लेखांक ४४९
श्रीशंकर १६१७ माघ शुध्द २
अज सरसुभा राजश्री दामाजी नारायण सेनापत्य हजारी व कारकून ता। मोकदमानि व सेटिये माहाजन का। चाकण सु॥ सीत तिसैन अलफ वेदमूर्ति बाबदेभट ब्रह्मे यासि का। मजकुरी इनाम आहे त्यास तह्मी खलखल करिता ह्मणून विदित जाले तरी हुजरून वेदमूर्तीस इनाम दिल्हा असता तुह्मास खलखल करावयासि प्रयोजन काय आहे याउपरि वेदमूर्तीस इनामाचे बाबे खलखल केली होईल ह्मणजे तुमचा मुलाहिजा होणार नाही ऐसे समजोन जरा तोसीस न देणे जाणिजे रा। छ १ रजबु मोर्तब सुद