[ १२७ ] श्रीशंकर प्रसन्न. १७३१.
राजमान्य राजश्री भगवतराव पंडित यास आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मांकडे राजश्री रामाजीपंत व विठ्ठलपत पाठविले आहेत. ते जें सांगतील तें स्वामीची वचनें जाणोन त्याप्रमाणें मान करून स्वामीच्या दर्शनास मजल दरमजल येणे. नारिंग व केळें पाठविलीं आहेत तें घेणें बहुत काय लिहीन सुज्ञ असा.