पत्रांक ५३५
श्री.
१७२३ श्रावण शुद्ध ७
पो पत शु।। ७ शके १७२३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री व्यंकट रावजी स्वामीचे सेवेसी:-
पो आबाजी नीळकंठ सां नमस्कार विनंति. येथील कुशल तागायत श्रावण शुद्ध ७ पा। वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण एक दोन वेळां पत्रें पाठविलीं ती पावलीं. गांवाविशीं लिहिलें. त्यास, राजश्री तात्याकडून अजुरदार आला. त्याजबा पत्र येथून पा तें पावलेंच असेल. येथून कारकून रा बाळाजी गोपाळ मुजरद सेंदव्यास पाठविले. त्यांणीं होळकर याची व पाराजी पंत-बाबा यांची भेट घेऊन गांवचें वर्तमान सविस्तर सांगितलें. नारोगणेश यांचे चिरंजीव यांचीहि भेट घेतली. त्याणीं उत्तर केलें कीं, हे गांव वाघाचे इनामी आहेत. राजश्री येशवंतराव होळकर यांणी तुळसाजी वाघ यांस दत्तपुत्र देऊन सरंजाम त्याचा त्याजकडे सांगावा, असा करार केला आहे. तेव्हां इनामगांव जरी सरंजाम न दिल्हा तरी हे गांव त्याचे त्याजकडेस देणें प्राप्त. त्यांत रदकजीस नेमून भिडेस्तव..........कर यांस कर्ज लाखों देणें आहे. तेव्हां गोष्ट घडत नाहीं. गांवची मोकळीक होणें कठीण. ज्यांचे भिडेस्तव गांव दिल्हे ते पुण्यास राहिले. याप्रमाणें उत्तरें जालीं. काशीराव होळकर निघोन महेश्वरास गेले. याप्रा वर्तमान आहे. पुढें कर्तव्य तें करून कार्य होय तो अर्थ करावा. राजश्री भिकाजीपंत तात्या प्रसंगी असते तरी कांहीं साहित्य करिते. ते पुण्यांत राहिले, तेव्हां गोष्ट विलग पडली. आह्मांकडील वर्तमान तरीः इतके दिवस शिंदे याजकडील उपद्रव होऊन माहाल लुटले गेले. त्यास हाली शिंदे याजकडील फौजसुद्धा पारनर्मदा जाहाले, सरजेरावहि तापी उतरून गेले. शिंद्याकडील उपद्रव येशवंत होळकर इकडे येऊं देत नाहीं. परंतु जिवाजी यशवंत दहा हजार पायदळस्वारांनिशीं वोशागडाहून उतरून मोठा दंगा मांडला आहे. त्यामुळें गांवें बेचिराख, घरें दारें जाळून मोकळीं केली.
पुन्हां दंगा.........जाईल असा अर्थ ठेविला नाहीं. असो.... अखेर श्रावण येतों. भेटीनंतर सविस्तर कळेल कीं, पहिला आहे तोच आहे. कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)