[ ६६ ] श्री. २३ मे १७०८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ३५ सर्वधारी सवत्सरे ज्येष्ठशुद्ध चतुर्दशी मंदवासर क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपति याणीं राजमान्य राजश्री खडप्रभू चिटनवीस यास आज्ञा केली ऐसी जे - तुमचेविशी कित्येक राजश्री रामचंद्र पडित अमात्य याणीं विनंति केली त्यावरून कळों आले. ऐसियांस, तुह्मी स्वामींचे कदीम विश्वासू सेवक आहा. तुमचे हाते सेवा घेऊन तुमचें चालवणें स्वामीस अगत्य आहे याकरितां कांही सदेह न धरितां व अनमान न करितां, विलंब न लाविता, तेथून स्वार होऊन स्वामीसंनिध दर्शनास येणें. स्वामी तुमचें पूर्ववत चालवितील येविशीं आनसारिखें न मानितां सिताब स्वार होऊन येणें. येविशीं सविस्तर पंडित मशारनिल्हेनीं लिहिलें आहे त्यावरून कळो येईल. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
मयादेयं
विराजते.