श्री.
आश्विन शु.३ मंगळवार शके १७१५,
विनंती विज्ञापना. माहाराव निंबालकर यांची रदबदल दौलापासीं बाबाराव यांनी केली. दौलांनीं सांगितलें कीं माहाराव यांची चाल दुरुस्त नाहीं. मगर, त्यांचे पुत्रास हाजुर येण्याविषयी अर्ज करतों. त्यावरून दौलांनीं नवाबास अर्ज करून माहाराव यांचे पुत्र जानोजी निंबाळकर यांस येण्याविषईं नवाबाचा इनायतनामा व आपले पत्र बाबाराव यांचें समागमें तयार करून दिल्हें, जानोजी निंबाळकर करमाळें तालुकियांत आहेत. तेथुन येथें येणार, येथें आल्यानंतर जागीर वगैरे कांहीं पोटापुरती करून देणार. याप्रो आहे. रा छ, २ माहे वल हे विज्ञापनां.