लेखांक ४४८
१६१५ ज्येष्ठ शुध्द १
सके १६१५ श्रीमुख नाम संवत्सरे जेस्ट सुध प्रतिपदा तदिनी खत लिखिते धनको नाम केसोभट ब्रह्मे रिणको नाम मल्हारि नाणेकर का। चाकण आत्मसुखे तुह्मापासून कर्ज घेतले रु॥ १०. दाहा रुपये यास कलांतर दर माहे दर रुपयास रुके
६ प्रमाणे देऊन यास मुदती जोंधळियाचे रासी माथा देऊन हे लिहिले सही
(नि॥ नांगर)
गोही
बापूजी त्रिंबक देसपांडे पा। मा।