Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके, १७१५.
विनंति विज्ञापना. औरंगाबाद येथील तमाम साहुकारासे पटी आंठीघ।। चा कर लाख रुपयांचा तेथील सुभे ईफ्तखारखान व मिरधे मुरादबक्ष यांणीं नवाबाचे हुकुमा बमोजीब केली. त्याची हिसेरसीद हरबाजी नाईक बिडवई याचा पुतण्या रघुनाथ नाईक याजवर साडेबारा हजार रुपयांची ठरली. पटी रुपयांचा तगादा सुभे व मिर्ध्याकडील; सबब, रघुनाथ नाईक यांनीं शहरांतील येक कलाल रुस्तुम ह्मणोन व आणिक कांहीं साहुंकार वगैरे लोकांचा येका करून पांचसातसेपंर्यंत जमियेत ही ठेविली; त्यांस रोजमुरा वांटुन सुभे व मिरधे यांस मारावयाची तजवीज केली. हें वर्तमान सुभ्यास समजतांच त्यांणीं तमाम साहुकार लोक रघुनाथ नाईक सुधां धरून आणून चौकसी केली; सर्वांचे संमतें या करण्याचे बाजीकार रघुनाथ बिडवई व रुस्तुम कलाल, त्यावरून सुभे व मिरधे यांणीं रघुनाथ नाईक यांचे पांई बेडी घालून कैद केलें. दुकान घरदाराची जप्ती केली. कलालास तोफेचे तोंडी देऊन उडविलें. याप्रो औरंगाबादेहून अखबार छ, २६ जिल्हेजी नवाबाकडे आली. बिडवई याचा दुकान येक औरंगाबादेस तो तेथें जप्त झाला. हैदराबादेंतील दुकानाचीही जप्ती करविली. रघुनाथ नाईक याचा मामा त्रिंबक नाईक येथें बेदरास स्वारीसमागमें आला. येथीलही दुकानावर पाहरे रात्रींच पाठवून जप्ती जाली, बहुत लोकांच्या ठेवी त्याचे दुकानीं फार दिवसांपासोन, त्यासुधा येकवार चीजबस्त कुल जप्तींत आले. सुभे यांणीं औरंगाबादी रघुनाथ नाइका पासोन गुन्हेगारीची नजर साडेबारा लाख रुपयांची फर्द मारहाण देऊन लेहून घेतले. सांप्रत दुकानांतील वह्या सरकारांत आणऊन ई॥ पासोनं कोणाचा यैवज किती जमा याची चौकसी होत आहे इतकियावर काय होतें हें। पाहावें र छ, १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. मध्यस्तांनीं बोलण्यात आणिलें कीं “राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांजकडील जाबसाला चा भाग तुटत नाहीं. जानोजी भोंसले व सेनाधूरंधर यांचे काराकिर्दीस दुतर्फा तहनामें जाले त्या बमोजीब परस्परें वहिवाट व्हावी तें न होतां सेनासाहेब सुभा यांची आगळीक होते. वराड प्रांतीं बेमोईन जेथें जसा दस्त पोहचतो तेथें अमल घेण्यास देसा देश करीतच नाहींत. यांचे जाबसाल आज रुपें वाजवी ठरावें ये विसी तुम्हांसी किती वेळ बोलण्यांत आलें ? तुम्हीं ही त्यांजला जे पर्यायै लिहिण्याचे ते लिहिलेच असतील. पटणचे स्वारीहून येते समंई हरी पंडत यांसीही सर्व दर्जे बोलण्यांत आले, परंतु अद्याप कोणचाही मुजकाः होत नाहीं. त्याजकडोन विठ्ठलपंत सुभेदार बारा हजार फौज तोफा वगैरे सरंजाम घेऊन जडसी बाम्हणी वगैरे तालुकियांत सरहादेवर आले. गावेलगडावर तोफा नेऊन बंदोबस्ती केली इत्यादि वर्तमानेंही पेहम येतात; त्यास वाजवी जाबसालाचीं कामें बोलल्यानें उलगडायाची, त्यास फौजा पुढें ठेवणें व बंदोबस्त करणें याची सबब काय ? सेना साहेब सुभा सरदार आहेत. त्याजपासीं फौजेचा सरंजाम कमाल तीस हजारपर्यंत कामाचे वख्ती हें महषूर आहे, त्यापक्षीं दाहा बारा हजार फौजेनसी सुभेदार पुढें आल्यानेंच त्यांजपासीं फौज आहे हें समजावें येसे नाहीं, तर्फेचे तहनाम्या प्रो जाबसाल विल्हे लागावें. या सरकारचे जाबसालाचा फैसला त्याजकडोन व्हावा. त्याचेही जाब पाल इंदूर, बोधन वगैरे माहाला घा। दाण्याचा व प्रांत गंगथडी येथील वाक्या राहिल्या म्हणतात याचे उलगडे होऊन दुतर्फा करार बमोजीब अमलांत आणावें हें चांगलें. आतां ही दस-या पावेतों त्याजकडोन कोण्ही मातबर मुख्तियार भवानी काळो अथवा श्रीधरपंत आगर कुशाबा चिटनीस या तिघांतून येकानें येऊन तडजोड करावी हे सलाह. नके जो जाबसाल आतां जसा उलगडण्यांत येईल, तोच दसरा जाल्यानंतर करीन म्हटल्यास कठीण पडेल, तहनाम्याचे रुईनें जाबसाल विल्हे लागावे असें म्हणत असतां, या जाबसालास कोण्हीही गैर वाजवी म्हणार नाहींत, याचाही विच्यार असावा. येविसीं सेना साहेब सुभा यांस तुम्हीं येक वेळ ल्याहावे” याप्रो मध्यस्ताचे बोलण्यांत आलें. ध्यानांत यावें यास्तव विनंती श्रीमंताचीही आज्ञा सेनासाहेब सुभा यांस जाऊन तिघांपैकीं येकानें इकडे येऊन जाबसालाचे भाग तोडावे, येविसी सरकारांत तुम्हीं ळिहुन उत्तर लौकर आणवावें " ह्मणोन बोलिले त्यावरून विनंती असे. आज्ञा येईल त्याप्रो यांसी बोलण्यांत येईल. ॥ छ १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. रणदुलाखान यांस मध्यस्तांनीं सांगितल्यावरून आम्हांकडे आले होते. खान मजकुर यांचें बोलणें कीं “ रणमस्तखान मरहुम यांस “ कदीम पासोन आश्रा व भरंवसा श्रीमंताचे सरकारचा व बंदगानअली या. “ जकडील. त्यांतही श्रीमंताचे सरकारांत या संस्थानची यास खातर अधिक “ रणमस्तखान यांचे मागें अलफखान यांस सांभाळून संवस्थानचा बंदोबस्त “ करणें हें सर्व परवरष त्या सरकाची आहे. आम्हीं ही सेवाचाकरी ता “ मगदूर करण्यास हाजर. परंतु बिल फैल टिपुसुलतान याजकडील पेंषक “सीचा तगादा बेनिहायेत आहे. याचा बंदोबस्त दोन्हीं सरकारांतून आधीं “ जाला पा. '' या प्रो खान मजकूर यांचें बोलणें. याचें उत्तर त्यांत दिलें कीं “टिपुकडील जाबसाल दोन्हीं सरकारांतून ठराव होईल तसा करावयाचा; परंतु श्रीमंताचे सरकारची नजर तरी ठरावी.” “याचा विच्यार करून बोलतो” ह्मणोन निरोप घेऊन आपले मकानास गेले. “ रणदुलाखान याचा बहुमान करावा” ह्मणेन मध्यस्तांनीं सांगितलें होतें त्यास मोगली पोषाग मये दुषाला व सिरपेंच या प्रो खुदारात केली र॥ छ. १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना मध्यस्तास आम्हीं विच्यारिलें कीं “ करनुल संवस्थानचा बंदोबस्त इभ्राइमखान यांनीं करावा, येसे पेषजी ठरलें असतां सांप्रत अलफखान यांजकडे बाहाली जाल्याचें यैकतो. याचें कारण काय? आलफखानाकडोने रणदुलाखान येथें आले; आपल्याकडील नजराणा वगैरे जाबसाल ठरलाच असेल, श्रीमंतांचे सरकारचा जाबसाल होणें. यास्तव करनुल प्रकरणी बंदोबस्त कोणे प्रकारचा ठरला ? “ याप्रो बोलल्यावरून मध्यस्तांनी बोलण्यांत आणिलें कीं “ टिपुकडील पेशकषीचे येवजाकारतां करनुलकरास तगादा लागला आहे. येविसीं लाडसाहेबांस लिहिलें होतें. परंतु लाडाचें म्हणणें कीं पेशकसीचा जाबसाल परभारें टिपुसुलतान करनुलक रांसी समजोन घेतील. आपल्याकडोन तोंपर्यत करनुल तालुकियांत दखल होउं नये, असें आहे. त्याजवरून तूर्त इबराहीमखान यांची पास करून तालुक्यांत हांगामा करणें सला नाहीं म्हणोन बिलफैल अलफखानाकडे तालुका आहे तसाच असावा; पुढें प्रसंगानरूप होणें तसें होईल. हा विचार समजोन आलफखानाकडेच बाहाली ठरली. इबराहमिखान यांस साठ हजार रु, याची जागीर येक तालुका द्यावा, ऐसे रणदुल्लाखान यांसी बोलण्यांत आले. मग साठ हाजाराचा वसुली तालुका देतील अगर पांच, हजार रु माहावारी द्यावी. दोन्हीतून येक ठरेल बंदगान आली याचे सरकारचे नजरेचे बोलणें जालें; परंतु मुलतवी आहे. सबब कीं रणदुलाखान यांचें बोलणें टिपुकडील पेषकसीचा तगादा मवकुफ करवावा. यावरून नजराणा वगैरे जाबसाल तूर्त मोहगम आहे. दोन्हीही सरकारचे जाबसाल ठरले पाहिजेत. " रणदुलाखान तुम्हांकडे आले होते कीं नाहीं म्हणोन मजला विच्यारिलें मी सांगितले, “ अद्याप आम्हांकडे नाहींत '' मध्यस्त बोलिले “ते तुम्हांकडे येतील, बोलतील, टिपुकडील पेषकसीचा तगादा भारी, याचा बंदोबस्त जरूर. यास्तव तुम्हीं सरकारांत लिहून - डबहादूर यांस इकडील व तिकडील दुतर्फा पत्रें जाऊन बंदोबस्त व्हावा. करनल संस्थान इकडील व तिकडील सालाबाद पेषकषीचे याजकरिता येयाची एहतियात करणें आवल, " म्हणोन बोंलले. रा छ, १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण ब. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, नवाबांनीं मध्यस्ताजवळ असतां आह्मीं बोलण्यात आणिलें कीं “टिपुसीं तीन सरकारचा तह पटणावर जाला ते समई करनूलकराकडील पेषकसीचा जाबसाल टिपूकडील मातबरांनीं बोलण्यांत आणिला, त्या समईंची माहितगिरी तुह्मांस सर्व आहेच. करनूलकर समंधी माहीतगिरि तुह्मांस सर्व आहेच, करनुलकरसमंधी जाबसाल तहनाम्यांत ते वख्तीच उगवावा यैसे लाडांसी बोलण्यांतही आलें; परंतु, लाडबाहादुर यांनीं सांगितलें कीं तहनाम्यांत हें कलम उगवावें यैसें आज ह्मटल्यास टिपुनें अगर कबुल केलें तर उत्तम; कबूल न केल्यास हरकत होईल. त्यापक्षीं जो जाबसाल तहनाम्यांत उगवावा येसा इकडील सवाल असतां त्यानें न कबूल करणें यांत काय राहिलें ? " इत्यादिक अंदेशे समजोन बोलण्यांत मात्र जाबसाल आला कीं " रणमस्तखान यांचे मोहरी दस्तायेवज पेषकसीचा निघाल्यास मंजूर, दस्तायैवज निघत नाहीं त्यापक्षीं हा जाबसाल मंजूर नाहीं. या प्रा गुलामअली व रजाअली टिपुकडील मातबर यासीं इंग्रजांकडील मिस्तर किनवी व आम्हांकडून मीर आलम व राव पंतप्रधान यांचे तर्फेनें तुम्हींच होतां. तीन सरकारचे वकीलाच जाबसाल सदरहू प्रा असतां त्या समंई रणमस्तखानाचा मोहरी दस्तायेवज निघाला नाहीं. पुढें पटणाहून कुच जालें; हा जाबसाल मुलतवी राहिला, सांप्रत टिपूकडून गुलाबखान करनुलास येऊन पेषकसीचा तगादा लाविला आहे. याजकारितां लाडबहादूर यांस पत्रें देऊन करनुलकराकडील सादुलाखान चेनापटणास गेला; अद्याप तेथेंच आहे. लाडबा हदूर याजकडील जबाब की “दस्तायेवज निघे। अगर नसो. टिपुसुलतान करनुलकरास पेषकसीचा तगादा करतील त्यास मुजाहिमत नव्हती. व तालुकियांत आपला दख्खल होऊं नये येसे म्हणणें " त्यास पेषकसीचे जाबसालाची शर्त रणमस्तखान याचे मोहरी दस्तेयवजावरील करारांत असतां. लाडबहादूर या प्रा म्हणतात. ताजुब आहे. त्यास पेषकसीचे झटनिवारण करणें हे राव पंतप्रधान यांनीं व आम्हीं याचा उद्योग केल्याशिवाय घडत नाहीं. यास्तव येविषंई लाडसाहेबास पत्रें आमचे व राव पंतप्रधान यांजकडील या प्रो जाऊन पहिला करार ठरल्याबमोजीव दस्तायेवज बजीनस असलियास मुजाका नाहीं. दम्तायेवज नसतां जबरदस्तीनें पेषकस घेणें हें सलाह नाहीं यास्तव हा कचा मार तुम्हीं राव पंतप्रधान यांस लिहून सदरहू अन्वये बंदोबस्ता प्रकर्णी लाड बाहदूर यांस पत्र आणावावें ह्मणोन बोलण्यांत आलें " त्यास त्यांनीं मसोदा दिल्यानंतर सेवेसीं खाना करीन. राछ १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९६ १५७८ आश्विन वद्य १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि मौजे पसर्णी सा। हवेली पा। मजकूर सु॥सन सबा खमसैन आलफ दरीविले नरसीहभट बिन रंगभट चित्राउ यास इनाम जमीन चावर निमे .॥. दर सवाद मौजे मजकूर बा। खु॥ दर साल सन अर्बा सादीर जाहाले तेथे रजा जे वाकेवाडी नजीक सिदनाथवाडी वाट माहाभलेस्वर + + + + + + + + + + + नकदयाती बीठबेगोर फर्मायस व बेलकटी व मोहीमखर्च व बाजे ता। ठाणा ता। देहाय बा। खु॥ मोकासाइयानि माजी भोगवटा तसरुफाती पाहून दुंबाला कीजे दर हर साला खु॥ उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल परतून दीजे ह्मणौउनु रजा रजेबा। भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु। सन सीत बतेरीख २० सौवाल जमीन सदरहू दो। बाबहाय दुमाले केले असे भोगवटा तसरुफाती पाहून साल गु॥ प्रमाणे चालवीजे तालीक लेहुन घेउनु असल मिसेल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख २५ माहे जिल्हेज
जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. अलफखान करनुलकर यांजकडून रणदुलाखान येथें आलें. नवाबाची मुलाजमत होऊन, मध्यस्तासीं बोलणें जालें. रणमस्तखान यांची दौलत व करनुल आदिकरून कुल तालुका अलफखान यांजकडे बाहाल असावा. या समंधें नवाबाची नजर दाहा लक्ष व मध्यस्त दरबार खर्च बाबद पांच लाख, येकूण पंधरा लक्ष ठराविले. सदरहु पंधरा लाख रुपये दरसाल येक लक्ष प्रो पंधरा वर्षांत आदा करावे. या प्रो किस्तबंदीचा ठराव जाला. रणदुलाखान यांचें बोलणें मध्यस्तांसी कीं “ टिपुकडून गुलाबखान पेषकसीचे येवजाकरितां करनुलास येऊन तगादा कारतो याचा बंदोबस्त करावा तर सालाचे सालास करार बमोजीब येवज ज्या बज्या होईल टिपु पेषकसीचा येवज घेऊं लागल्यास त्यास परभार देणें, आणि नजरे बाबद इकडेंही येवजाची सरबराई करणें, हें कसे घडेल ?” या प्र।। बोलणें आहे इभ्राइमखान रणमस्तखानाचे वडील पुत्र यांजला प्रथम खिताब व सरफराजी करून येथून करनृल तालुक्याचे बंदोबस्ताकारतां महमद अमीखां आरब यांजकडे रवाना केलें. मागाहून फौज पाठऊन कुमक करावी येसा बेत होता. तो राहून, अलफखानाकडील पैगम लागल्यावरून रणदुलाखानास येथें आणविलें, हें इभ्राइमखान यास समजल्यावरून तेही पाकटुराहून निघाले ते येथें आले. नवाबाची मुलाखत जाली. इभ्राइमखां यांस साठ हजार रुपयांची जागीर यक तालुका द्यावा त्यांत त्याणी आपली गुजराण करावी; वरकड सर्व तालुका अलफखानाकडे, याप्रो रणदुलाखान यांसी निश्चयें ठरून संनदा पत्रें तयार करविली र छ १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. मध्यस्तांनीं सांगितलें कीं “ अखबारी वर्तमान येक येसे आहे कीं इंग्रजाचे बाषाहानें मिस्तर मेडोंस यास सरदारी देऊन फरासीसाचे तंबीकारतां मुकरर केलें. मेडोस फुलचेरी वगैरे बंदोबस्तांकरितां येणार '' याप्र॥ आहे; त्यास मेडोंस बा सरंजाम इकडे आल्यानंतर, आधींच टिपुचा त्याची दुष्मानी विशेष. त्यापक्षीं टिपुचे तंबीविषीचाही उद्योग करील यैसें वाटतें; इतक्यावर पाहावें. दुसरें यक वर्तमान येसेंही आहे कीं “ मेडोसांस “ त्याचे बादषाहानें रवाना केलें हें वर्तमान फरासीसास समजल्यावरून फरा “सीसानीं फौज सरंजाम पाठऊन मेडोंसाची त्याची लडाई जाली. त्यांत “ मेडोस पडला'' हें दुसरें वर्तमान तहकीक नाहीं ' या।।। वोलले. र॥ छ. १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें कीं::-“चिनापटणाकडोन अखबार आली त्यांत वर्तमान कीं::-‘फूलचरीवर चिनापटणचा गौरनर सवीस पलटणे गोरे पगडीवाले सिवाय तोफा दोनसें इतक्या मजबूत सरंजामानसीं जाऊन इरादा केला. प्रथमतःच फलचेरीवर गोळे षुरु केले. येक लडाई याप्रमाणें होऊन त्याजवर जंगमजा केलें आणि फरासीसाकडोन अधिकारी फुल चेरी येथें आहे त्याजके इंग्रजीकडील गौरनरानें आपले पुत्रास किल्यास पाठविलें. निरोप सांगून पाठविला कीं::-- इंग्रज व फरासीस या उभ येतां मध्यें लडाई परदेशीं जाली असतां मागील कायदा असा आहे कीं:- ‘ लडाईंत पाडाव माणसें इंग्रजांकडील फरासीसाकडे अथवा फरासीसाकडील इंग्रजापासीं आल्यास त्यांस मारहाण न कारतां येहतीयातीनें ज्यांची त्याजकडे घ्यावी, त्यास आमची जमयेत सवीस पलटणें व तोफा वगैरे सरंजाम या प्रकारचा; तुह्मांपासीं कुल जमयेत दोन अडीस हजार.यास्तव लढाईचा इरादा न करतां मकान खाली करून घ्यावें. तुह्मीं चजिबस्त सुद्धां निघोन जावें. हें न कारतां जंग करावी असाच मनोदय असल्यास तोफा लाऊन येक येक सफीलव बुरुज मोकळा करून देऊं. त्यासमई मकान हस्तगत झाल्यानंतर तुह्मीं ह्मणाल कीं इंग्रज फरासीसाचा कायदा पाडाउ यांस सोडावें तरी ते कबूल होणार नाहीं. येविसीं आताच तुह्मांस बज्याउन सांगतो. लढाई होऊन तुह्मी हस्तगत जाल्यानंतर आह्मांस कतल करणें प्रात्य. इतका विच्यार पुर्तेपणें दूरदेशीनें समजोन याचा जवाब मामुल पाठवावा. याप्रो निरोप गेला. अद्याप याचा जवाब कांहीं आला नाहीं, याप्रो एक अखबार आली. त्यांत वर्तमान दुसरें ऐकण्यांत आहे, कीं इंग्रजाचें गौरनरानें सदरहु प्रो फुलचेरीचे फरासीसास सांगून पा. याचा जबाब फरासीसानें इंग्रजासी योजिला आहे कीं आमची जितकी फरासीसी जमियेत व तोफा वगैरे बार सरंजाम आहे तितकाच सरंजाम जमियेत, व बार इंग्रजी आमचे मुकाबिल्यास घेऊन यावें. तुमची आमची लढाई हौऊन ज्याची सिकस्त होईल यानें फुलचरी मकानापासोन हातउचलावा. याप्रो ही वर्तमान आहे. याजवर यांचे त्यांचे लडाईची बातमी दुसरी अद्यापि आली नाहीं. याप्रो मध्यस्त बोलिले. र। छ १५ मोहरम हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
२ चिनापट्टन येथील व्यापा-यांना आलेल्या पत्रावरून युरोपांतील आलेल्या बातमीचें भाषांतर
डच लोकांनी फेंचाचे वर्चस्व कबूल केल्यावर त्यांनीं आपल्या कोठी ( कारकान्या ) वर फ्रेंचांचें निशाण रोंविलें, इंघ्लंच्या राजाची बहीण व तिचा मुलगा यांनीं फ्रेंचांशीं मैत्री केली व दोन तीन ठिकाणीं त्यांचें स्वा मित्व त्यांनीं कायम केलें. इंग्रजी सैन्य त्यांच्या देशांतील किना-याच्या प्रदेशांत तयार आहे. व फ्रेंच सैन्य त्यांचे बाजूला तयार आहे. इंग्लंडमध्यें हिजरी सन १२०७ शाबानच्या १७ वे तारखेस लिहिलें.
३ ते सर्वांत पवित्रतम व श्रेष्ठतम आहे; तोच क्षमा करील.
ता. ६ झीलहज्ज अलहराम सन १२०७ हिजरी.
युरोपांत व या देशांत इंग्रज आणि फ्रेंच यांचे दरम्यान झालेल्या लढाईची बातमी किंवा बेलचारी घेण्याचा इग्रजांचा उद्देश अगर इंग्रजांनीं कांही जहाजें धरली ह्या बातम्या आपल्यास पोंचण्याचे पूर्वी ४५ दिवसाचे प्रवासांतच येथें पोंचलेलें यूरोपांतून येक जहान आलें आहे तें चिनापट्टणास लागलें व त्यानें आणिलेंलीं कांहीं पत्रें येंथें देऊन तें कलकत्यास रवाना झालें. बेलचारीला वेढा घालून तें घेण्याविषयीं युरोपांतून हुकुम आला असल्यानें चिनापट्टन येथील लोकांनीं कदलूर व देवपट्टन ह्या त्यांच्या जुन्या ठाण्यांकडे ५००० बारा (पलटणें-बंदुकावाले–किंवा, भारवरदारी-पान १५ टीप-पहा ) ३००० शिलेदार, तोफा दारूगोळा व लढाऊ सामान व वेढा देण्याला उपयोगी पडणारें बरेंच सामान रवाना केलें व आणखीही बरेच लढाऊ सामान लवकरच जाईल. त्यांचा इरादा असा दिसतो कीं वरील जागीं फौज व सर्व सामान व वेढ्याची सर्व तयारी जय्यत ठेऊन तेथून सर्वांनीं एकवटून हल्ला करायचा व अशा रितीनें अल्पकाळांत वेढा द्यायचा. फ्रान्स देशांतून बेलचारी येथील लोकांस असें आश्वासन आलें आहे की लवकरच १८ जहाजें, तोफा, बंदुका, शिपाई-दारूगोळा व इतर लढाऊ सामानासहित पाठविलीं जात आहेत. परंतु ते येईपर्यंत त्यांनीं आपलें नांव राखावें व सदर ३ शहराचें उत्तम रितीनें संरक्षण करून तें राखण्याचा त्यांनीं प्रयत्न केला पाहिजे. लागलीच त्यांनीं ४ जहाजें ३०० शिलेदार, दारुगोळा व सामानसह बेलचडी येथें रवाना केलीं. परंतु हवेंतील ऊष्णतेमुळें व दुखण्यामुळें त्यापैकीं बरेच लोक मेले आणि मुकामाला फारच थोडे येऊन पोहोंचले. हल्लीं बेलचडीच्या किल्यांत २५०० पेक्षां ज्यास्त लढाऊ युरोपिअन नाहींत. व असेंहीं समजतें की तटबंदीवरून मारा करण्यासारख्या मोठ्या तोफांसुद्धां तेथें नाहींत. बेलचडी शहरांत असा जाहीरनामा फिरला आहे की फक्त ज्यांजवळ तीन महिन्याची सामुग्री असेल त्यांनीं राहावें व बाकीच्यांनीं चालतें व्हावें. पोर्तुगीझ लोक इंग्रजांनां मिळाले आहेत, आणि स्पनिश व जेनमार्कचे लोकांची फ्रेंचांना मदत आहे. नुकतेंच त्यांनीं तांदुळांनें भरलेलें फ्रेंचांचें येक जहाज लुटलें आणि त्यावरील सरदाराला मछलीपटणास कैद केलें, अशी बातमी आहे कीं, कलकत्याहून लार्ड कार्नवालिस येऊन सदरहू फ्रेंच प्रकरणावर स्वत: नजर ठेवणार आहे. इंग्रजी कंपनीबरोबर सलोखा राहावा या हेतूनें फते अलीखान तोफखान्यांच्या बैलाच्या तयारींत आहे. यानंतर जें जें होईल ते आपल्यास कळविलें जाईल. जास्त काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.