लेखांक ४४३
१५८० पौष शुध्द ४
वेदमूर्ति राजमानी राजश्री
बाबनभट का। इंदोरी
गोसावियासि
केरोजी पोवार विश्वासराव दंडवत विनति उपर लिहावया कारण ऐसा जे का। मा।री तुमचे इनाम आजीतागाईत चालिला नाही आणि आता कुनबियाची सेते सरकारचा महसूल खात असाल तर देणे लागेल जर इनाम खाणे असेल तर मोगलाईमधून तनखियात पैके वजा करून एणे तेव्हा इनाम खाणे नाही तर हरगीज कुणबियाची आणोन खाणे जर खाल तर दुगुणीने पैके देणे लागितील कळले पाहिजे हे विनति अखेर साली पैसे देणे लागतील मग कस्टी व्हाल हे विनति