[ २७ ] ६ डिसेंबर १६७१ श्री. ( श्री )
( सीव चरणीं तत्पर )
( त्रिंबकसुत मोरेश्वर )
मशहुरल हजरत राजश्री नरहरी आनदराऊ सरसुभेदार ता । कुडाळ प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत सुहुरसन इसन्ने सबैन अलफ साहेबी प्रभावळीपासून तहद कल्याण भिवंडीपावेतो मिठाचा जबर निरखाचा तह दिल्हा आहे ऐसीयासी, बारदेशात मीठबदरें आहेत तेथून मीठ खरीद करुन उदमी नेत आहेत ऐसीयासी, हालीं आपणाकडे मिठाचा पाड जबर जाला, हे गोष्टी ऐकोन उदमी खळक कूल बारदेशाकडे जातील. तरी तुह्मी घाटीं जकाती जबर बैसवणें बारदेशात मीठ विकते त्याचा हिशेबें प्रभावळीकडे संगमेश्वराकडे मीठ विकतें, त्याणे कितेक जबर पडतें, तें मनास आणून त्या अजमासें जकाती जबर बैसवण कीं संगमेश्वरीं विकतें आणि घाटपावेतों जे बेरीज पडेल त्या हिशेबें बारदेशीच्या मिठास जकाती घेवणें संगमेश्वराहून बारदेशीचें मीठ माहागच पडे ऐसा जकातीचा तह देणें जरी जबर जकातीचा तह नेदा, मुलाहिजा कराल, ह्मणजे कुल उदमी खळक बारदेशाकडे वोहडेल आपलीं कुल बंदरे पडतील. ऐसी गोष्टी आहे. तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुल घाटीं जकाती जबर करणें. सगमेश्वराहून बारदेशीच्या मिठास जबर निरख पडे ती गोष्ट करणें. ये गोष्टीचा एक जरा उजूर न करणें. ये गोष्टींत साहेबाना बहुत फायदा आहे. जरी जबर किंमती केली आहे त्या हिशेबें बारदेशीच्या मिठास जबरच पडे ती गोष्ट करणें. व तुह्मांकड लहान मीठ आहे त्याचा तह आहे त्याखेरीज हाली जाजती दर मणें टंकसाळी रुके + बारा रासप्रमाणें तह देणें. मुलाहिजा न करणें. मिठाचा मामला हजराहीबद्दल कर्द लाख रुपये यावयाचा मामला आहे तरी लिहिलेप्रमाणें अंमल करणें. या कामाबद्दल पाठविले असती त्यांसी मसाला होनु नी ।। ४.
रामाजी बांदे हरकारा संताजी गिरजोजी अपातप
रा। होनु नी ।। ३ होनु १
पाठवले असत. यांसी मसाला होन नी ।। ४ होनु. पा । कुडाळपैकी आदा करणें.
रास आदा करणें. छ १४ साबान. पा। हुजूर.
पौ। छ २५ साबान ( मर्यादेयं )
मुद्दे कुडाळ, बराबर रामाजी बार सूद. ( विराजते )
दादो हरकारा. सुरु सूद.