पत्रांक ५४०
श्री.
१७२३ भाद्रपद वद्य ५
पौ भाद्रपद वद्य ९
विद्यार्थी परशराममट धर्मांधिकारी व मल्हार रामचंद्र कुळकर्णी मोजे कायगांव सां नमस्कार विनंति विज्ञापना येथील क्षेम ता भाद्रपद वद्य ५ पर्यंत आपले कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. +++ हालीं वर्तमान डाल–टन कंपू पलटण अमदानगर, याचा मुकाम आपले येथें जाला. दीडमास होत आला. त्यास अद्यापि कूच करीत नाहीं ! मनश्वी उपद्रवकरितां ! सरंजामाची चिठी दुसरे वेळेस केली. त्याचा मजकूर मोहगम पूर्वीचे पत्रीं लिहिला होता. त्यानें जबरी करून चिठी प्रो सरंजाम घेतला. आह्मी पंचवीस मंडळी घेऊन लष्करांत गेलो, परंतु त्याचे गांवीं कांहींहि दया नाहीं ! रदबदलीन माणूस चिठी प्रो घ्यावा ह्मणूं लागला. + ++ त्यास, आता कसेंही करून याचे सरदार कर्नेल याचें पत्र फरंगी लिपीचें आलें तर हा कूच करील; नाहीं तर हा मासपक्ष येथून उठत नाहीं. याकरतां त्याचा हरकारा व पत्र घेऊन पाठवावें. सरकार शिंदे यांचें पत्र दाखविलें. परंतु मानीत नाहीं. याकरतां करनैलाचें पत्र आलें पाहिजे. तर शिंवराची पेरणी होईल. यानें मोठी धूम केली. कुणब्याचे गरती बायकोचे आबरू एकदोघींची घेतली !! व गांवांत उपद्रव होतो. तो पत्रीं लिहितां येत नाहीं.+++++++
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)