लेखांक ४४७
१६१४ मार्गशीर्ष शुध्द १४
राजश्री दामाजी नारायण सुभेदार
व कारकून प्रा। जुनर गोसावियासि
अखंडितलक्षमीअलंकृतराजमान्य
सेवक शंकराजी नारायण सचिव नमस्कार सु॥ सलास तिसैन अलफ बेदमूर्ति कृष्णभट बिन केशवभट ब्रह्मे वास्तव्य कसबे चाकण याणी हुजूर एउनु विदित केले की आपणास पूर्वीपासून इनाम व रोजमरा कसबे चाकण व कसबे इंदोरी चालिले आहे बिता। कसबे चाकण जमीन चावर १ एक बा। थल नाणेकर खडी ९ पैकी खंडी ३ एकूण चावर सदरहू देखील नख्तयाती व महसूल सेलबैल व पायपोसी व खर्चपटी बाजे तुटपटी हुजराती व गैबतीहून पटिया देखील त्यापैकी त्याथलावरी एईल त्याणी खंडियाची तकसीम एईल ते व वेठीबेगारी कुलबाब कुलकानू देखील विहीर हुडा थलावरी वाटून ती खडियावरी एईल ते घेणे इनामतीच्या चावरामध्ये आंबे व चिंचा झाडझाडोरा आपण प्रजेकरून करुनु त्याचा राजभाग हाली व पेस्तर द्यावा
आंबराई बनास पेडी जकायती व जराईब पैकी
१ जकायती का। जराईब
मा। पैकी रोजमुरा पैकी सदका
व धर्मादाऊ दरोज तेल दरोज
रुके .।. १
कसबे इंदोरी इनाम चावर थल मीलनाक खंडी ३ एकूण चावर १ एक देखील नख्तयाती व महसूल व पटिया कुलबाब कुलकानू देखील तुटपटी व वेठीबेगारी
एणेप्रमाणे आपल्या वडिलवडिलापासून ता। सालगु॥ चालिले आहे याची पत्रे राजश्री स्वामी व कैलासवासी स्वामी याची आहेती तरी आपले इनाम चालविले पाहिजे ह्मणउनु विदित केले त्यावरून भटगोसावियापासून राजश्री माहाराज स्वामी व राजश्री कैलासवासी स्वामी यांची पत्रे होती ते रुजू पाहोनु तुह्मास आज्ञा केली आहे तरी याचे राजश्री कैलासवासी स्वामीचे कारकीर्दीपासून ता। सालगुदस्त चालिले असेल तेणेप्रमाणे पेस्तर हि साल दर साल चालवणे ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे पत्राची तालीक लिहून घेउनु असल पत्र परतोन देणे छ १२ रबिलाखर पा। हुजूर
बार सुरू सूद बार
पौ। छ १९ जमादिलोवल
सन सलास