर्चास पाहिजे. त्यास, साहेबीं कृपा करोन नेमणुकीची चिठी व जहागिरी गांवचा बंदोबस्त करोन व खर्चास हुंडी चिठी नारायण पेठेची करोन पाठवावी. येविषयीं वारंवार विनंती करावी. यास स्वाम सर्वजण आहेत. साहेबाशिवाय संरक्षण कसें होतें ? साहेबाचे मर्जीस ज्याप्रमाणें कृपा करोन बंदोबस्त करोन पाठवावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक २५८

( असल बमोजीब नकल.)
१७०२ श्रावण

पंडत अजम बाळाजीपंत फडणवीस सलमलाहुताला.

सो मेहेरबान करमफर्माय मुखलिसां बादज षौक मुलाकत मशरर्त आयात हत्तीहाद माअसरबाद येथील खुष्की जाणून आपली शादमानी हमेशा कलमी करीत यावें. दिगर, आह्मीं घांट उतरून मखालिफाकडील कित्तेक गड किल्लेस ठाणा घातले. मजकूरास पट्टी लेहून पाठविलें असे, त्यावरून मालूम होईल. चेनापटणाकडेही दौड पाठविलें असतां, मकान मजकुराचे आसपास नीम कोसचे फासलेनें फिरंगीयांचे बाग आहे. त्या भागांतील फिरंगी सरदार वगैरेस मारामारी केल्याचा मजकूर परभारें आपणास जहूरांत येईल. इकडील फौज चेनापटणचे चौगीर्दी मारामारी करीत फिरत आहेत. बिलफैल, फिरंगीयांनी इकडे भारी शेह लागल्याकरितां मछलीबंदर वगैरे तमाम जागेची जमियेत बोलाऊं पाटविलें आहेत. त्यापैकीं कांहीं जमियत येऊन जमा जाली आहे. आणखी जामियत येऊन जमा होणार आहे. त्यांणीं जमा होऊन मैदानास निघतील तरी लढाई करावी, ह्मणोन मुकरर केलें असे. बिलफैल, या मुलखांत बारीषेचा शदत फार आहे. तरी आम्हीं आपले दोस्तीवर नजर देऊन, बारीष वगैरे एकही न पाहतां, सख्ती कबूल करून, कुल्लहा पैशाची तबीचे कामावर नमूद जालों असों. जे जे तंबी होत जाईल ते हुजुरांत येईल. नबाब निजाम अल्लीखां व भोसले तांहाल खामोष याचा सबब काय न कळे. तरी कलमीं करून पाठवावें. कृष्णराव नारायण तेथे पोहोंचले असतील. आपणाकडून येथें राहावयाबद्दल रावमानिलेसच रवाना करून पाठविणेचें करावें. हमेषा आपली शादमानी कलमी करीत यावें. जिआदा लिहिणें काय असे ? हे किताबत.

पत्रांक २५७

( मुसाभुसी याचे पत्राची नकल ) श्री ( नकल ) १७०२ आषाढ वद्य २

जहांमगव अवालिमरतबात शोकतमाली मनलतमुलान मेहरबान मदारुलमहाम बाळाजी पंडित मुबक मोहवतहूं:-

छ १५ रजब पावेतों दरजागा गुडालूर खैर आफियत जाणोन आपली षादमानी हमेशा कलमी करवीत असलें पाहिजे. दिगर इंग्रेजांनीं बहुत गरमी यंदा तिकडे......करून खुष्की तमाम काबीज केले. आणीक करीत जातात. याजकरितां खुषकीचे तमाम सरदारांनीं इंग्रेजास तंबी करून खुषकींतून त्याजला खेरीज करावें. ह्मणून नकष ठराऊन त्याजप्रमाणें इंग्रजावर चहूंकडोन खुषकीवर मोहीम केली आहे. दर्यांत इंग्रजांची जहाजें वगैरे आहेत. त्यांचे तंबीबद्दल फरासीसांची जमियत पाठवणें. परंतु मसलत करून नवाब हैदरखान बहादर इज्जतमकान याजकडून फरांसिसांच्या पातशाहास व वजीरासही ते खत लिहून मुजरतमहाम वगैरे पाठविले. करितां पेशजीं मुसे सोडोब व मुसे खुषमैन बा फरासीसांचे जमियत रवाना करून पाठविले होते. त्यास हाली आम्हांसही सात हजार सालेदातसहित रवाना करून पाठविले. याकरितां आह्मीही गुडलुरास येऊन तीन महिने जाले. आह्मीं पाहिजे तसा सामान सरंजाम व तोफखान्याचे बैलावर चारीच घोडे व खबरदारीकरितां बैल उंटें वगैरे खर्चास नकद व खाणेचा सरंजाम नबाव फत्तेअळीखानबहादूर यांणीं करून दिल्हा आहे. आह्मी आपली जमियत व नबाब मौसूफ यांची जमियतेचें इत्तिफाकानें अनकरीब चेनापट्टणचें मकान घेऊन, इकडील इंग्रजास तमाम गारत करून, तैसेच मुंबईकडे दर्याचे राहानें मुसासुफरूनें यांस जाहाजासुद्धां रवाना करून पाठवून, आह्मीं खुषकीचे रहानें येत असों, खुदाचे फजलेकडून मुंबई वगैरे मकाने घेऊन रावपंडितप्रधान यांचे तालुके मकानांत वगैरे इंग्रजानें घेतले आहे तेंही सहजाणें सोडून दिल्हें जाईल. आह्मीं आलों तें पाहून, इंग्रज आपले जागां घाबरा होऊन, खुषकीचे सरदारांशीं फोडाफोडी करून, आपणाकडे करून घ्यावें ह्मणून या तजविजेंत आहेत. त्याची तजवीज आपण आपले करारमदारावर कायम राहून, तिकडे इंग्रजांत तंबी अंमलांत येईतसें करावें. आमचे व आपले इत्तीफाकानें इंग्रजाचें नांव निशाण नाहीसारखें नेस्तनावृत होतील. आनि बहुतां दफन होतील. आपण हें काम रातीवानें, बनांव दूरंदेशी आहेत, कलमी करावें असें नाहीं. इंग्रजाकडील हमीष्टवीन गरनल......व असीर जाहले आहेत. त्यास सोडून द्यावें. त्यास कैद करून ठेविलें...इंग्रजाकडे रघुनाथराव आहेत. त्याचा बदला होत आहे. आह्मांस आपले दोस्त जाणून हमेषा आपली षादमानी कलमी करीत आलें पाहिजे. जिआदा काय लिहिणें असे?

पत्रांक २५६

श्री.
१७०१-१७०२

यादी राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर सुा समानीन मया व अल्लफ.
१ तुमची आमची निखालसता                   १ इंग्रजाचे मसलतीस आह्मी उ
राजश्री बाळाजीनाईक भिडे यांचे              भयतां सरदार येणार आहों. त्यास
विद्यमाने जाहली आहे. आपणांस              मयीं आह्मां उभयतांकडून अगर सर
खातरजमा पडावी येविस अलाहिदा          कारांतून तुम्हांविशींचे प्रकार वांकडे
कलमबंदी लिहिली आहे त्यावरून            आढळल्यास आह्मी तुम्हांस सर्व प्र
कळेल. ह्मणोन पत्र,                               कारें हमारा आहों. अंतर देणार नाहीं म्हणोन
                                                         बेलभंडार दिला आहे. कलम १

                                                         १ इंग्रजांचा व तुमचा वैरभाव
                                                         पडल्यास तुमचे साहित्य सर्व प्रकारें
                                                         करू म्हणोन पत्र. कलम.

पत्रांक २५६

श्री.
१७०१ माघ वद्य

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारोपंतनाना स्वामीचे सेवेसीः-

पो बाळाजीनाईक भिडे सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष राजश्री नारायणराव गोविंद हे राजश्री पाटिलबावांकडे पाठविले होते. त्यांसीं बोलोन येथें आह्मांकडे आले. त्यास त्यांच्या बोलण्याचालण्यांत पाटिलबोवांसीं आलें आहे. तें सर्व आपल्यास निवेदन करतील. तें ध्यानांत आणून, त्या दरबारचा बंदोबस्त पक्के रीतीचा करून, सेनाखासखेल यांचे निदर्शणांत येई तें करावें. सर्व भरंवसा आपला आहे. तेथें विस्तारें ल्याहावें नलगे. राजश्री खंडो आवजी पुन्हां आपले दरबारीं साधनास लागले आहेत. ह्मणोन वर्तमान परस्परें आईकितों, त्यास, सर्व साधन करणें आपणाजवळ. त्याअर्थी आह्मी काळजी कशास करावी ? आह्मांकडील व सेनाखासखेल यांजकडील मजकूर मारनिले निवेदन करितील, त्याप्रमाणें बंदोबस्त करून देत असावा.

पत्रांक २५४

श्रीशंकर प्रसन्न, त्रिसुद
१७०१ माघ वद्य ३०
राजश्री

पाटील बावा गोसावी यांसीः-

श्रीमंतसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो बाळाजी अनंत निा श्रीमंत राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर आशिर्वाद. विनंती. येथील कुशल ता माघ वद्य पावेतों सेवकांचे वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण राजश्री नारायणराव गोविंद यांसी आशा दिली. मारनिल्हे येथें आले. सविस्तर कृपेचें वर्तमान सांगितलें. त्यावरून बहुत संतोष जाहला. आपण थोर, सर्व प्रकारें सांभाळ करित आलो. पुढें आपण करितील. श्रीमंत रा सेनाखासखेल आपणाशिवाय काडीमात्र नाहींत. जी विनंती करणें ती मारिनिल्हेस सांगितली आहे. ती ध्यानांत आणून बंदोबस्त करावा. आह्मी सेवक लोक पदरचे असों. सेनाखासखेल यांसी पत्रें येथून रा केलीं आहेत. त्यांची उत्तरें आपणाकडेस येतील, त्याजवरून सविस्तर निवेदन होईल.

( यांतील शोधावरून हा मसूदा असावा असें दिसतें. )

पत्रांक २५३

श्री.
१७०१ माघ वद्य ११

दंडवत विनंती उपरी. छ. २९ माहे मोहरमची हस्ताक्षरची चिठी पाठ. बिली ती पावली. पावोन संतोष जाहला. कित्तेक अर्थ खातरजमेचे लिहिले. त्यासी आजपर्यंत ममतेचें लक्ष अकृतिम आमचे ठायीं जाणोन सर्वस्वीं अर्थे प्राणें आमचें लक्ष सरकारचे सेवेत. दुसरा अर्थ नाही. त्यापक्षीं सांप्रत जलचरांचा प्रकार वृद्धिंगत. कोण्हीकडील साहित्य समयासीं न जालें. प्रांताचा विध्वंस, स्थळाचा अपाय जाहल्यास पुन्हां विशेष प्रयत्न श्रमसाध्य. कारस्थानी समयोचित करणें ते करावें लागती. परंतु त्यांत सरकारमसलतींत उपयोग त्याजवर नजर आहे. यांत अंतर असेल तर शपथ असे. येविशींची खातरजमा असों द्यावी. सविस्तर नाईक निवेदन करतील. त्याजवरोन कळेल. रा छ २४ माहे सफर. हे विनंती.

पत्रांक २५२

श्री.
१७०१ पौष वद्य १४

राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर गोसावी यांसी.:--

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो महादजी शिंदे रामराम विनंति. उपरी. येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित अतिलें पाहिजे विशेष. आपणाकडून राजश्री नारायण गोविंद जामगांवचे मुकामीं आले. यांणीं कित्येक आपणाकडील घरोब्याचे अर्थ सांगितले. त्याजवरून कळलें. ऐशास पूर्वीपासून आपला आमचा स्नेह चालत आला आहे. त्याच प्रों पुढें चालावा, हेंच आमचें मानस आहे. त्यास, सांप्रत गुजराथप्रांतें इंग्रज यांणीं दंगा केला आहे. त्यांचें पारिपत्य करणें प्राप्त आहे. येविशीं मुजरत आपणाकडे पत्र पाठविलें आहे. व हालीं मारनिलेस सांगितलें आहे ते आपणांस लिहितील, आह्मीही दरमजल येत असों. आम्ही येऊ तोपर्यंत आपण दम धरून, ठाणीं जतन करून, शत्रूचे पारिपत्यास शेह द्यावा. त्याचा पराश्रम होऊ देऊं नये. आपणास सामील व्हावें, ह्मणून चिरंजीव राजश्री भनिरथराव शिंदे यांस लिहून पाठविलें आहे. आजपर्यंत आपण सरकारचें लक्ष राखिलेंच आहे. त्याचप्रों पुढें सरकारउपयोग करून दाखवावा. वरकड इकडील अर्थ आपणासीं दुसरा नाहीं, हें मारनिले लिहितील. पन्नाससाठ तोफा समागमें आहेत. ह्या दरकुचांत लांब मजलींत चालत नाहींत, याकरितां पंचवीस तोफा समागमें घेऊन, वरकड तोफा मागें ठेविल्या. मागाहून येतील. तूर्त पंसवीस तोफा थोर लहान बराबर घेतल्या. त्यासुद्धां जलदच येऊन पोहचतों. तों पावेतों इंग्रजांस ठासून राखावें. वर्तमान वरचेवरी कळवीत जावें. रा छ २७ मोहोरम. बहुत काय लिहिणें? लोभ किजे हे विनंती. मोर्तबसूद.

पत्रांक २५१

श्री (नकल)
१७०१ पौष शुद्ध १३

यादी कराराची येणेंप्रमाणे ठरली. सुा समानीन मया व अलफ, मो जाहला. बि:-
७१००० तूर्त नक्त द्यावे.
५०००० मुख्यास.
२१००० दरबारचा खर्च,
५००० रावजी
५००० भाई.
४००० आबा चिटणीस.
२००० रामाजी पाटील.
२००० आपाजी साबाजी.
२००० निळे शामजी.
१००० जिऊबादादा.
-------------
२१०००
---------------
७१०००
१५०००० राजश्री अंताजी नागेश याजकडून हिशेब घ्यावा ह्या ऐवजीं.
१००००० दरबारचा खर्च.
५०००० मुख्यास.
------------------
१५०००० सदरहू याद तुमचे हातीं असावी.
३२००० सरंजाम किल्ले पायागड यांसीं लाऊन द्यावा ह्मणोन पहिला करार तलबाचा.
------
२५००० मुख्यास.
४००० रावजीस गांव एक चांगला.
३००० भाइस गांव एक चांगला.
------
३२०००
याच्या सनदा द्याव्या अथवा सनदा जवळ नसल्यास कराराची याद लिहून देऊन यांचे कारकुनाजवळ सनदा यजमानाजवळ गेलियावर द्याव्या.
सदरहु तीनही कलमें याजप्रमाणें ठरलीं. याची तरतूद लिाप्रमाणें करून पाठवावी. आपण म्हणतील कीं, तूर्त देणें. याचा ठराव सांगितल्याशीं अधिक जाला तर येथून गृहस्थ गेले याजमुळें आह्मांकडून बोलण्यास कमी जाहालें. तेव्हां प्रदिप्ता फार जाहली. दोघे मुद्दई सबल, येथें त्यांचीं सूत्रें नाना प्रकारचीं लागलीं. मग कोणेप्रकारें बंदोबस्त खचित व्हावा. यामुळें ठराव याजप्रों जाहला. हिशेबाचे वक्तीं ठराव जाहला. तो आपले सरकारचे बिफायतीचा आहे. सरंजाम ठरला तो पहिले बोलण्यांत आहे. त्यास शक, विशमता जाहाली. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञप्ति. मिति पौष शुा १३

[ ३७ ]                                                                                          

हकीकत अदकार तपे सोनवळ वतन राजश्री रामचंद्र नीळकंठ भारद्वाज गोत्री याचे मूळपुरुष-

निळो नारायण

नारोपंताचा पुत्र
सोनाजीपंत

निळोपंताचे पुत्र
राजश्री रामचंद्रपंत



त्याचा पुत्र नारोपंत

सोनाजीपंताचा पुत्र
 निळोपंत
 ४

करीना वतनाचा. बेदरीं पातशाहा होते तेथे निळोपत कयाळनिशी करीत होते त्यांस पातशाहानीं तपेमजकूरची ठाणेदारी व मजम दिल्ही. महालास येऊन वरीस दोन वरसें अंमल केला त्यास, तपे मजकूरचा अदकारी महाद परभू होता. त्यावर कसाळा पडला याकरितां वतन विकावया गेला. मग कोणी न घेत. तेव्हा निळोपतीं शालिवाहन शके १४४५ चवदाशे पचेचाळिसावे शकीं नख्त टक्के १३००० तेरा हजार देऊन वतन खरेदी केलें. वतनाचा अंमल चालविला त्यास, मागती हुजूर मोसबा घेऊन येणें ह्मणून हुजरून हुकूम आला त्यास, येतेसमयीं कळोपंत बिन नागोजीपत भारद्वाज गोत्री ह्मणून ब्राह्मण होता बरा, लिहिणार ह्मणोन यारेदी सांगून ठेविला होता त्यास, आपण हुजूर गेले ते समयीं वतनाची देखरेख यासी सागितली त्याचा वंश पुरुषः-

कळोपंत बिन नागोजीपंत
यारेदी ठेविला.

सोमाजीपंताचा पुत्र
मुरारी

रामांजीचा लेक मुरारपंत

कळोपंताचा पुत्र
सोमाजीपंत
 २
 मुरारीस संतान नाहीं. मग
 सोमाजी कळो याचा भाऊ गोविंद
होता त्याचा पुत्र रामाजी गोविंद,
परंतु पिढी १
 मुरारीचा लेक भानजी
 ५