पत्रांक ६२०
श्रीलक्ष्मीकांत.
१७२४ पौष शुद्ध २
राजश्री नारायण वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. तुमचीं पत्रें सरकारांत जीं आलीं, त्यांचीं उत्तरें यापूर्वीच पाठविण्यांत आली. त्यांत जें ल्यहावयाचे तें लिहिलेंच आहे. त्याजवरून समजलेंच असेल, सांप्रत राजश्री सदाशीव बापूजी याजकडून पत्रें आलीं त्याचीं उत्तरें मशारनिल्हेस लिहून पाठविलीं आहेत. त्याजवरून मजकूर तुमचेहि समजण्यांत येईल. तुमचे मुलांमाणसांसमागमें सरंजाम जो द्यावयाचा तो देऊन, त्याची रवानगी करून दिली. त्याजला जाऊन सात आठ दिवस जाले. हा मजकूर तुह्मांकडील मंडळी लिहून पाठवितील, त्याजवरून कळेल. वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहीत जावें. रा छ ३० माहे रमजान, बहुत काय लिहिणे ? हे विनंती. मोर्तबसुद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)