लेखांक ४५२
श्री १६४१ फाल्गुन वद्य ६
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान ता। मोकदम का। इंदुरी प्रा। चाकण सुहुरसन असरीन मया अलफ का। मा।री वेदमूर्ति मुरारभट ब्रह्मे यास इनाम जमीन खंडी तीन आहे त्यापैकी दीड खंडी तुह्मी हिरोन घेतली ह्मणऊन विदित जाले तरी यांचा इनाम यांचे दुमाला करणे फिरोन बोभाट एऊं न देणें जाणिजे छ २२ जमादिलोवल आज्ञाप्रमाण