[ ६२ ] श्री. २८-२-१७०८.
राजश्री खेमसावत भोसले सरदेसाई पा। कुडाळ व महालनिहाय गोसावी यासी- छ अखडितलक्ष्मीअलकृतराजमान्य प्रतिराजश्री राजा शिवछत्रपति उपरि साप्रत राजश्री शाहूराजे याचा फितवा निर्माण होऊन राज्यात डोहणा जाहला. कितेक सेवकलोकी अवक्रिया करून जाऊन, त्यास मिळोन, अनसारिखी वर्तणूक आरभिली आहे या प्रसंगे तुह्मीं स्वामीशीं निष्ठा धरून, निर्व्याजत्वें , एकरूप निष्ठेनें वर्तणूक केली व राजश्री विश्राम अनंत व जीवाजीराम यास कितेक आपले निष्ठेचा अर्थ -हद्गत सागोन पाठविले कीं, आपण त्रिकर्णशुद्धीनें स्वामींशीं निष्ठेनें वर्तणूक करून, शाहूराजे यांकडे अनुसंधान लावणार नाहीं सर्व प्रकारे स्वामीची सेवा करून प्रयोजनप्रसंगीं स्वामीचे आज्ञेप्रमाणें आपणाकडील हशमांचा जमाव स्वामीचे सेवेसी देऊन, आणि त्यांचा पराजय करून, सर्वस्वे स्वामीची सेवा करून, स्वामीस संतोष पाववून, स्वामीनीं कृपाळू होऊन आपणाकडे पा। कुडाळ व बांदे व डिचोळी व साखळी व गणेरी व पेंडणें, हे सहा महाल वतनदाखल मुकासा चालवावे. ह्मणोन विनंति सागोन पाठविली ते या उभयतांनीं हुजूर येऊन निवेदन केली. त्यावरून स्वामींनीं तुमचे प्रामाणिकतेचा व एकनिष्ठतेचा अर्थ चित्तात आणून राजश्री रामचद्र नीळकंठ अमात्य हुकमतपन्हा यास व राजश्री गिरजोजी यादव यास आज्ञा केली याचे भेटीस तुह्मीं माणगावीचे मुक्कामीं येऊन भेटी घेतली आणि आपलें वृत्त यास निवेदन केलें की, आपण राजश्री स्वामीसीं एकनिष्ठेनें वर्तत आहों, पुढेंही स्वामीची सेवा एकरूप निष्ठेने करून शाहूराजे याकडे अनुसधान लावणार नाहीं, त्यांसी विरुद्धाचरणे वर्तोन, ये गोष्टीस अंतर पडणार नाहीं ह्मणून, एकान्त करणे, आपल्या आराध्य देवाची क्रिया करून वर्तावयाचा निर्वाह केला. तो अर्थ विशदेकरून यांही स्वामीस श्रुत करून तुमचें चालवायाविशीं विनति केली त्यावरून मनास आणितां तुह्मीं ह्मणजे वशज घराणदार, प्रामाणिक, एकवचनी आहा सदरहू लिहिल्याप्रमाणें अकृत्रिमभावें स्वामीची सेवा करून स्वामीस संतोष पाववाल, क्रियेस अतर करणार नाहीं, हा अर्थ दृढतर चित्तारूढ जाला. आणि स्वामी संतोषी होऊन तुमचें मनोभीष्ट सिद्धीस पाववावे हें अगत्य जाणून पा। कुडाळ व बादे व डुचोळी व पेडणें व सांखळीं व मणेरी या महालीं देवाब्राह्मणांचे इनाम सर्वमान्य स्वामीचे सनदेने आहे तें व वतनदारांचे इनाम खेरीज करून व वरकड गडाकिल्लेयाचाचा व जजिरियाचा तनहा व हशमांचा दुमाला सालाबाद तागायत सालगुदस्ता चालत आला असेल तो पुढेंही साल दर साल पाववीत जावा आणि सदरहू माहाल तुह्माकडे वतनादाखल चालवावे. ऐसी आज्ञा करून सनद निराळी सादर केली आहे. त्याप्रमाणें स्वामी तुमचे चालवितील हालीं स्वामीने तुह्मांकारणे हत्ती १, घोडा १, उरानडाव १, गुस्त १, येणेप्रमाणे पाठविलें आहे. घेणें आणि लिहिलेप्रमाणें स्वामीसीं निष्ठेनें वर्तणूक करीत जाणें. स्वामी तुमचे चालवाया अतर करणार नाही. सुहुरसन समान मया व अलफ. छ १७ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणें.
मर्यादेयं
विराजते.