लेखांक ४५०
श्रीमार्तंड १६२२ आषाढ शुध्द १३
नकल
पारसी मोहोर
पारसी काजीचे दस्तक
चकनामा दरवजे मदतमाश बो। केशवभट वलद कृष्णभट ब्रह्मे जुनरकर सेकीन का। चाकण प्रा। मा।र सरकार जुनर सुबे खुदस्तेबुनियाद सु॥ हजार १११० बदल खैराती बमोजिब दरवजे अमीरअल-उमराये मुताबिक दरवजे बमोहर उमदे वजराये रफीशान् उमदे सवनी बुलद मकान् जमदतुलमुलक मदारलमहाम मवजी तीन खंडी ३ मजरू एकएक जिराती दर कसबे चाकण थल नाणेकर पैकी पाटिया ६ दर पाटीस मण .॥. दाहा माा खंडी तीन मोकरर करून चक बरहुकूम हदमहदूद करून दिल्हे असे सालाबाद पुस्त दर पुस्त खाऊन हमेशा हजरत जिलसुभानीयास दुवा करीत जाणे बिता। हाद
पूर्वेस बाग फुलारा पछमेस हाद निघोजे
मार्ग व पाणद असे
उत्तरेस बाग करपा दक्षणेस विहीर घेरू
व बाग गाडपिला व नाणेकरवाडी नजीक
व बाग कुलकर्णी पेडवला बाग फुलारा
सदर्हू हामहदूद व सेतामधे विहिरी २ नजीक नाणेकरवाडी विहीर १ व नजीक पिंपळाचे झाड विहीर १ एकूण विहिरी २ व आंबे दिरख्त ३ तीन आहेती याप्रमाणे खाणे हा चकनामा सही तेरीख ११ माहे मोहरम सके १६२२ विक्रम संवछरे आषाढ सुध १३ त्रयोदसी