[ २४ ] ८ सप्तंबर १६७१.
मशहुरल हजरत राजश्री तुकोराम सुबेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दडवत शहुरसन इसन्ने सबैन व अलफ उपरि सबनीस सुबे मजकूर यावरी बाद ++++ तगारा नाईकवाडी ++ बापूजी नलवडा याणे कल्हावती करुन तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटांत सुरी मारुन घेऊन जीव दिल्हा. हें वर्तमान होऊन गेलें तुह्मीं कांहीं हुजूर लिहिलें नाहीं मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतीजा तोच पावला. हालीं बापूजी नलवडा व कोंडाजी चांदरा व संताजी जामदार हरबकसा करुन सबनिसास दटावितात की +++++ होतें तेच तुमचे उपरि उचलो +++++ - वर्तमान कळों आलें. तरी ब्राह्मणास ++++ तील त्याची खबर घेणें जरुर आहे. तुह्मी ++++ घेत नाहींत. इतकियाउपरि त्यास ताकीद करुन हालखुद ठेवणे कीं सबनिसाचे वाटे न च जात. जरी काही सबनिसासी कथळा करायावरी ख ++++ ल हालखुद माकुलपणे असतील तरी हुजूर लिहिणें ह्मणजे तहकीक आहे की सबनीस मारायावरी आले होते याबद्दल साहेब त्यांस दस्त करुन हुजूर आणवितील आणि खबर घेतील. तुह्मी ऐसे बेकैद लोकांस होऊं न देणें हालखुद ठेवूनु खेशवार चाकरी घेत जाणे की कोण्ही बेढंग न वर्ते मुलाहिजा न धरणें छ १४ जमादिलावल
मोर्तब सूद.